Home » शहीद दिवस का साजरा केला जातो?

शहीद दिवस का साजरा केला जातो?

by Team Gajawaja
0 comment
Shaheed Diwas 2023
Share

Shaheed Diwas 2023: शहादत शब्दाचा वापर अशा लोकांसाठी केला जातो ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती हसत-हसत मातृभूमिच्या सेवेसाठी अर्पण केले. आज शहीद दिवस साजरा केला जात आहे. आजच्या दिवसाबद्दल प्रत्येकालाच माहिती असेल. परंतु याचे महत्व, इतिहास याबद्दल अधिक जाणून घेणार आहोत. आजच्या दिवशी १९३१ मध्ये इंग्रजांनी भारतीय युवा क्रांतिकारी भगत सिंह, शिवराम राजगुरु आणि सुखदेव थापर यांना फाशीची शिक्षा दिली. वयाच्या केवळ २३ व्या वर्षी त्यांनी आपले प्राण देशासाठी बलिदान केले. त्यामुळेच त्यांना शहीद-ए-आजम असे म्हटले जाते. या बदिलानानंतर संपूर्ण देशातील तरुणांचे रक्त स्वातंत्र्य मिळवण्यासाठी पेटून उठले होते. याच कारणास्तव भारतीय स्वतंत्रता आंदोलनाच्या इतिहासात त्यांना अधिक महत्व दिले जाते.

भगत सिंह, सुखदेव आणि राजगुरू भारतीय स्वतंत्र आंदोलनातील गरम दलाच्या मार्गावरील सेनानी होते. कम्युनिस्ट पद्धतीने रस्त्यावर आंदोलन करण्यासह ब्रिटिश हुकूमतला गोळी-बंदुकींच्या भाषेत उत्तर देण्याचे समर्थक होते. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन संघटना बनून ते प्रत्येक पद्धतीने स्वतंत्रता आंदोलनाला वाढवत होते. वर्ष १९२८ मध्ये भारतात आलेल्या सायमन कमीशनचा विरोध करणाऱ्या लाला लजपत राय यांच्यावर इंग्रज पोलिसांनी लाठीमार करत त्यांची हत्या केली.

याचाच सूड घेण्यासाठी भगत सिंह, चंद्रशेखर आजाद यांनी ब्रिटिश पोलीस अधिकारी जेम्स स्कॉट यांच्या वेषात १७ डिसेंबर १९२८ ला आणखी एक अधिकारी जॉन सांडर्स यांची हत्या केली. या हत्येनंतर इंग्रजांची कानउघडणी करण्यासाठी भगत सिंह यांनी बटुकेश्वर दत्त यांच्या सोबत ब्रिटिश असेंबली मध्ये ८ एप्रिल १९२९ रोजी स्फोट करणारा बॉम्ब फेकला आणि स्वत: ला अटक करवून घेतली. एका गद्दारच्या कारणास्तव त्यांना सांडर्स यांच्या हत्येत सहभागी असल्याची माहिती सुद्धा इंग्रज सरकारला मिळाली. याच दरम्यान, सुखदेव आणि राजगुरु यांना ही अटक झाली. या तिघांवर हत्येचा खटला चालवला गेला आणि जवळजवळ २ वर्षानंतर फाशीची शिक्षा सुनावली. (Shaheed Diwas 2023)

हे देखील वाचा- जेव्हा चीनने खुलेपणाने केली होती चिमण्यांची हत्या…

भगत सिंह, राजगुरु आणि सुखदेव यांना फाशी देण्यासाठी २४ मार्च १९३१ च्या सकाळी ६ वाजताची वेळ ठरवण्यात आली होती. लाहौर सेंट्रल तुरुंगाबाहेर दोन दिवस आधीच लोकांनी तुफान गर्दी होऊ लागली होती. ही गर्दी पाहता कलम १४४ लागू करण्यासाठी सुद्धा इंग्रज घाबरत होते. फाशाची वेळ १२ तास आधीच केली गेली आणि २३ मार्च १९३१ रोजी संध्याकाळी ७ वाजता तिघांना फाशीची शिक्षा दिली. यापूर्वी तिघांना आपल्या नातेवाईकांना भेटण्याची परवानगी सुद्धा दिली नाही. इंग्रजांनी लोकांच्या संतापापासून दूर राहण्यासाठी तिघांचे मृतदेह तुरुंगाची भिंत फोडून बाहेर काढणे आणि रावी नदीच्या तटावर जाळले. याच्यासोबत या तीन तरुणांचे नाव नेहमीच इतिसाहात कोरले गेले.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.