येत्या काही दिवसांमध्ये शारदीय नवरात्राची सुरुवात होत आहे. शारदीय नवरात्रीची स्थापना अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला केली जाते. या काळात नऊ दिवस देवीच्या नऊ विविध रुपांची पूजा केली जाते. या काळात भाविक मनोभावे देवीची पूजा करत उपवास करतात. यंदा येत्या २२ सप्टेंबरपासून नवरात्रीची सुरुवात होणार आहे. आदिशक्तीने महिषासुर राक्षसाचा वध नऊ दिवस युद्ध करून दहाव्या दिवशी केल्याने नवरात्र साजरे केले जाते. वर्षातला सर्वात मोठा सण म्हणून नवरात्रीला ओळखले जाते. (Shardiy Navratra 2025)
भारतात नवरात्र मोठ्या जल्लोषात साजरे केले जाते. महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल, उत्तर भारतात नवरात्रीचा उत्साह पाहण्याजोगा असतो. महाराष्ट्रामध्ये नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीची उपासना केली जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रामध्ये घटस्थापना केली जाते. या दिवशी घट बसवून त्यांची नऊ दिवस पूजा करतात. यंदा घटस्थापनेच्या तारीख आणि मुहूर्त कधी आहे चला पाहूया. (Marathi News)
आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाातील प्रतिपदा तिथीची सुरुवात २२ सप्टेंबर रोजी पहाटे १.२३ वाजता होणार आहे या तिथीची समाप्ती २३ सप्टेंबर रोजी पहाटे २.५५ वाजेता होईल. शारदीय नवरात्रीला घटस्थाापनेसाठी मुहूर्त नवरात्रीमध्ये घटस्थापनेसाठी शुभ मुहूर्त सकाळी ६.०० ते ८.०० वाजेपर्यंत असेल. या शुभ मुहूर्तात घटस्थापना करता येईल. यानंतर अभिजित मुहूर्ताचा काळ हा सकाळी ११.४९ ते दुपारी १२.३८ पर्यंत राहील. (Todays Marathi Headline)
यंदाचे नवरात्र खास असणार आहे. नवरात्रीची सुरुवात २२ सप्टेंबर २०२५ पासून होणार असून, २ ऑक्टोबर २०२५ रोजी विजयादशमीच्या दिवशी नव्रतारीची समाप्ती होईल. अर्थात हा उत्सव यंदा नऊ नव्हे तर दहा दिवसांचा असणार आहे. त्याचे कारण म्हणजे यंदा तृतीया तिथी ही दोन दिवस असणार आहे. म्हणजेच २४ आणि २५ सप्टेंबर रोजी दोन्ही दिवस तृतीया तिथी असणार आहे. त्यामुळेच यंदा ११ व्या दिवशी विजयादशमी म्हणजेच दसरा असणार आहे. (Top Marathi News)
नवरात्रीमध्ये उपवास देखील केले जातात. काही ठिकाणी पूर्ण नऊ दिवस उपवास केले जातात तर काही ठिकाणी पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करण्याची पद्धत आहे. महाराष्ट्रामध्ये नवरात्रीत घट बसवले जातात. मग घट म्हणजे नक्की काय असते? आणि ते कसे बसवतात चला जाणून घेऊया. (Latest Marathi News)
घट म्हणजे देवीची स्थापना. घटस्थापना करताना कलशाची स्थापना करण्यासाठी मातीच्या ताटात, पत्रावळीत प्रथम माती टाकावी, त्यात सात प्रकारचे धान्य टाकावे आणि वरून थोडी माती टाकावी. कलशात (घट) पाणी भरून त्या पाण्यात सुपारी, अक्षता आणि नाणे टाकावे. नंतर कलशाच्या काठावर पाच विड्याची किंवा आंब्याची पाने ठेवावीत. त्यावर नारळ ठेवावे. हा कलश माता दुर्गेच्या पूजेसाठी स्थापित केला जातो. अनेक घरांमध्ये या घटावर माल देखील लावली जाते. ही माळ विविध फुलांची माळ, विड्याच्या पानांची माळ किंवा फक्त झेंडूच्या फुलांची माल लावली जाते. सोबतच नऊ दिवस अखंड दिवा देखील लावला जातो. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये नवरात्रीमध्ये फुलोरा देखील बांधला जातो. (Top Trending News)
========
Vishwakarma Puja : भाद्रपदामध्ये साजऱ्या होणाऱ्या भगवान विश्वकर्मा जयंतीचे महत्व
========
या काळात भाविक नऊ दिवस उपवास करतात तर काही जण उठता बसता उपवास करतात. दुर्गा सप्तशतीचे पठण करतात आणि शैलपुत्रीपासून सिद्धिदात्रीपर्यंत देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. अष्टमीला कन्यापूजन केले जाते. हळदी कुंकू देखील केले जाते. नवरात्र म्हणजे स्त्री शक्तीचा जागर असल्याने याकाळात स्त्रियांसाठी देखील विविध स्पर्धांचे, कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. (Social News)
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कोणताही दावा करीत नाही.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics