Home » Shanipradosh : जाणून घ्या शनि प्रदोष व्रताचे महत्व आणि मुहूर्त

Shanipradosh : जाणून घ्या शनि प्रदोष व्रताचे महत्व आणि मुहूर्त

by Jyotsna Kulkarni
0 comment
Shanipradosh
Share

हिंदू कॅलेंडरनुसार महिन्याच्या प्रत्येक दिवशी एक खास तिथी असते. प्रत्येक दिवसाची एक तिथी असते. मात्र आपण या सर्वच तिथी पळत नसलो आणि लक्षात ठेवत नसलो तरी देखील काही तिथी आणि दिवस हे अति महत्त्वाचे असतात. जसे की चतुर्थी, एकादशी, पौर्णिमा, अमावस्या आदी. यातलीच एक तिथी म्हणजे प्रदोष. कॅलेंडरमध्ये प्रदोष असलेल्या दिवशी प्रदोष असे लिहिलेले असते. त्यामुळे तो दिवस प्रदोष म्हणून पळाला जातो. आता सर्वच लोकं प्रदोष पाळत नसले तरी काही लोकांकडे आजही प्रदोष पळाला जातो, यादिवशी पूजा केली जाते. (Shanipradosh)

प्रदोष म्हणजे काय तर हिंदू दिनदर्शिकेनुसार दर महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला, सूर्यास्तानंतरच्या सुमारे १ तास १२ मिनिटांचा (सुमारे ३ घटिका) पवित्र काळ होय. ही वेळ भगवान शिवाच्या आराधना आणि उपवासासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या काळात शिवपूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात अशी धारणा आहे. लवकरच फेब्रुवारी महिन्यातील पहिली प्रदोष तिथी येत आहे. जाणून घेऊया या तिथेच महत्त्व आणि शुभ मुहूर्त. (Shiv and Shani)

येणारा प्रदोष व्रत हा शनिवारी असल्याने त्याला शनी प्रदोष म्हणतात. शनी प्रदोष महत्वाचा यामुळे असतो कारण यादिवशी महादेवासोबतच शनिदेवाची कृपा देखील मिळते. यामुळे ज्या व्यक्तींवर साडेसाती किंवा शनीची कुदृष्टी आहे त्यांनी यादिवशी व्रत करून शनिदेवाची देखील पूजा करावी असे सांगितले जाते. शिवाय १४ ला शनिवारी प्रदोष आणि १५ ला रविवारी लगेच महाशिवरात्र साजरी होणार आहे. फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी १४ फेब्रुवारी शनिवारी सायंकाळी ४ वाजून २ मिनिटांनी सुरु होईल. (Marathi)

ही तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजेच २ फेब्रुवारी रविवारी सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी समाप्त होईल. त्यामुळे उदय तिथीनुसार प्रदोष व्रत हे १४ तारखेलाच केले जातील. प्रदोषकाळाची वेळ ही १४ फेब्रुवारी सायंकाळी ५ वाजून २५ मिनिटे ते ६ वाजून ५५ मिनिटांपर्यंत असेल. त्यामुळे या शुभ मुहूर्तावर तुम्ही भगवान शिवाची पूजा मांडून सर्व विधी करू शकता. (Religious)

Shanipradosh

शनी प्रदोष व्रताची पूजा विधी
शनी प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करून शिवाची पूजा व उपवास करण्याची प्रतिज्ञा करावी. त्यानंतर संपूर्ण देवघराची स्वच्छता करण्यात यावी. पूजेची सुरुवात गंगा जल अभिषेकाने करावी. त्यानंतर शिवलिंगावर अक्षत, बेलपत्र, भांग, धोतऱ्याचे फुल, फुले, चंदन इत्यादी अर्पण करावेत. धूप आणि दिवा लावून ‘ॐ नमः शिवाय’ या मंत्राचा जप करावा. शिवलिंगासमोर तिळाच्या तेलाचा दिवा लावावा आणि काळे तीळ अर्पण करावेत. “ॐ शं शनैश्चराय नमः” या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. शनी प्रदोष व्रताची कथा ऐकावी. पूजेच्या शेवटी कापूर किंवा तुपाच्या दिव्याने भगवान शंकराची आरती करावी. शेवटी भगवान शंकराचा आशीर्वाद घ्यावा. (Marathi)

शनिप्रदोषाचे महत्त्व
पुराणानुसार हे व्रत केल्यास दीर्घायुष्याचे वरदान मिळते. प्रदोष व्रत हे भगवान शिवाची कृपा मिळवण्यासाठी विशेष मानले जात असले तरी शनि प्रदोष व्रत पाळणाऱ्यांना भगवान शंकराची तसेच शनिदेवाची विशेष कृपा प्राप्त होते. म्हणूनच या दिवशी भगवान शिवासोबत शनिदेवाचीही पूजा करावी. असे मानले जाते की जे लोक हे व्रत करतात त्यांचे सर्व त्रास दूर होतात आणि त्यांना मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो. शनि प्रदोष व्रताचे महत्त्व आणि महिमा शिवपुराणात सांगितले आहे. (Todays Marathi HEadline)

या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने जीवनातील सर्व क्लेश दूर होतात. त्याचबरोबर आरोग्यही प्राप्त होते. हिंदू मान्यतेनुसार शनिप्रदोषाचे व्रत आणि पूजा केल्याने १०० गायींचे दान करण्यासारखे पुण्य मिळते. अपत्य प्राप्तीसाठी शनी प्रदोष व्रतही केले जाते. तुमच्या कुंडलीत शनि दोष असेल तर या दिवशी पूजा करून दिलासा मिळवू शकता. या दिवशी शिवलिंगावर गंगाजल आणि शमीपत्र अर्पण करा. त्यानंतर एक माळ महामृत्यूंजय मंत्राचा जप करा. भगवान शिवाची पूजा केल्याने शनि पीडितून दिलासा मिळतो अशी मान्यता आहे. भक्तांना सुख, सौभाग्य, संपत्तीची प्राप्ती होते. (Top Marathi News)

शनि प्रदोष व्रत कथा
पौराणिक कथेनुसार, एकेकाळी एका गावात एक प्रसिद्ध व्यापारी राहत होता. तो खूप श्रीमंत होता आणि नेहमी इतरांना मदत करत असे. जो कोणी त्याच्या दारात मदत मागायला आला, तो कधीही रिकाम्या हाताने परत देत नाही. परोपकारी स्वभावामुळे त्यांना समाजात चांगली प्रतिष्ठा होती. मात्र, या व्यापाऱ्याला मुलं होत नव्हते. यामुळे तो आणि त्याची बायको कायम दुखी असायचे. एकदा व्यापारी आणि बायको तीर्थ यात्रेला जातात. (Latest Marathi Headline)

========

Mahashivratri : महाशिवरात्रीला घरी अशा पद्धतीने भगवान शंकराची पूजा केल्यास मिळेल उत्तम फळ

Mahashivratra : महाशिवरात्र साजरी करण्यामागच्या आख्ययिका

तीर्थ यात्रेच्या दरम्यान त्यांना एका झाडाखाली एक साधू बसलेले दिसतात. हे साधू ध्यानस्थ अवस्थेत होते. दोघेही साधूकडे गेले आणि त्याच्यासमोर हात जोडून बसले. साधूचे ध्यान संपल्यावर त्यांनी त्या दोघांकडे पाहिले आणि त्यांना सांगितले की तुमचे दु:ख जे काही आहे ते मला अगोदरच माहीती आहे. साधू म्हणाले की, तुम्हाला एक मुलं पाहिजे आहे. यासाठी तुम्ही दोघांनी महादेवाची पूजा करा आणि विधिपूर्वक शनि प्रदोष व्रत करा. शिवच्या कृपेनेच तुम्हाला अपत्यप्राप्ती होईल. यानंतर साधूने त्याला शनि प्रदोष व्रताची पद्धतही सांगितली. (Top Stories)

यानंतर व्यापारी आणि त्याची पत्नी साधूला नमन केले आणि तीर्थयात्रेला निघाले. तीर्थयात्रा करून परतल्यानंतर त्यांनी साधूने सांगितलेल्या पद्धतीनुसार शनि प्रदोष व्रत केले. काही काळ उपवास केल्यावर व्यापाऱ्याची पत्नी गरोदर राहिली आणि तिने मुलाला जन्म दिला. अशा प्रकारे शनि प्रदोष व्रताचे पालन केल्याने त्यांच्या जीवनातील शून्यता भरून निघून कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. (Social News)

(टीप : येथे दिलेली माहिती ही धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे दिलेली आहे.)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.