गणपती उत्सव संपला की सगळ्यांना वेध लागतात ते नवरात्रीचे. वर्षातील सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या सणांपैकी एक सण म्हणून शारदीय नवरात्राला ओळखले जाते. नऊ दिवस देवीचे नवरात्र बसवले जातात. या नऊ दिवसांमध्ये देवीचा जागर केला जातो. नवरात्रोत्सव म्हणजे गरबा आणि दांडिया तर पाहिजेच. हे नऊ दिवस सर्वच देवीसमोर गरबा आणि दांडिया खेळत आनंदोत्सव साजरा करतात. यंदा गणेशोत्सव संपून आठवडा झाला आहे. त्यामुळे आता सगळीकडे नवरात्रीची तयारी सुरु झाली आहे. (Marathi News)
हिंदू पंचांगानुसार शारदीय नवरात्र आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथी २२ सप्टेंबरपासून सुरू होणार असून २ ऑक्टोबर रोजी विजय दशमी म्हणजेच दसऱ्यापर्यंत असणार आहे. यंदा नवरात्रीमध्ये तृतीया तिथी ही दोन दिवस म्हणजे २४ आणि २५ सप्टेंबर या दोन्ही दिवशी आहे. त्यामुळे महानवमी १ ऑक्टोबरला तर २ ऑक्टोबरला विजयादशमी म्हणजे दसरा साजरा केला जाणार आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहाने आणि जल्लोषाने आपण नवरात्रीचा सण साजरा करतो. मात्र हा सण साजरा करण्याचे महत्व तुम्हाला माहित आहे का? नवरात्र का साजरे केले जाते? याचे कारण माहित आहे का? चला जाणून घेऊया याबद्दलच अधिक माहिती. (Todays Marathi News)
शारदीय नवरात्र साजरे करण्यामागचे कारण
नवरात्र साजरी करण्यामागे अनेक कथा सांगितल्या जातात. मात्र, यातील सर्वात प्रचलित असलेली कथा म्हणजे, आदिशक्ती आणि महिषासुराची. या कथेप्रमाणे, महिषासुर नावाच्या राक्षसाला ब्रह्मदेवाने अमर होण्याचे वरदान दिले होते. त्यामुळे उन्मत्त झालेला महिषासुर देवी-देवता आणि मनुष्यप्राण्यांना खूप त्रास देऊ लागला. एके दिवशी महिषासुराच्या अत्याचाराला कंटाळून सर्व देवी-देवता भगवान विष्णू, शिव व ब्रह्माकडे गेले. तेव्हा सर्वांनी मिळून आदिशक्तीचे आवाहन केले आणि एका दिव्य प्रकाशातून आदिशक्तीची उत्पत्ती झाली. (Top Marathi News)
ही आदिशक्ती म्हणजे साक्षात महादुर्गा, महालक्ष्मी आणि महासरस्वती यांचे दिव्य रूप होते. देवी प्रकट झाली आणि देवीने महिषासुरासोबत नऊ दिवस युद्ध केले आणि १० व्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला. असे म्हणतात की, नऊ दिवसांदरम्यान सर्व देवी-देवतांनी देवीची पूजा-आराधना केली आणि देवीला आपल्या भक्तीने बळ मिळवून दिले. तेव्हापासूनच नवरात्र साजरी केली जाते आणि या काळात देवी दुर्गेच्या नऊ विविध रूपांची पूजा केली जाते. १० व्या दिवशी देवीला विजय मिळाला म्हणून या दिवशी विजया दशमी साजरी करत घरातील सर्व हत्यारांची पूजा केली जाते. या नऊ दिवसात देवीने विविध रूप घेऊन महिषासुराशी युद्ध केले होते. म्हणूनच उभा नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. महिषासुर नावाच्या असुराशी प्रतिपदा ते नवमी असे ९ दिवस युद्ध करून देवीने नवमीच्या रात्री त्याला ठार मारले. त्यानंतर तिला ‘महिषासुरमर्दिनी’ म्हणू लागले. म्हणून आपण नवरात्री साजरी करतो. (Latest Marathi News)
नवरात्र साजरे करण्यामागे अजून दोन कथा सांगितल्या जातात ज्या, रामायणाशी संबंधित आहे. यातली एक म्हणजे, रामाच्या हातून रावणाचा वध व्हावा, या उद्देशाने नारद मुनींनी श्रीरामांना नवरात्रीचे व्रत करायला सांगितले. नंतर हे व्रत पूर्ण केल्यावर रामांनी लंकेवर स्वारी करून शेवटी रावणाचा वध केला. भगवान राम सीतेला वाचवण्यासाठी लंकेवर हल्ला करणार होते. त्यापूर्वी त्यांनी माता भगवतीची पूजा केली. प्रभू रामाने नऊ दिवस रामेश्वरमध्ये मातेची पूजा केली, त्यानंतर मातेने प्रसन्न होऊन विजयासाठी आशीर्वाद दिला. (Top Trending News)
========
Vishwakarma Puja : भाद्रपदामध्ये साजऱ्या होणाऱ्या भगवान विश्वकर्मा जयंतीचे महत्व
========
तर रामायणाशी संबंधित दुसरी कथा म्हणजे, शबरीच्या उष्ट्या बोरांची गोष्ट अनेकांनी ऐकली असेल. राम जेव्हा सीतेचा शोध घेत होते, तेव्हा ते माता शबरीच्या कुटीजवळ गेले. अनेक दशकं शबरी मातेने श्रीरामांची वाट पहिली होती. शबरीला भेटल्यानंतर तिला भक्तीच फळ म्हणून रामांनी ९ प्रकारची भक्ती दिली. त्यात हरिकथा, संतमिलन, ध्यास, आचरण, हे सगळे भक्तीचे प्रकार आहेत. त्यात नवदा भक्ती म्हणून एक भक्ती आहे, तिलाच नवरात्री असे म्हणतात. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics