Home » Sharad Upadhye : ‘गर्विष्ट माणसाचे अध:पतन होते’ शरद उपाध्याय यांचा निलेश साबळेवर थेट निशाणा

Sharad Upadhye : ‘गर्विष्ट माणसाचे अध:पतन होते’ शरद उपाध्याय यांचा निलेश साबळेवर थेट निशाणा

by Jyotsna Kulkarni
0 comment
Sharad Upadhye | Latest Marathi Headlines
Share

मराठी टेलिव्हिजनविश्वातील सर्वात गाजलेला आणि तुफान लोकप्रिय झालेला कॉमेडी शो म्हणजे चला हवा येऊ द्या. या शोने लोकप्रियतेचे अनेक रेकॉर्ड बनवले. अगदी बॉलिवूडमधील दिग्गजांना देखील या शोने भुरळ घातली. या कार्यक्रमातील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांना भरपूर हसवले. या शोमधील प्रत्येक कलाकाराला एक नवीन आणि मोठी ओळख चला हवा येऊ द्या च्या निमित्ताने मिळाली. हा शो जेव्हा बंद झाला तेव्हा प्रेक्षक नाराज झाले होते, मात्र आता पुन्हा एकदा हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चला हवा येऊ द्या २ पुन्हा येत असल्याने सर्वांनाच त्याची उत्सुकता शिगेला लागली आहे. मात्र या नव्या शोमध्ये निलेश साबळेचा पत्ता कट झाला असून त्याची जागा अभिजीत खांडकेकरने घेतली आहे. (Marathi News)

निलेश साबळे ‘चला हवा येऊ द्या’ शोमध्ये दिसणार नाही म्हणून सोशल मीडियावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. निलेश या शोचा कॅप्टन होता आणि त्याच्यामुळे या शोला एक वेगळेच वलय प्राप्त झाले होते, मात्र आता निलेश दिसणार नाही म्हटल्यावर अनेकांनी यावर अनेक प्रश्न विचारले आहेत. निलेश ‘चला हवा येऊ द्या’ शोमध्ये दिसणार नसल्याच्या बातमीवर प्रसिद्ध ज्योतिष अभ्यासक शरद उपाध्याय यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. उपाध्याय यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत निलेश साबळेचा त्यांना आलेला वाईट अनुभव शेअर केला आहे. उपाध्याय यांनी लिहिले आहे, (Todays Marathi HEadline)

Sharad Upadhye

आदरणीय नीलेश साबळे…
आपल्याला ‘चला हवा येऊ द्या’ च्या दुसऱ्या पर्वातून डच्चू देऊन त्याजागी अभिजीत खांडकेकरना आणल्याची बातमी आज पेपरमध्ये वाचली. वाईट वाटले पण आश्चर्य नाही. मला तुम्ही एकदा बोलवले होते. त्याप्रमाणे मी ११ वा. पोहोचलो. पण ३ वाजेपर्यंत त्या रुममध्ये कोणीच फिरकले नाही. मला पाणी हवे होते पण एका- दोघांना सांगूनही ते आणतो म्हणून गेले ते आलेच नाहीत. मला रुम सोडू नका असे सांगितले होते. नीलेश तुम्ही इतर कलावंतांच्या रुममध्ये जाऊन गप्पा मारीत होतात पण माझ्या रुममध्ये डोकावलात ते थेट ४ वा. स्माईलही न देता स्टेजवर गेलात. (Marathi Trending News)

इतरांचे शूटिंग खूप वेळ केलेत पण मला ६ वा. बोलावून घाईघाईत १५ मिनिटात सारे आटोपले. त्यावेळीही इतर कलावंत मधेमधे बोलत होते. माझा सारा दिवस फुकट गेला. एडिटींग मध्येही माझी उत्तरे गाळलीत. बाहेर आपली भेट झाली तेव्हा वडिलांच्या नात्याने काही सल्ले दिले. पण कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून आपल्या डोक्यात हवा गेली होती. दुसऱ्याच्या विषयाबद्दल आदर ठेवायचा असतो पण तुम्ही बेपर्वा होतात. त्याच वेळी मला वाटले की अहंकार अति वाईट. गर्विष्ट माणसाचे अध:पतन होते. एखादी पोस्ट मिळाली की ताठा येतो आणि सर्वनाश होतो. स्टेजवर तुम्ही साऱ्यांना आपलेसे केले नाही. (Marathi Latest News)

आपले सादरीकरणही आकर्षक होत नव्हते. या साऱ्याचा परिणाम म्हणजे तुम्हाला चॅनेलने बाहेर काढले. नीलेश स्वभाव मनमिळाऊ असावा साऱ्यांना सांभाळून घ्यावे मग सारे एकजुटीने काम करून कार्यक्रमाची चर्चा होईल. अभिजीत खांडकेकर ही धुरा चांगली सांभाळतील. मला त्यांचा सहवास मिळाला आहे. आपण अनुभवी आहात. त्यांना मार्गदर्शन करा. इंडस्ट्रीत आपल्याविषयी असलेले गैरसमज आपल्या चांगल्या कामाने दूर करा. आपल्याला ईश्वराची साथ लाभो ही विनंती.” (Top Marathi HEadline)

=========

हे ही वाचा : Kshiti Jog : क्षिती जोगने तिच्या आयुष्यातील ‘त्या’ खास व्यक्तीसाठी शेअर केली पोस्ट

==========

निलेश साबळेने ‘चला हवा येऊ द्या’ या शोचे दिग्दर्शन आणि सूत्रसंचालन केले. भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे आणि सागर कारंडे यांनासोबत घेऊन निलेशने एक दमदार टीम तयार केली. मात्र आता या शोच्या नव्या सीझनमध्ये निलेश साबळे, भाऊ कदम आणि सागर कारंडे दिसणार नाही. या शोच्या प्रोमोमध्ये गौरव मोरे, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके आणि भारत गणेशपुरे यांच्यासह अनेक नवीन कलाकारांचा समावेश झालेला दिसत आहे. (Social Updates)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.