Home » Shiv Jayanti : शिव जयंती विशेष! स्वराज्यातील महत्वाचे गड-किल्ले

Shiv Jayanti : शिव जयंती विशेष! स्वराज्यातील महत्वाचे गड-किल्ले

by Jyotsna Kulkarni
0 comment
Shiv Jayanti
Share

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, श्रीमंत योगी, शिवकल्याण राजा अशा अगणित उपाधी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती वर्णावी तरी किती? हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी महाराजांनी शत्रू विरोधात मोठा लढा दिला आणि स्वराज्य तयार केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे गड, किल्ले आजही त्यांच्या शौर्याची साक्ष देताना दिसतात. युद्धनीतीत महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांना वेगळेच महत्त्व होते. अभेद्य ,अजेय असलेले हे किल्ले आजही स्वराज्याच्या जाज्वल्य आणि सुवर्ण इतिहासाची दिमाखात साक्ष देत उभे आहेत. (Shiv Jayanti)

स्वराज्याची स्थापना करताना शिवाजी महाराजांनी सुमारे ४०० गड-किल्ले जिंकले, बांधले. प्रत्येक किल्ल्याला स्वतःचा एक इतिहास, महत्व होते. महाराजांनी जेवढे किल्ले, गड बांधले, जिंकले त्यामागे त्यांचा एक मोठा विचार असायचा. प्रत्येक किल्ल्याला एक जबादारी दिलेली असायची. आज महाराजांची तिथीप्रमाणे जयंती आहे. त्याच निमित्ताने आपण महाराजच्या महत्वाच्या किल्ल्यांबद्दल जाणून घेणार आहोत.(Chhatrapati Shivaji Maharaj)

शिवनेरी किल्ला (Shivneri Fort)
छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान म्हणून शिवनेरी किल्ला प्रसिद्ध आहे. गडावर शिवाई देवीचे एक छोटेसे मंदिर आहे. आई शिवाईच्या नावावरूनच शिवाजी महाराजांचं नाव ठेवण्यात आलं होतं. शिवनेरी किल्ल्याचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान होतं. या किल्ल्यावर गो़ड पाण्याचे दोन स्त्रोत आहेत. त्याला गंगा जमुना म्हटलं जातं. या ठिकाणी वर्षभर पाणी असतं. किल्ल्याच्या जवळ अनेक गुफाही आहेत. या किल्ल्यात राजमाता जिजाबाई आणि तरुण छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, बदामी तलाव नावाचा पाण्याचा तलाव आहेत.(Marathi Top Stories)

Shiv Jayanti

=======

हे देखील वाचा : Shiv Jayanti : छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्यांची नावे माहित आहे का?

========

तोरणा किल्ला (Torna Fort)
छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या १६ व्या वर्षी जिंकलेला हा पहिला गड आहे. महाराजांनी जेव्हा या गडाची पाहणी केली तेव्हा त्यांनी या गडाच्या प्रचंड विस्तारामुळे याचे नाव बदलून ‘प्रचंडगड’ असे ठेवले. या किल्ल्यावर महाराजांना मथ्या प्रमाणावर गुप्तधन सापडले होते. या सापडलेल्या धनाचा उपयोग शिवाजी महाराजांनी राजगडाच्या बांधणीसाठी केला. संभाजी महाराजांच्या हत्येनंतर मोगल सम्राट औरंगजेबाने किल्ला ताब्यात घेतला आणि नंतर त्याचे नाव ‘फुतुलगाब’ ठेवण्यात आले. मात्र परत चार वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढवून गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला व यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच राहिला.(Marathi Latest News)

Shiv Jayanti

राजगड किल्ला (Rajgad Fort)
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्याची २६ वर्षे राजगडमध्ये घालविली. मराठेशाहीची २५ वर्षे राजधानी असलेल्या या किल्ल्यावर शिवाजी महाराजांनाचे धाकटे चिरंजीव राजारामाचा जन्म, सईबाईंचे निधन या महत्त्वाच्या घटना घडल्या. राजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकीय केंद्र होते.(Marathi Trending News)

Shiv Jayanti

लोहगड किल्ला (Lohgad Fort)
१६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगड–विसापूर हा सर्व परिसरसुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला. इ.स. १६६५ मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मुगलांच्या स्वाधीन केला गेला. पुढे १३ मे १६७० मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकला. पहिल्या सुरत लुटीच्या वेळेस आणलेली संपत्ती नेताजी पालकरने लोहगडावर आणून ठेवली होती. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ. स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.(Latest News)

Shiv Jayanti

विजयदुर्ग किल्ला (Vijaydurg Fort)
विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला एक जलदुर्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६४ च्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विजयदुर्ग किल्ला जिंकला. हा किल्ला १७ एकर जागेत पसरला असून, या किल्ल्यास तीन तटबंदी आहेत. त्यास चिलखती तटबंदी असे म्हणतात. याच्या तीन बाजू पाण्याने घेरलेल्या आहेत. या किल्ल्यात दोन भुयारी मार्ग आहेत.(social News)

Shiv Jayanti

रायगड किल्ला (Raigad Fort)
रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव जम्बुदीप असे होते. रायगड किल्ल्याची मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडचे स्थान आणि महत्त्व पाहून १६ व्या शतकात याला आपल्या राज्याची राजधानी बनविली. शिवराज्याभिषेक याच ठिकाणी झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्यात अखेरचा श्वास घेतला. सागरी दळणवळणास हे ठिकाण अतिशय जवळचे होते. म्हणून महाराजांनी स्वराज्याच्या राजधानीसाठी या गडाची निवड केली होती. (Top Latest News)

Shiv Jayanti

सिंधुदुर्ग किल्ला (Sindhudurg Fort)
सिंधुदुर्ग किल्ला हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे. शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्त्व होते. किल्ल्याचे क्षेत्र कुरटे बेटावर ४८ एकरावर पसरलेले आहे. तटबंदीची लांबी साधारण तीन किलोमीटर आहे. बुरुजांची संख्या ५२ असून ४५ दगडी जिने आहेत. ह्या किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या काळातील गोड्या पाण्याच्या दगडी विहीरी आहेत. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २१ जून, इ.स. २०१० रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.(chhatrapati Shivaji Maharaj News)

=======

हे देखील वाचा : Matheran Closed : माथेरान १८ मार्चपासून बंद होणार ? काय आहेत कारणं

========

Shiv Jayanti

पन्हाळा किल्ला (Panhala Fort)
पन्हाळा किल्ला म्हणजे निस्मीम भक्ती आणि आपल्या राज्याबद्दल आणि स्वराज्याबद्दल असलेल्या निस्वार्थ प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. कारण २ मार्च १६६० ला किल्ल्यास सिद्दी जौहरचा वेढा पडला. छत्रपती शिवाजी महाराज या सिद्दी जौहरच्या वेढ्यात अडकून पडले. त्यांच्या गुप्तहेरांनी शोधलेल्या मार्गाने ते ६०० माणसांसोबत पन्हाळयावरून विशाळगडाकडे जायला निघाले. त्यांच्यासोबत शिवा काशीद आणि बाजीप्रभू देशपांडे होते. तेव्हा शिवा काशीदने प्रति शिवाजी महाराज बनून आणि बाजीप्रभू देशपांडे यांनी घोडखिंड लढवून ठेवली आणि महाराजांना सुखरूप विशाळगडावर जाऊ दिले. बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानामुळे ही घोडखिंड पावन झाली आणि पावनखिंड म्हणून ओळखली जाऊ लागली. ६ मार्च १६७३ मध्ये कोंडाजी फर्जंद या बरोबर सैन्य पाठवून भेदनीतीचा उपयोग करून छत्रपती शिवाजी महाराजांनी परत किल्ला ताब्यात घेतला. पुढे १७१० मध्ये पन्हाळा कोल्हापूरची राजधानी झाली व नंतर १८४४ मध्ये किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. (Top Trending News)

Shiv Jayanti

मुरुड जंजिरा (Murud Janjira)
मुरुड जंजिरा चारही बाजूंनी अरबी समुद्रने घेरलेला आहे. रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे. जंजिराचा अर्थ समुद्राने वेढलेला किल्ला. भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र, याशिवाय मुरुड-जंजिराच्या तटावर ५७२ तोफा आहेत. त्यामुळेच हा जंजिरा अभेद्य होता. या तोफांमध्ये विशेष मोठी आणि लांब पल्ल्याची कलाल बांगडी ही तोफ होती. शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी हा जंजिरा शेवटपर्यंत अजेय राहिला.(Maharashtra News)

Shiv Jayanti

सिंहगड किल्ला (Sinhgad Fort)
सिंहगड या किल्ल्याचे आधीचे नाव कोंढाणा होते. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये कोंढाणा किल्ल्याचा देखील समावेश देखील होता. मोगलांतर्फे उदेभान राठोड हा कोंढाण्याचा अधिकारी होता. मूळचा राजपूत असलेल्या उदयभान राठोडने मुस्लिम धर्म स्वीकारला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे विश्वासू सरदार आणि बालमित्र तान्हाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळ्यांनी हा किल्ला एका चढाई दरम्यान जिंकला होता. या लढाईत सुभेदार तान्हाजींना वीरमरण आले आणि प्राणाचे बलीदान देऊन हा किल्ला जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांनी “गड आला पण माझा सिंह गेला” हे वाक्य उच्चारले होते.(Marathi News)

Shiv Jayanti

=======

हे देखील वाचा : Shankasur : कोकणात शिमग्याला ‘या’ असुराची पूजा का केली जाते ?

========

प्रतापगड किल्ला (Pratapgad Fort)
महाबळेश्वर पासून महाड रस्त्याला २१ कि.मी.अंतरावर प्रतापगड आहे. दि.१० नोव्हे.१६५९ रोजी या किल्ल्यावर छ. शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्यात सर्वात मोठी लढाई झाली. य लढाईमध्ये महाराजांनी अफझल खानचा वध केला, त्यामुळे या किल्ल्याला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. सन १६५६ मध्ये शिवाजी महाराजांनी ह्या किल्ल्याची स्थापना केली. समुद्रसपाटीपासून सुमारे ३५४३ फुट उंचीवर हा किल्ला आहे.

Shiv Jayanti


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.