Home » मशाल चिन्हासोबतचे शिवसेनेचे जुने संबंध, १९८५ मध्ये जिंकली होती पहिली निवडणूक

मशाल चिन्हासोबतचे शिवसेनेचे जुने संबंध, १९८५ मध्ये जिंकली होती पहिली निवडणूक

by Team Gajawaja
0 comment
Shiv Sena New Symbol
Share

महाराष्ट्राच्या राजकरणात शिवसेनेची काही दशकांपासूनच एक वेगळीच ओळख होती. मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे आता त्याचे विभाजन झाले आहे. शिवसेना दोन गटात विभागली गेली आहे. एका बाजूला एकनाथ शिंदे तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांचा गट अशी स्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही गटातील वाद ऐवढा वाढला गेला की, निवडणूक आयोगने अखेर शिवसेनेचे चिन्ह आणि पक्षाचे नाव गोठवले. दरम्यान, आता निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला मशाल हे चिन्ह दिले आहे. त्याचसोबत पक्षाला एक नवे नाव ‘शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असे दिले आहे. (Shiv Sena New Symbol)

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्यासाठी मशाल चिन्ह हे काही नवं नाही आहे. हे चिन्ह वापरुन पक्षाने यापूर्वी सुद्धा निवडणूक लढवली आहे. बाळासाहेबांच्या वेळी १९८५ मध्ये जेव्हा पक्षाकडे आपले असे कोणतेही चिन्ह नव्हते तेव्हा मशाल चिन्हावरच त्यांनी निवडणूक लढवली होती. यामध्ये शिवसेनेचा विजय झाला होता. शिवसेनेने विधानसभा निवडणूक मशाल चिन्हावर छगन भुजबळ यांना माझगाव या निवडणूकीच्या जागेवर मैदानात उतरवले होते.

मशाल कसे बनले होते शिवसेनेचे चिन्ह?
छगन भुजबळ यांनी इंडियन एक्सप्रेससोबत बातचीत करताना असे म्हटले की, मीच जळत्या चिन्ह्याची निवड केली होती. कारण ते क्रांती आणि प्रतीकवादाचे चिन्ह होते. ज्याने महाराष्ट्रातील लोकांना एक नवी दिशा दिली होती. त्यांनी असे ही म्हटले की, बाळासाहेब ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यासह शिवसेनेतील काही नेत्यांकडे पक्षासाठी निवडणूक चिन्हाची मागणी केली होती. त्यामधील काही नेत्यांनी उगवता सूर्य आणि बॅट-बॉलचा पर्याय दिला होता.

Shiv Sena New Symbol
Shiv Sena New Symbol

भिंतींवर काढायचे चित्र, निवडणूकीसाठी नव्हते पैसे
भुजबळ यांनी असे म्हटले की, १९८५ च्या काळात होर्डिंग्स, बॅनर अशा गोष्टी नव्हत्या. त्यावेळचे नेते निवडणूकीच्या प्रचारावेळी भिंतीवर चित्र आणि लेखन करायचे. मशालीचे चित्र भिंतीवर काढणे अगदी सोप्पे होते. त्यांनी असे म्हटले की, तेव्हा आमच्याकडे निवडणूक लढवण्यासाठी पैसे नव्हे. त्यामुळे वॉल पेंटिंग तयार केले जायचे. माझ्यासाठी जळती मशाल बनवणे हे सोप्पे होते. मी निवडणूकीच्या अभियानादरम्यान, या चिन्हाचा वापर करुन मतदारांना आकर्षित केले होते. याच चिन्हामुळे निवडणूक जिंकत एकमेव आमदार झालो होतो. (Shiv Sena New Symbol)

हे देखील वाचा- बाणांबरोबर धनुष्यही इतिहासजमा

उद्धव यांची मशाल तर शिंदेंची तलवार
दरम्यान, निवडणूक आयोगाने सोमवारी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मशाल हे निवडणूकीचे चिन्ह दिले आहे. तर पक्षाचे नाव ‘शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असे ठेवले आहे. आयोगाने एका आदेशात असे म्हटले की, उद्धव ठाकरे यांचा गट आगामी विधानसभा निवडणूकीत जळती मशाल हे चिन्ह वापरुन निवडणूक लढवेल. तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव दिले असून त्यांना दोन तलवार आणि ढाल हे चिन्ह दिले गेले आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.