प्रत्येक महिन्यात एकादशी तिथी येते. एका महिन्यात दोन अशा वर्षभरात २४ एकादशी तिथी येतात. नुकतीच २०२६ या नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. या नवीन इंग्रजी वर्षातली पहिली एकादशी साजरी होणार आहे. १४ जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी या नवीन वर्षातली पहिली ‘षटतिला एकादशी’ असणार आहे. एकादशी ही तिथी भगवान विष्णूला समर्पित असून, या दिवशी विष्णू पूजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वर्षातल्या सर्व एकादशी व्रतांमध्ये षट्तिला एकादशीचे व्रत विशेष महत्त्वाचे आणि खास आहे. कारण या व्रतादरम्यान विष्णूची तीळाने पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी तिळाचे ६ उपाय पूजेत वापरले जातात. म्हणूनच या व्रताला षट्तिला एकादशी म्हणतात. (Ekadshi)
षटतिला एकादशी मुहूर्त
२०२६ सालातली पहिली षटतिला एकादशी बुधवार १४ जानेवारी रोजी आहे. या दिवशी मकर संक्रांतीचा सण देखील आहे. पंचांगानुसार, माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीची सुरुवात मंगळवारी १३ जानेवारी रोजी दुपारी ०३.१७ मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ही तिथी १४ जानेवारी रोजी संपणार आहे. उदय तिथीनुसार षटतिला एकादशीचे व्रत १४ जानेवारी पाळले जाणार आहे. या दिवशी ब्रम्ह मुहूर्त सकाळी ०५.२७ ते ०६.२१ पर्यंत असणार आहे. तर विजय मुहूर्त हा दुपारी ०२.१५ ते सकाळी ०२:५७ पर्यंत असेल. गोधुली मुहूर्त संध्याकाळी ०५:४३ ते संध्याकाळी ०६:१० पर्यंत राहील. यानंतर निशिता मुहूर्त १५ जानेवारी रोजी सकाळी १२:०३ ते १२:५७ पर्यंत असेल. (Marathi News)

मुख्य म्हणजे यंदा षटतिला एकादशीच्या दिवशी एक खास योग तयार होत आहे. यावर्षी मकर संक्रांती आणि एकादशी एकाच दिवशी येत आहेत. १४ जानेवारी रोजी मकर संक्रांती आणि षटतिला एकादशी व्रताचा दुर्मिळ योगायोग १४८ वर्षांनंतर घडणार आहे. १४ जानेवारीच्या रात्री सूर्य मकर राशीत संक्रमण करेल. ही एकादशी भगवान विष्णूंना समर्पित आहे, तर संक्रांती हा सूर्यदेवाला समर्पित सण आहे. या खास दिवशी स्नान, दान आणि जप करणे हे सामान्य दिवसांपेक्षा कितीतरी पटीने अधिक फायदेशीर मानले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी नानाविध गोष्टी दान केल्या जातात. (Top Marathi News)
या एकादशीला षटतिला एकादशी का म्हणतात?
षटतिला एकादशीला सहा क्रिया केल्या जातात. तीळ स्नान, तीळ उटणे, तीळ हवन, तीळ तर्पण, तीळ अन्न आणि तीळ दान. या सहा क्रियांमुळेच या एकादशीला षटतिला एकादशी म्हटले जाते. धार्मिक शास्त्रांनुसार, षटतिला एकादशीचे व्रत हजारो वर्षांच्या तपश्चर्येनंतर आणि सोने दान केल्यानंतर मिळणाऱ्या पुण्यपेक्षा जास्त पुण्य मिळवते. या दिवशी तीळ पूजा, हवन, प्रसाद, स्नान, दान, अन्न आणि तर्पण मध्ये वापरले जातात. या दिवशी तीळ दान करण्याची परंपरा असल्याने याला षटतिला एकादशी म्हणतात. (Latest Marathi Headline)
हिंदू धर्मामध्ये षटतिला एकादशीचे विशेष महत्त्व आहे. भगवान विष्णूंची पूजा करण्यासोबतच तिळाचे दान करणे ते सेवन केल्याने अनेक पटीने त्याचे फायदे होतात. या एकादशीचे महत्त्व त्याच्या नावातच लपलेले आहे – शत म्हणजे सहा आणि तिळ म्हणजे तीळ. या दिवशी सहा वेगवेगळ्या प्रकारे तीळ वापरणे खूप शुभ मानले जाते. यावेळी तिळाशी संबंधित उपाय करणे खूप फायदेशीर असल्याचे मानले जाते. पुराणात असे ही सांगितले आहे की, या दिवशी जितके तीळ तुम्ही दान कराल, तेवढ्या पापातून तुम्हाला मुक्ती मिळेल. (Top Trending News)
=========
Angarki Chaturthi : २०२६ सालातील पहिलीच अंगारकी संकष्टी, जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व
=========
षटतिला एकादशी भगवान विष्णूच्या प्रिय एकादशीपैकी एक मानली जाते. या व्रतामुळे सर्व मनोकामनांची पूर्तता होवून घरात सुख-समृद्धी येते, अशी मान्यता आहे. या व्रतामुळे दुःख आणि गरिबी यापासून मुक्ती मिळते असेही म्हणतात. समजा तुम्ही षटतिला एकादशीचे व्रत करु शकला नाहीत तर फक्त कथा ऐकल्याने वाजपेय यज्ञाच्या समान पुण्य मिळते असे सांगितले जाते. या व्रतामुळे मानसिक आणि शारीरिक पापांपासून मुक्ती मिळते. या दिवशी विष्णू पूजा करताना “कृष्ण कृष्ण संसारा्णवममानां कृपालुस्त्वमगतीनां गतिर्भव । प्रसीद पुरुषोत्तम॥। नमस्ते पुण्डरीकाक्ष नमस्ते विश्वभावन। सुत्रह्मण्यप नमस्तेउस्तु महापुरुष पूर्वज॥। गृहाणार्घ्य मया दत्त लक्ष्म्या सह जगत्पते” या मंत्राचा जप करावा. (Social News)
(टीप – येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. आम्ही या माहितीचे समर्थन करत नाही. कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
