Home » Sharadiya Navratri : शारदीय नवरात्रोत्सवाची धुमधाम सुरु !

Sharadiya Navratri : शारदीय नवरात्रोत्सवाची धुमधाम सुरु !

by Team Gajawaja
0 comment
Sharadiya Navratri
Share

शारदीय नवरात्र उत्सव आता अवघ्या आठवड्यावर आला आहे. 22 सप्टेंबरपासून सुरु होणार हा नवरात्र दिवस पुढचे दहा दिवस चालणार आहे. यावेळी मातेच्या भाविकांना या उत्सवातून अधिक आनंद मिळणार आहे, कारण यावेळी देवी दहा दिवसांसाठी भाविकांच्या भेटीला येणार आहे, शिवाय तिची स्वारी हत्तीवरुन असणार आहे. त्यामुळे हा दुग्धशर्करा योग असल्याचे सांगण्यात येत आहे.
हिंदू धर्मात शारदीय नवरात्र उत्सव हा प्रमुख सण म्हणून साजरा होतो. या दरम्यान, माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. वर्षातील सर्वात महत्वाचा सण असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. भारतातील सर्व देवीच्या मंदिरांमध्ये आता मोठ्या प्रमाणात सजावट करण्यात येत आहे. 22 सप्टेंबरपासून सुरु होणा-या नवरात्रीनिमित्त देवीच्या मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होते. अशावेळी या भाविकांना कुठलिही गैरसोय वाटू नये, म्हणून मंडप उभारणी करण्यात येत आहे. (Sharadiya Navratri)

शिवाय मातेच्या भक्तांसाठी मोठ्या प्रमाणात भंडा-याचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी दहा दिवस नवरात्रौत्सव असून या काळात केलेली पूजा अधिक फलदायी असल्याचे सांगण्यात येते. यावर्षी नवरात्रातील चतुर्थी तिथी 25 आणि 26 सप्टेंबर या दोन्ही दिवशी असणार आहे. त्यामुळे नऊ दिवसांची नवरात्र यावेळी दहा दिवस साजरी करता येणार आहे. 1 ऑक्टोबर रोजी नवमी साजरी होणार आहे. त्याच्या दुसऱ्याच दिवशी, 2 ऑक्टोबर रोजी विजयादशमीचा उत्सव साजरा होणार आहे. यावर्षी आणखी एक चांगला योग येत आहे, तो म्हणजे, देवीचे आगमन हत्तीवरुन होत आहे. त्यामुळे आगामी वर्ष सुख, समृद्धी आणि आरोग्य यांचे असून देशाच्या विकासासाठी सुद्धा देवीचे हत्तीवरुन होणारे आगमन शुभ मानले जाते. माता दुर्गेचे आगमन आणि प्रस्थान दिवस आणि आठवड्यानुसार ठरवले जाते. हत्तीवर बसून आईचे आगमन झाल्यास देशातील शेती उत्पादनासाठीही हा शुभ संकेत मानला जातो. (LATEST NEWS)

जर माता दुर्गेचे रविवारी किंवा सोमवारी आगमन झाले तर ती शेती, संपत्ती आणि धान्यासाठी शुभ असते. सोबतच माता दुर्गेचे प्रस्थानही कसे होते, याबाबत काही हिंदू धर्म ग्रंथात काही संकेत सांगण्यात आलेले आहेत. त्यानुसार यावर्षी देवीचे प्रस्थान गुरुवार 2 ऑक्टोबर रोजी होत आहे. माता राणी एका पुरूषाच्या खांद्यावर बसून निघेल. हा संकेत आनंद, शांती, व्यवसायात वाढ आणि शेजारील देशांशी चांगले संबंध यांचे प्रतीक असल्याचे सांगण्यात आले आहे. या शारदीय नवरात्रात घटस्थापना करण्यात येते, त्याच्या मुहूर्तालाही महत्त्व आहे. 22 सप्टेंबर रोजी घटस्थापना होणार आहे, या घटस्थापनेचा शुभ काळ सकाळी 6.9 ते 8.6 असा असणार आहे. तर घटस्थापनेचा अभिजीत मुहूर्त सकाळी 11.49 ते दुपारी 12.38 पर्यंत असणार आहे. शारदीय नवरात्रीमध्ये सप्तमी, अष्टमी आणि नवमी उपवास केव्हा असतात, आणि त्यावेळी करण्याच्या पूजा यांचेही मोठे महत्त्व आहे. नवरात्रात माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. या नवरात्रोत्सवात देवीची सप्तमी आणि अष्टमीचा सोहळा मोठा असतो. (Sharadiya Navratri)

============

हे देखील वाचा :

Nepal : जर नेहरु यांनी मान्य केले असते तर नेपाळ भारताचे राज्य असते…काय होता प्लॅन?

==============

यावर्षी शारदीय नवरात्राची सप्तमी तिथी माता कालरात्रीला समर्पित असेल. 29 सप्टेंबर सोमवार रोजी सप्तमी असेल. तर अष्टमी तिथीचे व्रत माता महागौरीच्या पूजेसाठी समर्पित असेल. 30 सप्टेंबर मंगळवार रोजी दुर्गा अष्टमीचा उत्सव साजरा केला जाईल. हा नवरात्राचा नववा दिवस असेल. या दिवशी, कन्या पूजन आणि हवनाचे विशेष महत्त्व असते. यावर्षी नवमी तिथीचे व्रत महानवमी म्हणून साजरे करण्यात येईल. महानवमी बुधवार, 1 ऑक्टोबर रोजी येईल. या दिवशी माता दुर्गेचे नववे रूप, माता सिद्धिदात्री यांची पूजा करण्यात येईल. या दिवशीही हवन आणि कन्या पूजनाचे विशेष महत्त्व आहे. हा नवरात्री उपवासाचा शेवटचा आणि शेवटचा दिवस मानला जातो. यावर्षी नवरात्र दहा दिवसांची असल्यामुळे हा नवरात्रीचा 10 वा दिवस साजरा असणार आहे. याच दिवशी विजयादशमी साजरी होईल. (LATEST NEWS)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.