Home » पहिल्याच हिंदी सिनेमात आईची भूमिका साकारणार ‘ही’ साऊथची सुपरस्टार अभिनेत्री

पहिल्याच हिंदी सिनेमात आईची भूमिका साकारणार ‘ही’ साऊथची सुपरस्टार अभिनेत्री

by Team Gajawaja
0 comment
Shalini Pandey
Share

दाक्षिणात्य चित्रपटांमधून अभिनयाची सुरुवात करत हिंदीमध्ये आपल्या अभिनयाचा डंका वाजवणाऱ्या अनेक अभिनेत्री आज बॉलिवूडमध्ये कार्यरत आहे. या यादीत आता अजून एक नवीन नाव जोडले जाणार आहे. तेलगू सिनेमा ‘अर्जुन रेड्डी’मधून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे जबलपूरची शालिनी पांडे (Shalini Pandey) आता लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. शालिनी यशराजच्या आगामी ‘जयेशभाई जोरदार’ सिनेमातून रणवीर सिंगसोबत पदार्पण करणार आहे. मुख्य म्हणजे शालिनी तिच्या पहिल्याच सिनेमातून मोठ्या पडद्यावर आईच्या भूमिकेत दिसणार आहे. परेश रावलचा मुलगा असलेल्या आदित्य रावलच्या ओटीटी सिनेमा असलेल्या ‘बमफाड’ सिनेमात दिसलेली शालिनी आता ‘जयेशभाई जोरदार’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. जाणून घ्या शालिनीच्या इथवरच्या प्रवासापर्यंत.

जयेशभाई जोरदार चित्रपटाचे दिग्दर्शक असलेल्या मनीष शर्मा यांना शालिनी पांडेच्या (Shalini Pandey) वैशिष्ट्यांबद्दल पाहिल्या दिवसापासूनच माहित होते. या सिनेमाच्या ट्रेलरच्या प्रदर्शनानंतर सर्वत्र शालिनीच्या निरागस भूमिकेचे कौतुक केले जात आहे. निरमा मनीष शर्मा यांनी सांगितले की, “जयेशभाई जोरदार या सिनेमासाठी आम्हाला आधीपासूनच नवीन चेहऱ्याची गरज होती. जेव्हा शालिनीची ऑडिशन पहिली तेव्हा आम्हाला लगेच समजले की, हीच आपल्या नवीन सिनेमाची अभिनेत्री असणार. शालिनी तिच्या अभिनयाबद्दल खूपच आत्मविश्वासू आहे. आम्हाला माहित आहे की नक्कीच ती या सिनेमातून जगातील सर्वच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी होईल.”  

Shalini Pandey

यशराजच्या सिनेमात संधी मिळाल्यामुळे शालिनी पांडे (Shalini Pandey) खूपच आनंदात आहे. यशराजच्या चित्रपटामध्ये मिळालेली संधी ही तिच्यासाठी स्वप्नाप्रमाणेच होती. शालिनी तिच्या या संधीबद्दल म्हणाली की, “एक कलाकार म्हणून यशराजच्या सिनेमात संधी मिळणे प्रत्येक कलाकारांचे स्वप्न असते. मला या चित्रपटात संधी मिळाल्यामुळे मी स्वतःला खूपच नशीबवान समजते. यात अधिक महत्वाचे म्हणजे मला यशराजच्या सिनेमात रणवीर सिंगसोबत काम करण्याची संधी मिळाली. यशराजने मला दिलेली ही संधी मी कधीच विसरणार नाही. रणवीर सिंगसोबत काम करत असल्यामुळे मला माझे १०० टक्के देणे गरजेचे होते. त्याने मला खूपच प्रेरणा दिली. आता लवकरच प्रेक्षकांसमोर सिनेमा येणार असल्याने मी खूपच आतुर आहे.”

शालिनीने तिच्या अभिनयाची सुरुवात जबलपूरमध्ये नाटकांपासून केली. तिने तिच्या ‘अर्जुन रेड्डी’ सिनेमासाठी तेलगू भाषा देखील शिकली. शालिनीच्या (Shalini Pandey) या डेडिकेशनने यशराज फिल्म्सचे सर्व लोकं खूपच प्रभावित झाले होते. शालिनीसोबत यशराजने तीन चित्रपटांचा करार केला आहे. शालिनीने या यशराजच्या या सिनेमाबद्दल सांगितले की, “मी, माझे आई बाबा, नातेवाईक, शेजारचे सर्वच लोकं यशराजचे सिनेमे बघत मोठे झालो. मला यशराजने संधी दिल्यामुळे माझ्यासोबतच माझे आईवडील सर्वात जास्त खुश आहे. मला या सिनेमातून मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी सर्वच खूप उत्सुक आहे.” 

Shalini Pandey

पुढे शालिनीने सांगितले की, “मी किती महिन्यांपासून ‘जयेशभाई जोरदार’ सिनेमाच्या प्रदर्शनासाठी उत्सुक आहे. मी स्वतःलाच मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी खूपच आतुर आहे. हा सिनेमा खूपच खास आणि चांगला आहे. ज्याला आम्ही खूपच समर्पणाने आणि प्रेमाने बनवले आहे. हा माझा पहिलाच हिंदी सिनेमा असल्याने मी या सिनेमासाठी जरा भावनिक आहे.”

=====

हे देखील वाचा – रशिया -युक्रेन युद्धाआधी युक्रेनमध्ये चित्रित झालेल्या ‘लव्ह इन युक्रेन’ सिनेमाचा ट्रेलर लाँच

=====

शालिनीने (Shalini Pandey) पुढे सांगितले की, ‘तिला आशा आहे की, या सिनेमाला प्रेक्षकांचे खूपच प्रेम मिळेल. हा सिनेमा संपूर्ण परिवाराचे मनोरंजन तर करेलच शिवाय काही तरी शिकवण देखील देऊन जाईल. या सिनेमासाठी तिने तिचे १०० टक्के प्रयत्न केले आहे. अतिशय मेहनत करून तिने तिची भूमिका साकारली आहे. तिची भूमिका आणि हा सिनेमा नक्कीच यशस्वी होईल अशी तिला आशा आहे. ही भूमिका साकारण्यासाठी तिने गृहिणींचे आणि गर्भवती महिलांचे खूप निरीक्षण केले. यासोबतच गुजराती महिलांना देखील तिने खूप पाहिले. चालणे, बोलणे, बसणे आदी अनेक गोष्टींचा बारीक अभ्यास करून तिने ही भूमिका साकारली आहे.’


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.