Shaheed Diwas: देशात २३ मार्चला आणि ३० जानेवारीला ही शहीद दिवस साजरा केला जातो. परंतु या दोन्ही दिवशी घडलेल्या घटना वेगळ्या आहेत. कारण ३० जानेवारीला महात्मा गांधी यांची हत्या करण्यात आली होती. तर २३ मार्च १९३१ रोजी भगत सिंह, राजगुरु आणि सुखदेव यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यामुळेच त्यांच्या आठवणीत २३ मार्चला शहीद दिवस साजरा केला जातो. पण ३० जानेवारीला असणारा शहीद दिवस हा महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीला समर्पित आहे.
३० जानेवारीला झाली होती गांधीजींची हत्या
भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात सर्वाधिक प्रसिद्ध नाव महात्मा गांधीचे आहे. त्यांना ‘राष्ट्रपिता’ अशा नावाने ही संबोधले जाते. ३० जानेवारी १९४८ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची बिर्ला हाउसमध्ये हत्या करण्यात आली होती. भारतात ३० जानेवारी हा महात्मा गांधी यांच्या आठवणीत शहीद दिवस साजरा केला जातो.
गांधीजींची हत्या नथूराम गोडसे यांनी केली होती. गोडसे यांनी गांधीजींची हत्या करण्यापूर्वी त्यांचे चरणस्पर्श ही केले होते. गोडसे यांनी महात्मा गांधींवर गोळ्या झाडत त्यांची हत्या केली. पण असे म्हटले जाते की, गांधीच्या तोंडातून तेव्हा अखेरचे तीन शब्द ‘हे राम’ निघाले होते. अशातच बापूंना सन्मान देण्यासाठी, शहीद दिवस हा ३० जानेवारीला साजरा केला जातो.
गांधीजींच्या समाधीवर वाहिली जातात फुलं
शहीद दिवसानिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह विविध शासकीय व्यक्ती राजघाटावर असलेल्या गांधीजींच्या समाधीला भेट देतात. त्यांना स्मरुन तेथे फुलं वाहिली जातात. शहीद दिवसावेळी प्रत्येकजण आपल्या पद्धतीने गांधीजींची आठवण काढतो. देशातील सशस्र बलाचे जवान आणि अंतर-सेवा आकस्मिक शहीदांना सन्मानजक सलामी दिली जाते. बापू आणि देशातील अन्य शहीदांच्या आठवणीत २ मिनिटांचे मौन ही राखले जाते.(Shaheed Diwas)
गांधींजींचा आदर्श जगभरात प्रसिद्ध
प्रेमाने बापू बोलल्या जाणाऱ्या महात्मा गांधींनी नेहमीच सत्याच्या मार्गाने चालण्यासह हिंसेपासून दूर राहिले. त्यांनी भारताला एक धर्मनिरपेक्ष आणि एक अहिंसक राष्ट्राच्या रुपात बनवणारे एक प्रबळ समर्थक होते. यामुळे त्यांच्यावर खुप टिका ही झाली होती. तर महात्मा गांधीजींच्या विचारांचा आदर्श आजही जगभरात घेतला जातो.
हे देखील वाचा- राष्ट्रीय मतदार दिवस का साजरा केला जातो?
गुजरातच्या पोरबंदरात झाला होता जन्म
२ ऑक्टोंबर, १८६९ रोजी गुजरातच्या पोरबंदारत महात्मा गांधी यांचा जन्म झाला होता. इंग्लंड मध्ये उच्च शिक्षण घेतले. देशात होत असलेल्या अत्याचारामुळे ब्रिटिश शासनाच्या विरोधात स्वातंत्र्य संग्रामाचे हिस्सा बनले. त्यांनी भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाला सत्य आणि अहिंसेचा परिचय करुन दिला.