सध्या संपूर्ण देश देवीच्या भक्तीने न्हाऊन निघाला आहे. प्रत्येक राज्यात, शहरात, जिल्ह्यात, गावात फक्त देवीची आराधना आणि देवीची सेवा सुरु आहे. नवरात्राच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या नऊ विविध रूपांची पूजा केली जाते. नवरात्र म्हणजे स्त्री शक्तीचा जागर असतो. हे नवरात्र जरी संपूर्ण देशात साजरे केले जात असले तरी या सणाचे स्वरूप हे राज्यावर, शहरानुसार वेगवेगळे आहे. जिथे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये घट बसवले जातात अखंड ज्योत लावली जाते तिथे बंगालमध्ये देवी दुर्गाची पूजा केली जाते. महाराष्ट्रामध्ये घटस्थापनेपासूनच नवरात्राला सुरुवात होते. मात्र बंगालमध्ये नवरात्रातील सप्तमीपासून दुर्गा पूजेची सुरुवात होते. (Bangal)
बंगालमधील दुर्गा पूजा संपूर्ण भारतात किंबहुना जगात प्रसिद्ध आहे. बंगाली लोकांमध्ये दुर्गापूजेला मोठे महत्व आहे. आपल्याकडे नवरात्र नऊ दिवस साजरे केले जाते मात्र बंगालमध्ये नवरात्र किंवा दुर्गा पूजा चारच दिवस करतात. बंगालमध्ये शेकडो वर्षांपासून दुर्गापूजा होत आहे. असे म्हटले जाते की दुर्गापूजेचे आयोजन करण्याची प्रथा बंगालपासून देशाच्या इतर भागात पसरली. आजही पश्चिम बंगालसारखी दुर्गापूजा कुठेही होत नाही. या काळात संपूर्ण बंगालचे रूप बदलून जाते आणि दुर्गामय होते. दुर्गा पूजा बंगालमधील सर्वात मोठा उत्सव आहे. या काळात शहरं, गावं सर्वच मोठ्या उत्साहात असतात. बाजारपेठा देखील फुललेल्या असतात. बंगालमधील या दुर्गा पूजेचे सर्वात मोठे आणि प्रमुख आकर्षण म्हणजे मोठे आणि भव्य दिव्य डोळे दिपवणारे पंडाल. दरवर्षी उत्सव मंडळे विविध थीम वापरून हे पंडाल बनवतात. दुर्गामाता नवरात्रात आपल्या घरी येते म्हणजे तिच्या माहेरी येते. अशी मान्यता आहे. (Marathi)
बंगाली संस्कृतीमध्ये नवरात्राच्या सातव्या दिवसापासून अर्थात सप्तमीपासून ते दसऱ्यापर्यंत अर्थात दशमीपर्यंत दुर्गादेवीची पूजा केली जाते. सातव्या दिवशी दुर्गामातेची भव्य मूर्ती मोठमोठ्या पंडालमध्ये स्थापित करून दशमीपर्यंत तिची पूजा करण्याची पद्धत आहे. आजही ही दुर्गापूजा अगदी पारंपरिक पद्धतीनेच साजरी होते. दुर्गा देवीची अतिशय मोठी आणि भव्य प्रतिमा मूर्तीकारांकडून तयार करून घेतली जाते. या दुर्गा देवीच्या मूर्तीसोबतच गणपती, कार्तिकेय, सरस्वती आणि लक्ष्मी यांच्या मूर्ती देखील तयार करून घेतल्या जातात. एका मोठ्या आडव्या पाटावर या मूर्तींची मांडणी केली जाते. या मुर्त्यांमागे एक मोठी कमान देखील उभी केली जाते. (Durga Puja)
==========
Navratri : नवरात्रीमध्ये केल्या जाणाऱ्या कुंकुमार्जनाचे महत्व
==========
बंगालमध्ये दुर्गा पूजा कशी सुरु झाली?
एक कथा अशी आहे की पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजा उत्सव १७५७ च्या प्लासीच्या युद्धानंतर सुरू झाला. प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी मिळवलेल्या विजयाबद्दल देवाचे आभार मानण्यासाठी पहिल्यांदा दुर्गापूजेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले जाते. बंगालचा शासक नवाब सिराज-उद-दौला प्लासीच्या युद्धात पराभूत झाला. बंगालमधील मुर्शिदाबादच्या दक्षिणेस २२ मैलांवर गंगेच्या काठावर प्लासी नावाचे ठिकाण आहे. येथे २३ जून १७५७ रोजी नवाबाचे सैन्य आणि इंग्रज यांच्यात युद्ध झाले होते. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याने रॉबर्ट क्लाइव्हच्या नेतृत्वाखाली युद्ध केले आणि नवाब सिराज-उद-दौलाचा पराभव केला. (Marathi Treding News)
वास्तविक, युद्धापूर्वी, कट रचून, रॉबर्ट क्लाइव्हने नवाबातील काही प्रमुख दरबारी आणि शहरातील श्रीमंत सेठांना आपल्यासोबत घेतले होते. असे म्हणतात की युद्धातील विजयानंतर रॉबर्ट क्लाइव्हला देवाचे आभार मानायचे होते. पण युद्धादरम्यान नवाब सिराज-उद-दौला याने परिसरातील सर्व चर्च उद्ध्वस्त केल्या. त्यावेळी इंग्रजांचे वकील राजा नव कृष्णदेव पुढे आले. त्यांनी रॉबर्ट क्लाइव्हसमोर भव्य दुर्गापूजेचे आयोजन करण्याचा प्रस्ताव ठेवला. रॉबर्ट क्लाइव्हनेही या प्रस्तावाला होकार दिला. त्याच वर्षी कोलकाता येथे प्रथमच भव्य दुर्गापूजेचे आयोजन करण्यात आले होते. (Top Stories)
चोखूदान विधी
कोलकातामधील प्रमुख सण म्हणून दुर्गापूजा सण साजरा केला जातो. हा सण साजरा करण्यासाठी आजही खास रितीरिवाज आणि परंपरा आहेत. त्यानुसारच हा सण साजरा केला जातो. नवरात्र सुरु आधी दुर्गा मातेची मूर्ती तयार करून रंगवली जाते. संपूर्ण मूर्ती जरी तयार झाली असली तरी देवीच्या मातेच्या डोळ्यांना रंग दिला जात नाही. महालयाच्या दिवशी दुर्गामातेची यथासांग पूजा करून तिला पृथ्वीवर येण्याचे रीतसर आमंत्रण दिले जाते. आणि मग त्याच शुभ मुहुर्तावर देवीच्या मूर्तीवर डोळे साकारले जातात. या शुभ विधीला चोखूदान असे म्हणतात. याचा अर्थ आहे नेत्रदान असा होतो. देवी याच दिवशी धर्तीवर प्रवेश करते अशी मान्यता आहे. कोलकातामध्ये कुमारतुली नावाचा एक परिसर आहे. ती कुंभारांची वस्ती असून तिथे संपूर्ण भागात दुर्गामातेच्या मूर्ती साकारल्या जातात. (Navratri)
दुर्गामातेचे माहेरपण
आपल्याकडील नवरात्रीचा सातवा दिवस म्हणजे कोलकात्यातील दुर्गा पूजेचा पहिला दिवस असतो. दुर्गा देवी ही पार्वती मातेचा अवतार मानली जाते. आणि म्हणूच जेव्हा देवी माहेरी येते तेव्हा ती आपल्या संपूर्ण कुटुंबासह येते. अर्थात दुर्गादेवीसोबत तिचे पती भगवान शिव शंकर आणि दोन्ही मुले गणपती, कार्तिकेय देखील असतात. सुंदर आणि आकर्षक देवीच्या मूर्तींची घरी आणि सार्वजनिक पंडालमध्ये आणली जाते. दुर्गा देवीच्या मूर्तीला फुले, वस्त्र, दागिने आणि सिंदुर याने सजवले जाते. देवीसमोर अनेकविध मिठाई ठेवल्या जातात. (Todays Marathi Headline)
कोलाबोखीरास
दुर्गामातेची मूर्ती आणल्यानंतर तिची प्राणप्रतिष्ठा केली जाते. सप्तमीच्या दिवशी ही पूजा केली जाते. याला बंगाली भाषेमध्ये “कोलाबोखीरास” किंवा “कोला बौ” असे म्हणतात. नवरात्रीच्या सातव्या दिवशी पहाटेपासून हे विधी सुरु होतात. केळीच्या झाडाला नदीवर नेले जाते, स्नान घालून, लाल किनार असणारी साडी नेसवली जाते. अतिशय उत्साहाच्या वातावरणात देवीची मिरवणूक काढून वाजत गाजत विधीवत सजवलेले केळीचे झाड पंडाल किंवा घरात आणले जाते. त्यानंतर ते झाड देवीच्या बाजूला उभे करून ठेवले जाते. (Top Marathi News)
कुमारीपुजा
कुमारीपुजा ही प्रथा बंगालमध्ये महत्वाची मानली जाते. कुमारीकांची नऊ दिवस पूजा केली जाते. या प्रथेची सुरुवात स्वामी विवेकानंदांच्या बेलूर मठात झाली असल्याचे सांगण्यात येते. दुर्गा देवीचे रौद्र रूप आणि सौम्य अशी दोन रूपं आहेत. आणि ही दोन्ही रूपं आपल्याला बंगालमधील दुर्गापूजेत पहायला मिळतात. (Latest Marathi Headline)
महागौरी आणि चंडी पूजा
अष्टमीच्या दिवशी देवीने महागौरीचे रूप घेतल्यामुळे तिची महागौरी रूपात पूजा केली जाते. यानंतर नवमीला चंडी पूजा असते. देवीने चामुंडाचे रूप घेतल्याने चंडी पूजा केली जाते असे म्हणतात. या दिवशी देवीला विशेष ‘नीट भोग’ चढवला जातो. यात भात, वरण, भाजी, चटणी आणि पायस या गोड पदार्थाचा समावेश असतो. तसेच सामिष भोजन देखील मातेला अर्पण केले जाते. बंगाली संस्कृतीत हिल्सा किंवा इलिश मासे महत्त्वपूर्ण असतात. दुर्गापूजामध्ये देखील याचा देवीला नैवेद्य दाखवला जाते. (Top Trending Headline)
ढोल वादन, सिंदुर उत्सव
नवरात्रात दररोज ढोल वादन केले जाते. बंगाली स्त्रिया एक अतिशय खास तोंडावर बोट फिरवत “उलु” ध्वनी काढतात. हा आवाज अत्यंत शुभ मानला जातो. विजयादशमीच्या दिवशी देवीला मध-दुधाचा नैवैद्य असतो. त्याला “चरणमिर्ती” असे म्हणतात. याच दिवशी स्त्रिया ‘सिंदुर उत्सव’ साजरा करतात. सोप्या शब्दात सांगायचे तर सवाष्ण महिला सिंदूराने होळी खेळतात. (Top Marathi Headline)
माहेरवास झाल्यानंतर पुन्हा आपली पतीगृही जाण्यास निघालेल्या दुर्गा देवीला डोक्याला सिंदूर लावला जातो. याला “कनक अंजली” म्हणतात. त्यानंतर सुरुवात होते उत्तर पूजेची. उत्तर दिशेला कलश ठेवून त्यात फुले ठेवली जातात. त्यानंतर मातेची प्रतिमा विसर्जनासाठी बाहेर काढली जाते. दुर्गा मातेला सोबत खाण्या-पिण्याचे पदार्थ दिले जातात. त्याची एक पोटली सोबत दिली जाते. शिवाय दुर्गा मातेसोबत श्रृंगाराच्या वस्तूही दिल्याही जातात. या प्रथेला “बोरन” असे म्हणतात. या दुर्गा पूजेच्या काळात बंगालमध्ये जाऊन हा सोहळा याची देही याची डोळा बघणे खरंच खूपच सुंदर आणि समाधानकारक असते. (Latest Marathi News)
दुर्गा देवीसाठी नैवेद्य
नवरात्रीच्या काळात बरेच लोक नऊ दिवस उपवास करतात आणि फक्त सात्विक, शाकाहारी अन्न खातात. शरीर आणि मन शुद्ध करण्याचा हा एक मार्ग मानला जातो. दुसरीकडे दुर्गा पूजा पूर्णपणे उलट आहे. इथं स्वादिष्ट अन्नाची मेजवानी आहे. रसगुल्ला, संदेशसारख्या बंगाली मिठाई आणि खिचडी, फिश फ्राय इत्यादी विविध पदार्थ लोकांना दिले जातात. (Top Trending News)
========
Navratri : दुर्गा सप्तशतीचे पाठ कधी आणि कसे करावे?
Navratri : नवरात्रीच्या पाचव्या दिवशी केल्या जाणाऱ्या ललिता पंचमीच्या व्रताची माहिती
========
नवरात्रीत लोक मांसाहार करत नाही पण दुर्गापूजेत मांसाहार परंपरा, संस्कृती मानली जाते. दुर्गापूजेत प्राण्यांचा बळी दिला जातो आणि त्याचं मांस शिजवून प्रसाद म्हणून वाटला जातो. ब्राह्मणही मांसाहार करतात. देवीच्या मंडपाबाहेरही लोक नॉनव्हेज विकताना दिसतील. दुर्गा माता म्हणजे आई आपल्या मुलांसोबत राहायला आली आहे. त्यामुळे तिथले लोक तिथं जे काही बनतं, ते लोक जे काही खातातच तेच आपल्या आईला प्रेमाने खाऊ घालतात. याने देवी प्रसन्न होते असं मानतात. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics