६९ वर्षांपर्यंत सिनेमांमध्ये सक्रिय राहणारी प्रसिद्ध अभिनेत्री शशिकला यांचे आयुष्य सिनेमातील कथेप्रमाणेच आहे. त्यांनी १९३६ ते २००५ पर्यंत सिनेमांमध्ये काम केले. लीड अभिनेत्री ते आई, आजीच्या भुमिकांमध्ये ही त्या दिसून आल्या, पण ४ एप्रिल २०२१ मध्ये त्यांनी वयाच्या ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. जुन्या काळातील अभिनेत्री शशिकला यांनी आजच्या काळातील सुपरस्टार शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यासोबत ही काम केले आहे. त्यानंतर ‘बादशाह’ मध्ये शाहरुखच्या आईची भुमिका साकारली होती. तर ‘मुझसे शादी करोगी’ मध्ये सलमान खानच्या आजीच्या भुमिकेत त्या दिसून आल्या.(Shashikala Life Story)
परंतु काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे दावे केले गेले की, शशिकला यांनी आपल्या आयुष्यात अनेक दु:खाचा सामना केला आहे. असे म्हटले जाते की, तिच्या घरातील मंडळी खुप श्रीमंत होते. परंतु तिच्या वडिलांनी सर्व पैसे हे त्यांच्या लहान भावाच्या शिक्षणासाठी खर्च केले. त्यांनी आपल्या लहान मुलाला शिक्षणासाठी लंडनला पाठवले. दरम्यान, असे त्यांनी आपल्या परिवाराच्या चांगल्यासाठीच केले होते.
त्याचसोबत शशिकला यांच्या काकांना उत्तम नोकरी सुद्धा मिळाली आणि उत्तम पगार ही मिळू लाला. परंतु तेव्हा ते त्यांच्या परिवाराला विसरले आणि दुसऱ्या बाजूला शशिकला यांचा व्यवसाय ठप्प झाला. त्यामुळे त्यांचा परिवार दिवाळखोर झाला. घराची स्थिती अत्यंत वाईट झाली होती की, खाण्यासाठी काहीच नव्हते. संपूर्ण परिवाराला ८-१० दिवस खाण्यासाठी तडफडत होता.
अशातच त्यांना दुसऱ्यांच्या घरात काम करावे लागले. त्यांनी आपल्या आपल्या मुलाखतीत असे म्हटले होते की, नोकराणीचे काम करताना त्यांची मुलाखत त्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री नूरजहा यांच्यासोबत झाली. नूरजहा यांना शशिकला फार आवडल्या. त्यांनी आपल्या पतिला सांगून शशिकला यांना सिनेमांमध्ये काम मिळवून दिले. त्यानंतर १९४५ मध्ये जीनत मध्ये शशिकला पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झकळल्या. या सिनेमासाठी त्यांना २५ रुपये मानधन मिळाले होते.(Shashikala Life Story)
हे देखील वाचा- ९० च्या दशकातील ‘ह्या’ होत्या बॉलिवूड मधील कॉन्ट्रोवर्शियल रिलेशनशिप
सिनेमांमध्ये आल्यानंतर त्यांनी ओम प्रकाश सहगल यांच्यासोबत वयाच्या १९ व्या वर्षी लग्न केले. लग्नानंतर शशिकला यांना दोन मुली झाल्या. मात्र काही काळानंतर त्यांचे पतीशी वाद होऊ लागले. त्यामुळे नवऱ्याला सोडून दिले आणि एका व्यक्तीसोबत परदेशात गेल्या. त्याच्यासोबत ही शशिकला यंचे पटले नाही. त्या पुन्हा परतत भारतात आल्या. घर-परिवाराला सोडून एखाद्यासोबत परदेशात जाणे ही शशिकला यांनी आपल्या आयुष्यातील सर्वाधिक मोठी चुक असल्याचे मान्य केले होते.