Shinzo abe funeral- जापानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळ्यावर घालून हत्या करण्यात आली होती. त्यांच्या मृत्यूनंतर जवळजवळ दीड महिन्यानंतर त्यांच्यावर राजकीय इतमामात अंतिम संस्कार केले जाणार आहे. असे सांगितले जात आहे की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी उपस्थितीत राहू शकतात. शिंजो आबे यांच्यावर सप्टेंबर २७ सप्टेंबला अंतिम संस्कार केले जाणार आहेत. त्याचसोबत टोक्योमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमाला मोदी येऊ शकतात. पीएम मोदी जापानला जाणार असल्याच्या बातमीदरम्यान अशी ही चर्चा सुरु झाली आहे की, अखेर मृत्यूनंतर शिंजो आबे यांच्यावर ऐवढे दिवस अंतिम संस्कार का करण्यात आले नाहीत?
तर जाणून घेऊयात अखेर राजकिय इतमामातील अंतिम संस्कारावेळी काय केले जाते? या व्यतिरिक्त जापानच्या शिंजो आबे यांच्या राजकीय अंतिम संस्कारासाठी सुद्धा का विरोध केला जातोय हे सुद्धा आपण पाहूयात.
राजकिय अंतिम संस्कारासंदर्भात काय आहे अपडेट?
जर राजकिय अंतिम संस्काराबद्दल बोलायचे झाल्यास शिंजो आबे यांच्या निधनानंतर सरकारने घोषणा केली होती की., त्यांच्यावर राजकिय इतमामात अंतिम संस्कार २७ सप्टेंबरला केले जाईल. आता सेंट्रल टोक्योचे निप्पोन बुडोकान मध्ये २७ सप्टेंबरला हा विधी पार पडणार आहे. या कार्यक्रमात जापान व्यतिरिक्त अन्य देशातील मान्यवर सुद्धा उपस्थितीत असणार आहेत. शिंजो आबे यांचा मृत्यू ८ जुलैला झाला होता. आता त्यांच्यावर राजकिय अंतिम संस्कार २७ सप्टेंबरला केले जाणार आहे.
राजकिय अंतिम संस्कारावेळी काय होते?
राजकिय अंतिम संस्कारला स्टेट फ्यूनरल असे म्हटले जाते. हे अंतिम संस्कार सरकारकडून शिंजो आबे यांना श्रद्धांजली रुपात आहे. यामागे एक तर्क असा आहे की, ते दीर्घकाळ देशाचे पीएम राहिले आणि त्यांनी आपल्या कार्यकाळात आलेल्या संकटांना योग्य पद्धतीने सामना केला. अशातच त्यांना सन्मान मिळाला पाहिजे. हे भारतात मिळणाऱ्या शोकासारखेच आहे.ज्यामध्ये मृतांना बंदुकांची सलामी दिली जाते. हे एक सांकेतिक अंतिम निरोप मानला जातो जो देशाकडून दिला जातो. हा सार्वजनिक कार्यक्रम असतो ज्यामध्ये जनता सुद्धा सहभागी होते.
अखेर जुलैमध्ये काय झाले होते?
खरंतर जुलै महिन्यात शिंजो आबे यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले होते आणि त्यांना दफन करण्याची प्रक्रिया सुद्धा पूर्ण झाली होती. त्यावेळी जे अंतिम संस्कार झाले होते त्याला खासगी फ्यूनरल असे म्हटले जाते. ज्यामध्ये फक्त घरातील आणि खास लोकच भाग घेतात. आता स्टेट फ्युनरलमध्ये जनता, त्यांचे चाहते, दुसऱ्या देशातील प्रतिनिधी सुद्धा सहभागी होतात आणि त्यांना राजकिय सन्माने अंतिम निरोप दिला जातो.(Shinzo abe funeral)
हे देखील वाचा- जेव्हा सम्राटांवर झाला होता तीनवेळा जीवघेणा हल्ला, जापानमधील राजकीय हत्यांचा इतिहास पहा
का विरोध केला जातोय?
आता प्रश्न असा उपस्थितीत होतोय की, या अंतिम संस्काराला विरोध का केला जातोय? खरंतर यामागे असे कारण आहे, जनतेचे असे म्हणणे आहे आता राजकिय अंतिम संस्कार करणे म्हणजे पैशांचा चुकीचा वापर करणे. तसेच या कार्यक्रमांच्या माध्यमातून टॅक्सच्या पैशांचा सुद्धा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात आहे. याआधी सुद्धा अशा प्रकरणांमध्ये कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र सरकारचे असे म्हणणे आहे की, देशाच्या बड्या नेत्याला सन्मान देणे आवश्यक आहे.
१९६७ नंतर हा विधि प्रथमच होणार
वर्ष १९६७ नंतर पहिल्यांदाच राजकिय सन्मानासह अंतिम संस्कार केले जाणार आहे. त्यावेळी राहिलेले पंतप्रधान Yoshida Shigeru यांच्यावर राजकिय अंतिम संस्कार करण्यात आले होते तर आता शिंजो आबे जापानचे दुसरे पंतप्रधान असतील.