Home » नवरात्राची सहावी माळ – देवी कात्यायनी पूजन

नवरात्राची सहावी माळ – देवी कात्यायनी पूजन

by Jyotsna Kulkarni
0 comment
Katyayani Puja
Share

आज नवरात्राची सहावी माळ आहे. ललिता पंचमी साजरी केल्यानंतर येते ती नवरात्राची सहावी माळ. शारदीय नवरात्रीच्या सहाव्या दिवशी, दुर्गा देवीचे सहावे रूप कात्यायणी देवीची पूजा केली जाते. यंदा नव्हर्टरची सहावी माळ आणि कात्यायणी देवीची पूजा ही मंगळवार, ८ ऑक्टोबर २०२४ रोजी करण्यात येणार आहे. कात्यायणी देवीचे पूजन केल्याने विवाहातील अडचणी दूर होतात. उपवर व्यक्तीस सुयोग्य जोडीदार प्राप्त होतो. तसेच विवाहात येणाऱ्या अडचणी, समस्या दूर होतात. भाविकांना सुख, समृद्धी प्राप्त होते.

एका आख्यायिकेनुसार देवी दुर्गेचे कात्यायन रूप हे ऋषींच्या कन्या म्हणून अवतरले होते. देवीच्या या रूपाची भक्तिभावाने पूजा केल्यास मनुष्याला सर्व प्रकारचे भौतिक सुख प्राप्त होते. उत्तर भारतातील यूपी, बिहार आणि झारखंडमध्ये या देवीला छठ मैया म्हणूनही पूजा केली जाते.

कात्यायणी देवीचे स्वरूप
ऋषी कात्यायण यांच्या घरी देवी प्रकट झाल्यामुळे देवीला कात्यायणी या नावाने ओळखले जाते. देवी कात्यायणी देवीच्या पूजनाने भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात. दुर्गा सप्तशतीमध्ये कात्यायणी देवीचा उल्लेख महिषासुरमर्दिनी असा केल्याचे देखील सांगितले जाते. कात्यायणी देवीचे स्वरुप चतुर्भुज आहे. देवीच्या एका हातात खड्ग आणि दुसऱ्या हातात कमळ आहे. तर दोन हात अभय मुद्रा आणि वर मुद्रेत आशिर्वादरुपी आहेत. कात्यायणी देवीचे स्वरुप दयाळू आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे असल्याचे सांगितले जाते.

देवीला लाल जास्वंदाचे फुल अर्पण करा. कात्यायनी मातेला मध आणि गोड खायचे पान अर्पण करावे, देवीला ते आवडते असे सांगितले जाते. हे अर्पण केल्याने व्यक्तीचे सौंदर्य वाढते.

कात्यायणी देवीची पूजा पद्धत
नवरात्रोत्सवाच्या सहाव्या दिवशी कात्यायणी देवीची पूजा करण्याआधी स्नान नित्यादिकर्मे आटोपून सर्वप्रथम कलश पूजन करा. त्यानंतर माता दुर्गा आणि माता कात्यायनी यांची षोडोपचारे पूजा करा. पूजा करताना मातेचे सतत स्मरण करा. त्यानंतर देवीला हळदी कुंकू अक्षता, फुलांसह सोळा अलंकार अर्पण करा. देवीला आवडणारे मध आणि मिठाईचे पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवा. तुपाचा दिवा लावून देवीची आरती करा. आरतीपूर्वी दुर्गा चालिसा आणि दुर्गा सप्तशती वाचा. आपल्या शरीरात सप्त (सात) चक्रे आहेत, या सात चक्रांपैकी आज्ञा चक्रात देवी कात्यायनी वास करते. देवीचे ध्यान केल्याने आज्ञा चक्र जागृत होते.

कात्यायणी देवीचा मंत्र

कंचनाभा वराभयं पद्मधरां मुकटोज्जवलां।

स्मेरमुखीं शिवपत्नी कात्यायनी नमोस्तुते॥

माँ कात्यायनी मंत्र, प्रार्थना आणि स्तुती :

Katyayani Puja

प्रार्थना मंत्र 

ॐ देवी कात्यायन्यै नमः

स्तुति 

चंद्रहसोज्वलकार शार्दुलवरवाहन

कात्यायनी शुभम दद्याद देवी दानवघातिनी

या देवी सर्वभूतेषु कात्यायनी रूपेण संस्थिता

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः

कात्यायनी देवी कथा १

दुर्गेचे नाव कात्यायनी कसे पडले यामागे एक कथा आहे. कत नावाचे एक प्रसिद्ध महर्षी होते. त्यांना कात्य नावाचा पुत्र झाला. या कात्याच्या गोत्रात प्रसिद्ध महर्षी कात्यायनाचा जन्म झाला. त्यांनी अनेक वर्ष भगवतीची कठोर तपस्या केली. भगवतीने त्यांच्या घरी जन्म घ्यावा अशी त्यांची इच्छा होती. भगवतीने त्यांच्या या प्रार्थनेचा स्वीकार केला.

काही काळानंतर जेव्हा महिषासुराचा अत्याचार पृथ्वीवर वाढला तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन देवतांनी आपल्या तेजाचा काही अंश देऊन महिषासुराच्या विनाशासाठी एका देवीला उत्पन्न केले. महर्षी कात्यायनाने या देवीची सर्वप्रथम पूजा केली म्हणून या देवीला कात्यायनी देवी असे नाव पडले. अश्विन कृष्ण चतुर्थीच्या दिवशी या देवीने महर्षी कात्यायनाच्या घरी जन्म घेतला होता. सप्तमी, अष्टमी आणि नवमी हे तीन दिवस महर्षी कात्यायन यांच्या घरी पूजा ग्रहण करून दशमीच्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला होता. अशी ही कथा पुराणात आहे.

कात्यायनी देवी कथा २

कत नावाच्या ऋषींचे पुत्र होते कात्या आणि कात्या हा कात्यायन नावाच्या ऋषीचे पुत्र होते. कात्यायन ऋषींना आपल्या कन्येच्या रूपात देवी दुर्गा हवी होती. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी कात्यायनाने कठोर तपश्चर्या केली.  देवी दुर्गा ऋषींच्या तपश्चर्येने प्रसन्न झाली आणि इच्छित वरदान दिले. काही काळानंतर कात्यायनाची कन्या म्हणून देवीचा जन्म झाला. कात्यायनाची कन्या असल्याने देवीचे नाव कात्यायनी होते.

कात्यायनी देवी ध्यान मंत्र

वन्दे वाञ्छित मनोरथार्थ चन्द्रार्धकृतशेखराम्।

सिंहारूढा चतुर्भुजा कात्यायनी यशस्विनीम्॥

स्वर्णवर्णा आज्ञाचक्र स्थिताम् षष्ठम दुर्गा त्रिनेत्राम्।

वराभीत करां षगपदधरां कात्यायनसुतां भजामि॥

पटाम्बर परिधानां स्मेरमुखी नानालङ्कार भूषिताम्।

मञ्जीर, हार, केयूर, किङ्किणि, रत्नकुण्डल मण्डिताम्॥

प्रसन्नवदना पल्लवाधरां कान्त कपोलाम् तुगम् कुचाम्।

कमनीयां लावण्यां त्रिवलीविभूषित निम्न नाभिम्॥

कात्यायनी देवी स्त्रोत

कञ्चनाभां वराभयं पद्मधरा मुकटोज्जवलां।

स्मेरमुखी शिवपत्नी कात्यायनेसुते नमोऽस्तुते॥

पटाम्बर परिधानां नानालङ्कार भूषिताम्।

सिंहस्थिताम् पद्महस्तां कात्यायनसुते नमोऽस्तुते॥

परमानन्दमयी देवी परब्रह्म परमात्मा।

परमशक्ति, परमभक्ति, कात्यायनसुते नमोऽस्तुते॥

विश्वकर्ती, विश्वभर्ती, विश्वहर्ती, विश्वप्रीता।

विश्वाचिन्ता, विश्वातीता कात्यायनसुते नमोऽस्तुते॥

कां बीजा, कां जपानन्दकां बीज जप तोषिते।

कां कां बीज जपदासक्ताकां कां सन्तुता॥

कांकारहर्षिणीकां धनदाधनमासना।

कां बीज जपकारिणीकां बीज तप मानसा॥

कां कारिणी कां मन्त्रपूजिताकां बीज धारिणी।

कां कीं कूंकै क: ठ: छ: स्वाहारूपिणी॥

कात्यायनी देवी कवच

कात्यायनौमुख पातु कां स्वाहास्वरूपिणी।

ललाटे विजया पातु मालिनी नित्य सुन्दरी॥

कल्याणी हृदयम् पातु जया भगमालिनी॥

=======

हे देखील वाचा : मुंब्रा देवीचा इतिहास

=======

कात्यायनी देवीची आरती

जय जय अम्बे जय कात्यायनी। जय जग माता जग की महारानी॥

बैजनाथ स्थान तुम्हारा। वहावर दाती नाम पुकारा॥

कई नाम है कई धाम है। यह स्थान भी तो सुखधाम है॥

हर मन्दिर में ज्योत तुम्हारी। कही योगेश्वरी महिमा न्यारी॥

हर जगह उत्सव होते रहते। हर मन्दिर में भगत है कहते॥

कत्यानी रक्षक काया की। ग्रंथि काटे मोह माया की॥

झूठे मोह से छुडाने वाली। अपना नाम जपाने वाली॥

बृहस्पतिवार को पूजा करिए। ध्यान कात्यानी का धरिये॥

हर संकट को दूर करेगी। भंडारे भरपूर करेगी॥

जो भी माँ को भक्त पुकारे। कात्यायनी सब कष्ट निवारे॥


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.