शिन नावाच्या चिनी महिलेला थायलंडमध्ये अटक करण्यात आली आहे. सुरुवातीला शिनला अटक केल्यावर मुदत संपून देशात वास्तव्य केल्याचा गुन्हा तिच्यावर नोंदवणा-या पोलीस अधिका-यांना एकामागून एक अशा गुन्ह्यांची माहिती मिळू लागली, की त्यांचे डोके चक्रावले. शिन ही अट्टल गुन्हेगार असून तिच्यावर तब्बल 1.5 मिलियन युआन म्हणजे 1.77 कोटी फसवणुकीचा आरोप आहे. शिननं आपल्या सख्या भावाचीही फसवणूक केली आहे. महिलांना विमान कंपनीत नोकरी देण्याचे खोटे आश्वासन देऊन ती त्यांच्याकडून पैसे उकळायची. मग या पैशातूनच शिन आपली ओळख लपवायची. म्हणजेच आपल्या चेह-यावर शिन प्लॅस्टीक सर्जरी करुन घ्यायची. असेच पैशाचे अनेक गैरव्यवहार शिनने केले असून तिला चीनमधील पोलीसही शोधत होते. तिला थायलंडमध्ये विनापरवाना राहिल्याबद्दल आणि गुन्हे केल्याबद्दल अटक झाली आहे. मात्र शिनही चीनचीही गुन्हेगार असल्यामुळे तिला दोन्ही देशातील कायद्याप्रमाणे शिक्षा होणार आहे. आता पुढचे सगळे आयुष्य तिला तुरुंगात रहावे लागणार आहे. (Shin)
एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखी शिन या चीनी महिलेची कहाणी आहे. चोरी करायची आणि त्याच पैशातून आपली ओळख लपवत मजा करायची, असा शिनचा पायंडा होता. आतापर्यंत शिनने फसलेल्यांमध्ये महिलांची संख्या अधिक आहे. तिचा पोलीस दोन वर्षांपासून शोध घेत होते. ती आपले नाव बदलून थायलंडमध्ये रहात होती. मात्र तेथील शेजा-यांना तिच्या हालचालीमुळे शंका आली आणि त्यांनी पोलीसांना तिची माहिती दिली. पोलिसांनी मिळालेल्या या माहितीनुसार त्यांनी बॅंकॉकमधील या 30 वर्षाच्या महिलेवर पाळत ठेवली. ही महिला त्यांना अनेकवेळा आपला चेहरा झाकतांना दिसली. सुरुवातीला पोलीसांना ती बेकायदेशीर स्थलांतरित झालेली असावी असा संशय आला. तिची अधिक चौकशी करण्यासाठी पोलीस अधिकारी शिनच्या निवासस्थानी गेले. (International News)
तेव्हा शिन काही खरेदीचे निमित्त करुन बाहेर जाण्याच्या तयारीत होती. पोलीसांनी शिनकडून पासपोर्टची मागणी केली. तिच्याकडचा पासपोर्ट हा रद्द झाल्याचे आढळले. शिन ही 2022 च्या उत्तरार्धात थायलंडमध्ये पर्यटक म्हणून आली होती आणि तिच्या व्हिसाची मुदत 650 दिवस आधी संपली असल्याचे लक्षात आले. तेव्हापासून शिन थायलंडमध्ये आपली ओळख बदलून रहात होती. त्यानंतर पोलीसांनी शिनला ताब्यात घेतले आणि तिची चौकशी सुरु झाली. त्यातून बाहेर आलेल्या माहितीने पोलीसही चक्रावले आहेत. पोलीस चौकशीतून स्पष्ट झालं की शिन ही गेल्या दहा-बारा वर्षापासून सराईत गुन्हेगार म्हणून काम करत आहे. चीनमध्ये तिच्या विरोधात नोटीसही जारी करण्यात आली आहे. 2016 ते 2019 दरम्यान फ्लाइट अटेंडंट म्हणून काम मिळवून देण्याच्या आश्वासनावर तिने चीनमध्ये सहा महिलांची फसवणूक केली होती. त्यांच्याकडून बक्कळ पैसे शिनने घेतले होते. पैसे मिळाल्यावर या महिलांबरोबरचे सर्व संपर्क तिने तोडून टाकले आणि आपला चेहरा प्लॅस्टिक सर्जरीच्या सहाय्चानं बदलला. त्यानंतर शिन थायलंडला पर्यटक म्हणून आली होती, आणि तिथेच ती नाव बदलून रहात होती. (Shin)
======
हे देखील वाचा : फटाके म्हणजे चायना ?
====
शिनच्या नावावर इंटरपोलची ब्लू नोटीसही जाहीर करण्यात आली आहे. ती फसवणूक करण्यात एवढी तरबेज आहे, की तिनं आपल्या भावालाही काही लाखांसाठी फसवले आहे. जपानमधील एका मित्राला घड्याळ पाठवायचे आहे, असे सांगून तिने आपल्या भावाकडून साडेसहालाख रुपये उधारीवर घेतले होते. मात्र ते देण्याआधीच तिनं चीनमधून पळ काढला. शिनने या सर्वांसाठी चीनमधील एका प्रख्यात एअरलाईन्सचे सगळे पेपर तयार केले होते. त्याआधारे तिने 2016 ते 2019 दरम्यान सहा महिलांना एअरलाइन्समध्ये फ्लाइट अटेंडंट म्हणून पद देण्याचे आश्वासन दिले. शिवाय तिने स्वतःचा फ्लाइट अटेंडंट म्हणून बनावट प्रोफाइलही तयार केला होता. त्यात ती अनेकदा वेगवेगळ्या परदेशी ठिकाणांचे फोटो पोस्ट करत असे. या गुन्ह्यांची चर्चा सुरु झाल्यावर शिनने आपल्या चेह-यावर प्लॅस्टिक सर्जरी केली आणि थायलंडला ती रवाना झाली. आता शिनवर चीन आणि थायलंड या दोन्ही देशातील कायद्याप्रमाणे गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. थायलंडमध्ये ती बेकायदेशीर रहात होती, त्यानुसार तिला शिक्षा होणार आहे. त्यानंतर तिला चीनच्या ताब्यात देण्यात येईल, तिथे तिला एअर लाईन्सचे खोटे पेपर तयार केल्याबद्दल आणि फसवणूक केल्याबद्दल शिक्षा होणार आहे. (International News)
सई बने