Home » महाराष्ट्रातील राजकरणात बड्या निर्णयांचे साक्षीदार राहिलेले ‘शिवसेना भवन’

महाराष्ट्रातील राजकरणात बड्या निर्णयांचे साक्षीदार राहिलेले ‘शिवसेना भवन’

by Team Gajawaja
0 comment
Shiv Sena Bhawan
Share

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सध्या जोरदार वाद सुरु आहेत. निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि निशाणी ही शिंदे गटाला दिली आहे. तर उद्धव ठाकरे यांनी या संपूर्ण प्रकरणाबद्दल सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याचे बोलले जात आहे. अशातच सुप्रीम कोर्ट यावर काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. याच दरम्यान आणखी एका गोष्टीवर सर्वांचे लक्ष आहे ते म्हणजे शिवसेना भवन. असा प्रश्न उपस्थितीत राहतो की, शिंदे गटाकडून शिवसेना भवन ही मिळवले जाणार का? (Shiv Sena Bhawan)

शिवसेना भवन
दोन पक्षांच्या वादात शिवसेना भवनाबद्दल अधिक जाणून घेऊयात. मुंबईतील सर्वाधिक गर्दीचे आणि वर्दळ असणारे ठिकाण म्हणजे दादर. याच दादरमध्ये शिवसेना भवनाची स्थापना सन १९७४ रोजी झाली होती. याची स्थापना बाळा साहेब ठाकरे यांनी केली होती. शिवसेना पक्षाची स्थापना जून १९६६ मध्ये झाली होती. त्याच्या ८ वर्षानंतर शिवसेना भवन उभारले गेले.

शिवसेना भवन हे शिवसैनिकांसाठी एका प्रतिष्ठित ठिकाणासारखेच आहे. याला काहीजण मंदिराचा ही दर्जा देतात. जेव्हा पक्षाची स्थापना झाली त्यावेळी बाळा साहेब ठाकरे यांचे घर मातोश्री मधून पक्षाचे कामकाज चालायचे. मात्र नंतर शिवसेनेचे कामकाज हे सेनाभवनातून केले जाऊ लागले.

अनोखी वास्तुकला
जसे जसे शिवसेनेचे प्रभुत्व वाढत गेले त्यानुसार एका कार्यालयाचा शोध घेतला गेला. दादर मधील एक ठिकाण पाहिले गेले आणि शिवसेना भवन जेव्हा उभारले गेले तेव्हाचा क्षण अनोखाच होता. कार्यकर्त्यांनी शिवसेना भवनासाठी मोठ्या प्रमाणात देणगी दिली होती. लहान, मोठे कार्यकर्ते यांनी शिवसेनेच्या उभारणीसाठी खुप मेहनत केली होती.

शिवसेना भवन मुंबईतील काही प्रसिद्ध इमारतींपैकी एक असून त्याच्या वास्तुकलेसाठी ओळखले जाते. जेजे स्कूल ऑफ आर्ट्स किंवा मुंबईतील टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीप्रमाणे शिवसेना भवनाचे एक आकर्षण आहे. याला प्रसिद्ध वास्तुविशारद गोरे यांनी किल्ल्याचे स्वरूप दिले होते. तर सहस्रबुद्धे यांनी बाळा साहेब यांच्या देखरेखीखाली येथे शिवाजी महाराजांची मुर्ती बनवली होती.

महाराष्ट्रातील शक्ती केंद्र
शिवसेना भवनाला महाराष्ट्रातील राजकरणातील प्रमुख केंद्र असल्याचे ही बोलले जाते. काही वर्षांपर्यंत शिवसेना प्रमुख बाळा साहेब ठाकरे यांनी आपला वाढदिवस २३ जानेवारीला येथे उभे राहून कार्यकर्ते आणि नेत्यांची भेट घेतली होती. लोकांना आपल्या भाषणाने संबोधित ही येथूनच करायचे. याच शिवसेना भवनात भाजप आणि शिवसेनेच्या काही राजकीय बैठका सुद्धा व्हायच्या. (Shiv Sena Bhawan)

निशाण्यावर ही होते सेनाभवन
शिवसेना भवन हे राजकरणातील बड्या निर्णयांचे साक्षीदार नव्हे तर काही मोठ्या घटनांचे ही साक्षीदार आहे. १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटात २५१ जणांचा मृत्यू झाला तर ७५० जण जखमी झाले होते. त्याच दरम्यान एक स्फोट हा शिवसेना भवनाजवळ ही झाला होता. स्पष्ट आहे की, शिवसेना भवन दहशतवाद्यांच्या निशाण्यावर ही राहिले होते. हल्ल्यानंतर शिवसेना भवनाचे फार मोठे नुकसान झाले होते.

हे देखील वाचा- उद्धव सेनेला ना नाव ना निशाणी… निवडणूक आयोगाच्या निर्णयावर राजकीय मंडळींनी अशा दिल्या प्रतिक्रिया

पक्षाचे चिन्ह बदलत गेले
१९८६ मध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणूकीवेळी शिवसेनेने तलवार आणि ढाल आपले निवडणूकीचे चिन्ह ठरवले होते. त्याआधी १९७८ मध्ये रेल्वे इंजिन चिन्हावर निवडणूक लढली होती. १९८५ दकम्यान पक्षाने टॉर्च ते बॅट बॉल सारखे चिन्ह ही निवडले होते. मात्र १९८९ मध्ये पक्षाला धनुष्य बाण हे चिन्ह मिळाले आणि आजवर तेच चिन्ह कायम आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.