सगळीकडे नवरात्राची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या २२ सप्टेंबरपासून शारदीय नवरात्राची मोठ्या जल्लोषात सुरुवात होत आहे. मंदिरांमध्ये रंगरंगोटी करून, ते स्वच्छ धुतले जात आहे. नवरात्राच्या या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवीची पूजा करत तिचा आशीर्वाद मिळवला जातो. या नऊ दिवसांमध्ये देवी पृथ्वीवर असते आणि तिच्या भक्तांवर भरभरून आशीर्वादाचा वर्षाव करत असते. नवरात्रीच्या काळात महाराष्ट्रातील लहान मोठ्या सर्वच देवीच्या मंदिरांना उत्सवाचे स्वरूप प्राप्त झालेले असते. (Navratri News)
आता नवरात्रौत्सव म्हटल्यावर सर्वच देवीच्या मंदिरांना उत्सवाचे स्वरूप प्राप्त होणार यात शंका नाही. गुजरात, महाराष्ट्र, उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर नवरात्र साजरे केले जाते. भारतामध्ये देवीची अगणित मंदिरं आहेत. या मंदिरांपैकी देवीची ५१ शक्तीपीठ अतिशय जाज्वल्य आणि महत्वाची मानली जातात. संपूर्ण भारतभर आणि काही तर भारताच्या बाहेर देखील ही शक्तिपीठं आपल्याला पाहायला मिळतात. यासोबतच महाराष्ट्र्रात असणाऱ्या साडे तीन शक्तिपीठांची महती देखील अफाट आहे. या साडे तीन शक्तिपीठांचा आपला स्वतःचा एक वेगळाच महिमा आहे. (Marathi)
महाराष्ट्रात या साडे तीन शक्तिपीठांमध्ये कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूर गडाची रेणुका माता आणि अर्धे शक्तीपीठ म्हणून वणीच्या सप्तशृंगी मातेच्या मंदिरांना ओळखले जाते. नवरात्रीच्या दिवसांमध्ये या मंदिरांमध्ये जाऊन देवीचे दर्शन घेणे खूपच महत्वाचे आणि भाग्याचे समजले जाते. अनेक भाविक नवरात्रीच्या काळामध्ये या मंदिरांमध्ये जाऊन देवीचा आशीर्वाद घेतात. मात्र या साडे तीन शक्तिपीठांचा इतिहास त्यांचे महत्व आपण या लेखातून जाणून घेऊया. (Marathi News)
महालक्ष्मी मंदिर – कोल्हापूर

कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर हे पुराणातील १०८ पीठांपैकी एक आणि महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पीठांपैकी एक आहे. कोल्हापूरची अंबाबाई अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे. हे देवालय शिलाहारापूर्वी करहारक (कर्हाड) येथील सिंदवंशी राजाने बांधले असावे असे काही संशोधक म्हणतात. कोल्हापूरचे शिलाहार देवीचे निस्सिम भक्त होते. आपणास देवीचा वरप्रसाद मिळाल्याचे त्यांनी अनेक लेखांत लिहून ठेवले आहे. मंदिराच्या मांडणीवरून हे मंदिर चालुक्यांच्या काळात इ.स. ६०० ते ७०० मध्ये बांधले असण्याची शक्यता आहे. (Todays Marathi Headline)
========
Navratri :’ही’ आहेत भारतातील प्रसिद्ध देवीची मंदिर
========
मंदिराचे पहिले बांधकाम राष्ट्रकूट किंवा त्या आधीचा शिलाहार राजांनी सुमारे आठव्या शतकात केले असावे. उत्तम कोरीव काम असलेल्या भिंती व अगदी साधे वरचे शिखर हा कारागिरीतला फरक त्यामुळेच पडला असावा. महालक्ष्मी ही विष्णूची पत्नी असल्याने गर्भगृहाच्या समोर गरुडमंडपात विष्णुवाहन गरूडाची स्थापना केली आहे. तर मूर्तीच्या जवळील सिंह, शिरावरील शिवलिंगामुळे देवी अनेकांच्या मते पार्वतीचे रूप आहे. देवीची मूर्ती दगडी असून तिचे वजन ४० किलोग्रॅम आहे. मूर्तीमागे दगडी सिंह आहे. डोक्यावर मुकुट आहे आणि त्यावर शेषनाग आहे. (Navratri 2025)
तुळजाभवानी – तुळजापूर

भारतातील देवीच्या शक्तिपीठांपैकी श्री क्षेत्र तुळजापूर हे पूर्ण, आद्यपीठ मानले जाते. महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यात वसलेले तुळजापूर हे महत्वाचे तीर्थक्षेत्र असून त्याठिकाणी तुळजाभवानी देवीचे प्राचीन मंदिर आहे. दैत्यांचा संहार करून विश्वात नीती व धर्माचरण यांची पुनर्स्थापना करण्याचे महत्त्वाचे कार्य तुळजाभवानी देवीने प्रत्येक युगामध्ये केले आहे. स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या भोसले घराण्याची ही कुलदेवता आहे. तुळजाभवानी देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली होती.(Marathi Tredning News)
देवीने महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील दुष्टचक्राचे निवारण करण्यासाठी भवानी तलवार दिली होती, अशी आख्यायिका आहे. मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमाडपंती आहे. इतिहास आणि पुरातत्त्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकुट अथवा यादवकालीन मानले जाते. तर काहींच्या मते हे १७ व्या किंवा १८ व्या शतकातील मंदिर आहे. मंदिराच्या परिसरातील कल्लोळ तीर्थ, गोमुख तीर्थ, सिद्धिविनायक मंदिर, श्री भवानी शंकर मंदिर, होमकुंड, प्रांगणातील देवीदेवता, मातंगी मंदिर इ. धार्मिक स्थळे प्रसिद्ध आहेत. नवरात्रीचा उत्सव जरी नऊ दिवसांचा असला तरी तुळजापूरला मात्र, हा उत्सव एकूण एकवीस दिवस चालतो. (Top Marathi News)
रेणुकादेवी – माहूर

माहूरची रेणुका देवी हे साडेतीन पीठांपैकी एक पूर्ण पीठ आहे. रेणुकादेवी तसेच दत्तात्रेय आणि परशुराम यांची देखील प्राचीन मंदिरे माहूरगडावर आहेत. येथे मंदिरासमोरच एक किल्ला आहे. देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे, माहूरची श्री रेणुकामाता. श्री परशुरामाची माता म्हणूनही रेणुकामातेला ओळखले जाते. महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे. देवीचे मंदिर १३ व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे असे म्हटले जाते. माहूरगडावरच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे. (Top Marathi Stories)
एका कथेनुसार, माता पार्वतीने कुब्ज देशाच्या राजाच्या पोटी जन्म घेतला. तिचे नाव रेणू असे ठेवण्यात आले. शंकराचा अवतार मानलेल्या जमदग्नी ऋषीबरोबर तिचे लग्न झाले. जमदग्नीच्या आश्रमात अनेक शिष्य शिकत असत. सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी कामधेनू गाय जमदग्नीकडे होती. राजा सहस्रार्जुनाला या कामधेनूचा मोह झाला. त्याने जमदग्नीकडे कामधेनू मागितली. ऋषीने राजाची मागणी मान्य केली नाही. तेव्हा पराक्रमी जमदग्नीपुत्र परशुराम आश्रमात नाही, हे साधून सहस्रार्जुनाने आश्रमावर हल्ला केला. (Latest Marathi Headline)
आश्रम उद्ध्वस्त करून जमदग्नींना ठार मारले आणि कामधेनू हिरावून नेली. नंतर त्यांचा पुत्र परशुराम तिथे आला. घडला प्रकार बघून परशुरामाने क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली. पित्याला अग्नी देण्यासाठी कोरी भूमी हवी म्हणून त्याने कावडीच्या एका पारड्यात जमदग्नींचे पार्थिव व दुसऱ्या पारड्यात माता रेणुकेला बसवले. रानोमाळ भटकत अखेर तो माहूरगडावर आला. तिथे वास्तव्यास असलेल्या दत्तात्रेयाने त्याला कोरी भूमी दाखवली व ‘इथेच पित्यावर अग्निसंस्कार कर’ असे सांगितले. परशुरामाने प्रथम बाण मारून मातृतीर्थ व सर्वतीर्थ निर्माण केले. या पाण्याने स्नान घालून जमदग्नीवर अंत्यसंस्कार केले. यावेळी माता रेणुका सती गेली. या सर्व विधींचे पौरोहित्य दत्तात्रेयांनी केले. (Top Stories)
त्यानंतर परशुरामाला माता रेणुकेची खूप आठवण येऊ लागली. तो दु:खी होऊन शोक करत होता, तोच आकाशवाणी झाली. ‘तुझी आई जमिनीतून वर येऊन तुला दर्शन देईल. फक्त तू मागे पाहू नकोस. ‘परंतु परशुरामाची उत्सुकता चाळवली गेल्याने त्याने मागे वळून बघितले. त्यावेळी रेणुकामातेचे केवळ मुखच जमिनीतून वर आले होते. तेवढेच परशुरामाला दिसले. या तांदळारूपातल्या मुखाचीच माहूरला पूजा होते. परशुरामाला या डोंगरावर मातेचे दर्शन झाले म्हणून याला ‘मातापूर’ म्हणू लागले. शेजारच्या आंध्रप्रदेशात ‘ऊर’ म्हणजे गाव ते ‘ माऊर ‘ आणि पुढे ‘ माहूर ‘ झाले..!! (Top Marathi Headline)
सप्तशृंगीदेवी – नाशिक

महाराष्ट्रात देवीच्या साडेतीन पीठांपैकी अर्धे पीठ असलेली सप्तशृंगीदेवी नाशिकपासून ६५ किलोमीटरवरील ४८०० फूट उंचावरील सप्तशृंगगडावर वसलेली आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेवरील सात शिखरांचा प्रदेश म्हणजे सप्तशृंगगड. एकीकडे खोल दरी, तर दुसरीकडे छाती दडपविणारे कडे असा निसर्ग सोबत घेऊन सप्तशृंगी देवी उभी आहे. (Latest Marathi News)
आदिमायेच्या या गडावर वस्ती करण्याची आख्यायिकाही तिच्या या रूपातूनच जन्माला आली आहे. महिषासुर राक्षसाच्या निर्दालनासाठी देवादिकांनी देवीची याचना केली अन् होमाद्वारे ती प्रकटही झाली. तिचे प्रकट रूप हेच सप्तशृंगीचे होते, असे सांगितले जाते. या देवीचे महात्म्य मोठे आहे. देवी भागवतात देवीची देशात १०८ शक्तिपीठे असल्याचा उल्लेख आहे. त्यांपैकी महाराष्ट्रात साडेतीन पीठे आहेत. त्यांपैकी सप्तशृंगीचे अर्धे पीठ आहे. या देवीला श्री ब्रह्मस्वरूपिणी असेही म्हणतात. ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगीदेवी. महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे त्रिगुणात्मक स्वरूप म्हणजे सप्तशृंगीदेवी, असे मानले जाते. (Top Trending News)
=========
Navratri : नवरात्रामध्ये अखंड दिवा लावताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी
=========
एका धनगराला दिसलेले मधमाशांचे पोळे काढण्यासाठी त्याने त्यात काठी खुपसली तेव्हा काठीला शेंदूर लागला. त्याने पोळे काढल्यानंतर तेथे देवीची मूर्ती सापडली, अशीही एक दंतकथा आहे. शुंभनिशुंभ आणि महिषासुर या पाशवी शक्तीच्या असुरांचा नाश केल्यावर तप-साधनेसाठी देवीने या गडावर वास्तव्य केले. सह्याद्रीच्या या उंच कड्यास सात शिखरे आहेत. त्यावरून या स्थानाचे नाव सप्तशृंगगड पडले. हे देवीचे मूळ पीठ मानले जाते. देवीची मूर्ती अतिभव्य असून अठरा हातांची आहे. सप्तशृंगीदेवीबरोबरच गडावर सूर्यकुंड, जलगुंफा, शिवतीर्थ, तांबुलतीर्थ, मार्कण्डेय ऋषींचा मठ, शितकडा आदी महत्त्वाची, पवित्र तीर्थस्थळे आहेत. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
