टेलिव्हिजन विश्वातील सर्वात जास्त चर्चेत असणारी आणि आपल्या बिनधास्त वक्तव्यांमुळे ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे शिल्पा शिंदे (Shilpa Shinde). अनेक मालिकांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवलेल्या शिल्पाला ‘भाभी जी घर पर हैं’ या मालिकेने तर यशाच्या शिखरावर पोहचवले. या मालिकेनंतर शिल्पाने बिग बॉस ११ मध्ये प्रवेश केला आणि हा विवादित शो जिंकला देखील. शिल्पाने तिच्या आयुष्यात नेहमीच संघर्ष केला आणि पाहिला देखील. व्यावसायिक आणि वैयक्तिक दोन्ही आयुष्य तिचे संघर्षातच गेले. खूप कमी लोकांना माहित असेल की, शिल्पाचे ठरलेले लग्न तुटले होते. साखरपुडा झाल्यानंतर तिचे लग्न तुटले. शिल्पाने टीव्ही अभिनेता असलेल्या रोमित राजला तिच्या जीवनाचा साथीदार म्हणून निवडले होते. या घटनेला आज अनेक वर्ष उलटली असली तरी यातून शिल्पा आजही बाहेर पडलेली नाही. नुकतेच एका मुलाखतीमध्ये तिने याबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले.
एका मुलाखतीमध्ये शिल्पाने (Shilpa Shinde) सांगितले की, “माझे आणि रोमित राजचे नाते तुटल्यानंतर माझ्या कुटुंबाने आणि जवळच्या मित्रमंडळींनी मला पुन्हा लग्नासाठी तयार करण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र मला माझ्या मनाने नेहमीच माझ्यासाठी उत्तम निर्णय घेण्यासाठी मदत केली.” शिल्पाने तिचा साखरपुडा यासाठी मोडला होता कारण तेव्हा ती खूपच लहान होती आणि तिला तिच्या करिअरमध्ये अनेक शिखरं गाठायची होती.
या तुटलेल्या नात्याबद्दल बोलताना शिल्पा (Shilpa Shinde) म्हणाली की, “रोमित आणि माझा साखरपुडा खूपच आधी झाला होता आणि तेव्हा मी खूपच लहान होती. मी तेव्हा संसारात पडू इच्छित नव्हते. मात्र माझ्या आजूबाजूच्या लोकांना वाटत होते की, माझे हेच लग्नासाठी योग्य वय आहे. त्यानंतर रोमित आणि माझ्यामध्ये काही गोष्टी जुळल्या नाहीत आणि आमचे नाते तुटले.”
रोमितसोबत नाते तुटल्यानंतर शिल्पा (Shilpa Shinde) पुन्हा एकदा प्रेमात पडली होती याचा खुलासा करताना तिने सांगितले, “रोमितसोबत माझे नाते तुटल्यानंतर मी पुन्हा एकदा एका व्यक्तीच्या प्रेमात पडले होते. मात्र दुर्दैवाने ते नाते देखील पूर्ण झाले नाही. त्यानंतर मी तिच्या करिअरवर लक्ष केंद्रीत करण्याचे ठरवले. तसे पहिले तर एकटे राहण्याचे देखील अनेक फायदे आहेत. तुम्ही कोणाला उत्तर देण्यास बंधनकारक नसतात. तुम्हाला पाहिजे ते करू शकतात.”
======
हे देखील वाचा – सोशल मीडियावर सोनू सूदच्या फॅनने असे काही केले अभिनेता म्हणाला, ‘हा नक्कीच पावती फाडून घेणार’
======
पुढे शिल्पाने (Shilpa Shinde) या मुलाखतीमध्ये सांगितले की, “आज मी अनेक नात्यांना तुटताना पाहिले आहे. मला समजत नाही की, दहा दहा वर्ष नात्यात राहूनही नाते तुटताना विचार जुळत नसल्याचे कारण कसे काय देऊ शकतात. आज भलेही माझ्या कुटुंबाची इच्छा आहे की, मी लग्न करावे आणि सेटल व्हावे. मात्र मला अजिबात लग्न करण्याची घाई नाही. जर मला भविष्यात कोणी मिळाला तरी मी त्या नात्याला लेबल लावण्याची अजिबात घाई करणार नाही.” सध्या शिल्पा कुठेही दिसत नसली तरी लवकरच ती काही प्रोजेक्ट्स मधून समोर येणार आहे.