संपूर्ण जगाला ‘श्रद्धा आणि सबुरी’चा महामंत्र देणारे साईबाबा (Saibaba) लाखो लोकांचे श्रद्धास्थान आहे. याच साईबाबांची नगरी म्हणून शिर्डीला (Shirdi) जगात ओळखले जाते. शिर्डीसाठी प्रत्येक व्यक्तीच्या मनात एक वेगळेच स्थान आहे. जात, धर्म, पंथ या पलीकडे जाऊन सर्वच लोकं या ठिकाणी येतात बाबांसमोर नतमस्तक होतात. काळानुसार साईबाबा आणि शिर्डीचे महत्व वाढू लागले आणि या मंदिरात येणाऱ्या भक्तांची संख्या वाढू लागली. (Shirdi)
आसपासच्या शहरातून, गावातून येणाऱ्या भक्त मंडळींमध्ये परराज्यातून, परदेशातूनही येणाऱ्या भक्तमंडळींची भर पडू लागली आणि म्हणून शिर्डीच्या मंदिराकडून या सर्व भक्तांच्या दृष्टीने अनेक सोयी करण्यात आल्या. यातली सर्वत पहिली आणि महत्वाची सोया होती, प्रसादाची. बाबांचे दर्शन घेतल्यांनंतर सर्वच भक्तांना आशीर्वाद स्वरूप महाप्रसाद दिला जाऊ लागला. अनेक दशकांपासून हा महाप्रसाद शिर्डीमध्ये मोफत दिला जात होता. यामुळे अनेक गरीब आणि उपाशी लोकांचे पोट भरू लागले. हा महाप्रसाद अनेक लोकांसाठी अमृत ठरला आणि त्यांना जीवदान दिले. मात्र आता याच मोफत प्रसादावर शिर्डीच्या संस्थानाने एक मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतला आहे. (Marathi News)
मागील अनेक दिवसांपासून शिर्डी सतत चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे साईबाबा संस्थानच्या दोन सेवकांची झालेली हत्या. काही दिवसांपूर्वीच संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांची लुटीच्या उद्देशाने निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली. या घटनेमुळे पुन्हा एकदा शिर्डीमध्ये वाढणारी गुन्हेगारी समोर आली. याच पार्श्वभूमीवर आता शिर्डीच्या साईबाबा मंदिराच्या संस्थानने एक मोठा निर्णय घेतला आहे. (Marathi Latest News)
दररोज शिर्डीला लाखो भक्त साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी येतात. त्यानंतर ते महाप्रसादालयामध्ये जाऊन मोफत भरपेट प्रसाद ग्रहण करतात. मात्र आता हा महाप्रसाद घेण्यासाठी सर्वच भक्तांना टोकं द्यावे लागणार आहे. टोकन असणाऱ्या भाविकांनाच साई बाबा संस्थानच्या मोफत प्रसादाचा लाभ घेता येणार आहे. संस्थानच्या या मोठ्या निर्णयाचे सर्व साईभक्तांनी आणि शिर्डीच्या ग्रामस्थांनी स्वागत केले आहे. (Token System)
===============
हे देखील वाचा : डबल चीनची समस्या होईल दूर, डाएट आणि लाइफस्टाइलमध्ये करा हे बदल
===============
शिर्डीत साई बाबा संस्थानच्या वतीने आशिया खंडातील सर्वात मोठे प्रसादालय चालवले जाते. दररोज या महाप्रसादालयामध्ये सरासरी पन्नास हजार भाविकांना प्रसादाचा लाभ मिळतो. पण यात सर्वच चांगली माणसं असतात असे नाही. या महाप्रसादालयामध्ये भक्तांसोबतच गुन्हेगारी प्रवृत्तीची, अंमलीपदार्थांचे सेवन केलेल्या व्यक्ती देखील उपस्थित असतात आणि प्रसादाचा लाभ घेतात. (Todays Marathi News)
या लोकांमुळे भाविकांना खूप त्रास होतो आणि हे लोकं मुद्दाम भक्तांना त्रास देखील देतात. याच्या अनेक तक्रारी देखील संस्थानकडे आल्या. यावरच उपाय म्हणून आता संस्थानने भाविकांच्या सुरक्षेसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. साईबाबांचे दर्शन घेऊन बाहेर पडणाऱ्या भाविकांना जिथे उदी आणि बुंदीचा प्रसाद दिला जातो. तिथेच प्रसादालयातील मोफत भोजनाचे टोकन देण्याची व्यवस्था आता केली जाणार आहे. प्रसादालयामध्ये हे टोकन दिल्यानंतरच भक्तांना प्रसादलाचा लाभ घेता येईल अशी माहिती, साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे.