तुम्ही कधी अशा एखाद्या ठिकाणाबद्दल असे ऐकले आहे का, की घरांना दरवाजेच लावले जात नाहीत. तसेच दरवाजे नसले तरीही चोरी होत नाही? खरंतर हे विचित्र म्हणावे लागेल पण महाराष्ट्रातील अशा एका गावात ही गोष्ट तुम्हाला दिसून येते. तेथील गावातील कोणत्याच घरांना आजवर दरवाजे लावण्यात आलेले नाहीत. गावातील लोक त्यामागे एक कथा सांगतात. तर याच बद्दल आपण जाणून घेऊयात.(Shani Shinganapur)
‘या’ गावात कोणत्याही घराला दरवाजा नाही
शनि शिंगणापूर हे गाव शनिदेवाचे मंदिर शनि शिंगणापूरसाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात हे मंदिर आहे. असे मानले जाते की, या गावात शनि देवांची ५ फूटांची उंच मुर्ति ही संपूर्ण गावाचे संरक्षण करते. या गावाच्या आसपास शनि शिंगणापुर मध्ये शनि देवाचा आशीर्वाद मिळावा म्हणून मोठ्या प्रमाणात भाविक येत राहतात. तर गावातील एकाही घराला टाळं नसल्याने या गावाची जरुर चर्चा केली जाते.
‘या’ कारणास्तव दरवाजे नाहीत
लोककथेनुसार अशी मान्यता आहे की, ३०० वर्षांपूर्वी खुप मोठा पुर आला होता. त्यानंतर गावकऱ्यांना एक मोठ्ठा काळा दगड मिळाला. असे सांगितले जाते की, दगड दाबून पाहिल्यानंतर त्यामधून रक्त येत असल्याचे दिसून आले. त्याच रात्री गावातील एका व्यक्तीला स्वप्नात शनि देवांनी त्यांचे मंदिर उभारण्याचे आदेश दिले. त्याचसोबत त्यांनी असे म्हटले की, ते गावाचे संरक्षण करतील आणि कोणत्याही धोक्यापासून त्यांचा बचाव केला जाईल. तसेच देवाने एक अट अशी घातली होती की, मंदिराला छत नसेल. जेणेकरुन तुमच्या सर्वांचे संरक्षण कोणत्याही अडळ्याशिवाय होईल.
यानंतर गावकऱ्यांनी हे मान्य केले आणि शनि देवाची तेथे स्थापना केली. त्याचसोबत आपल्या घरांना असलेली टाळं ही काढून टाकली. गावातील लोक आपले पैसे आणि दागिने असुरक्षितरित्या ठेवतात त्यामुळे त्यांना बेजबाबदार बोलले जाते. दरम्यान, स्थानिक लोक कधी-कधी जनावर घरात घुसू नये म्हणून एक दरवाज्याला एक लाकडाची फळी लावतात. प्रत्येक गावकरी हा गावाचे नुकसान होऊ नये म्हणून शनि देवाची दररोज प्रार्थना करतात. (Shani Shinganapur)
युको बँकेची पहिली लॉकलेस शाखा
काही वर्षांपूर्वी बनललेल्या पोलीस स्थानकानुसार येथे आता सुद्धा चोरी झाल्याची घटना घडत नाही आणि त्याची तक्रार ही आजवर आलेली नाही. त्याचसोबत युको बँकेने शनि शिंगणापुर मधअये आपली पहिलीच लॉकलेस शाखा सुरु केली आहे. म्हणजेच बँकेने सुद्धा गावकऱ्यांच्या मान्यतेला मान देत बँकेला टाळं लावलेले नाही. केवळ काचेचा एक दरवाजा आहे.
हे देखील वाचा- वर्षातील १२ संक्रांतींपैकी मकर संक्रात का असते खास?
काही लोक आता टाळं लावण्याची मागणी करतायत
लोकांच्या मान्यतेनुसार, काही लोकांची विविध मतं आहे. काही लोकांनी असा दावा केला आहे की, त्यांचे काही सामान चोरी झाली आहे. मात्र गावकऱ्यांचे असे मानणे आहे की, जर चोरी झाली असेल तर शनि शिंगणापूरच्या बाहेर झाली असावी. आता सत्य काहीही असो पण गावातील काही लोकांनी ग्राम पंचायतला ही सिफारिश केली आहे की, त्यांच्या परिवाराच्या सुरक्षिततेसाठी टाळं लावले जावे.