Home » लोकांच्या घरी धुणी-भांडी करणारी ही महिला झाली बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्री

लोकांच्या घरी धुणी-भांडी करणारी ही महिला झाली बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्री

बॉलिवूडमधील काही प्रसिद्ध आणि सुंदर अभिनेत्री झाल्या आहेत. काही अभिनेत्रींनी आपल्या दमदार अदांनी चाहत्यांच्या मनांवर अधिराज्य केले.अशाच एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत.

by Team Gajawaja
0 comment
Shahikala Life Story
Share

Shahikala Life Story : बॉलिवूडमधील काही प्रसिद्ध आणि सुंदर अभिनेत्री झाल्या आहेत. काही अभिनेत्रींनी आपल्या दमदार अदांनी चाहत्यांच्या मनांवर अधिराज्य केले.अशाच एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत. ही अभिनेत्री श्रीमंत घरातील होती. पण नंतर जेव्हा वडीलांचा व्यवसाय ठप्प पडला तेव्हा लोकांच्या घरी धुणी-भांडी करण्याची वेळ अभिनेत्रीवर आली होती.

एवढेच नव्हे अभिनेत्रीला फुटपाथवरही झोपावे लागत होते. काही दिवस उपासमारीचेही काढले आहेत. पण बॉलिवूडमधील सर्वाधिक यशस्वी अभिनेत्रींमध्ये तिने आपले नाव कोरले. या अभिनेत्रीने 100 हून अधिक सिनेमांमध्ये काम केले. बहुतांश सिनेमांमध्ये सपोर्टिंग भूमिकाही साकारली. याशिवाय सिनेमात आजीचीही भूमिका साकारली होती. खरंतर ही अभिनेत्री दुसरी कोणी नव्हे शशिकला आहे.

श्रीमंतीत गेले बालपण
शशिकला यांचा जन्म 4 ऑगस्ट 1932 रोजी महाराष्ट्रातील सोलापुरात झाला होता. त्यांचे संपूर्ण नाव शशिकला जवळर होते. अभिनेत्रीचे बालपण फार श्रीमंतीत गेले होते. कारण वडील अनंतराव जवळकर एक व्यावसायिक होते. त्यांचा कापडाचा व्यवसाय होता. पण नंतर घराची स्थिती बदलली गेली. वडीलांचा व्यवसाय ठप्प पडला होता. (Shahikala Life Story)

दिवाळखोर झाले होते वडील
एक काळ असा आला जेव्हा शशिकला यांच्या वडीलांना आर्थिक तंगीचा सामना करावा लागला होता. ते दिवाळखोर झाले होते. अभिनेत्रीने आपल्या एका मुलाखतीत म्हटले होते, भाऊ लंडनमध्ये शिकत होता. वडील संपूर्ण पैसे भावाला पाठवत होते. यामुळेही आर्थिक तंगीचा सामना करावा लागला. असे सांगितले जाते की, जेव्हा शशिकला यांच्या भावाला नोकरी लागली तेव्हा तो वडीलांचे सर्व ऋण विसरला.

दरम्यान, शशिकला यांचे बालपण श्रीमंतीत गेले हे खरे आहे. पण बालपणातही स्ट्रगल करावा लागला होता. वडीलांचा व्यवसाय बंद पडल्यानंतर अभिनेत्रीने लोकांच्या घरी धुणी-भांडीचे काम केले. या सर्व काळात काही दिवस उपासमारीही सहन करावी लागली. यानंतर अभिनेत्री नूरजहा यांच्या भेटीनंतर शशिकला यांच्या आयुष्याला कलाटणी लागली.

बालकलाकार म्हणून काम
वर्ष 1945 मध्ये प्रदर्शित झालेला जीनत सिनेमात नूरजहां यांच्या सिफारशीमुळे शशिकला यांना एक लहान भूमिका सिनेमात मिळाली होती. या सिनेमात काम करण्यासाठी शशिकला यांना 25 रुपये मिळाले होते. यानंतर शशिकला यांनी आपल्या करियरमध्ये आरजू, सरकार, सबसे बडा रुपया, जुगनू अशा काही सिनेमांमध्ये काम केले. शशिकला यांचे वयाच्या 88 व्या वर्षी निधन 4 एप्रिल 2021 रोजी मुंबईत झाले होते.


आणखी वाचा :
शाहरुख खानने केलेल्या या विधानामुळे संतप्त झालेल्या सनी देओलने फाडली होती स्वत:चीच पँट, वाचा मजेशीर किस्सा
ड्रायवर ते ‘किंग ऑफ़ कॉमेडी’ मेहमूद यांचा प्रवास

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.