Home » सूर्यग्रहणाची छाया आणि घटस्थापना

सूर्यग्रहणाची छाया आणि घटस्थापना

by Team Gajawaja
0 comment
Shadow Of A Solar Eclipse
Share

यावर्षातले दुसरे सूर्यग्रहण 2 ऑक्टोबर रोजी होत आहे. हे सूर्यग्रहण दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका, पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर आणि उत्तर अमेरिकेत दिसणार आहे. भारतात मात्र सूर्यग्रहण दिसणार नाही. हे कंकणाकृती सूर्यग्रहण असून त्यालाच ‘रिंग ऑफ फायर’ देखील म्हणतात. या काळात सूर्याच्या काठावर एक पांढरी रिंग दिसेल. हे ग्रहण भारतात दिसणार नसले तरी याच दिवशी सर्वपित्री आमवश्या व त्यानंतर शारदीय नवरात्री सुरु होत असल्यानं ग्रहणासंदर्भात अनेक गैरसमज पसरवण्यात येत आहे. वास्तविक या ग्रहणाचा कुठलाही प्रभाव भारतावर पडणार नसल्याचे जाणकारांनी सांगितले आहे. तसेच 3 ऑक्टोबरला सुरु होणा-या शारदीय नवरात्रीच्या कलश स्थापनेवरही ग्रहणाची छाया नसल्याचे जाणकारांनी स्पष्ट केले आहे. या वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाची सावली शारदीय नवरात्रीवर पडणार आहे का, याची चर्चा सुरु आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रहण अशुभ मानले जाते. ग्रहण जेव्हा असेल त्याच्या आधी काही तास सुतक कालावधी सुरू होतो. सुतक काळात किंवा ग्रहण काळात कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई करण्यात येते. 2 ऑक्टोबर रोजी सर्वपित्री अमावश्या आहे. शिवाय त्याच्या दुस-या दिवशी शारदीय नवरात्री सुरु होत आहे. अशा स्थितीत घटस्थापना कधी करायची याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. (Shadow Of A Solar Eclipse)

सूर्यग्रहण 2 ऑक्टोबरला म्हणजेच सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी होणार आहे. हे सूर्यग्रहण भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजून 14 मिनिटांनी सुरु होईल. 3 ऑक्टोबरला पहाटे 3 वाजून 17 मिनिटांनी ग्रहण संपणार आहे. 3 ऑक्टोबरलाच शारदीय नवरात्रीचे कलशस्थापना आहे. मात्र, हे सूर्यग्रहण ग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे त्याचे कोणतेही परिणाम नसल्याचे सांगण्यात आले आहे. शारदीय नवरात्रीच्या घटस्थापना करतांना 3 ऑक्टोबरला सकाळी 5 ते 7 हा शुभ मुहूर्त असल्याची माहिती आहे. यावेळी कलशाची स्थापना करणे शक्य नसेल तर अभिजीत मुहूर्तावर कलशाची स्थापना करणे देखील शुभ मानले जाते. अभिजीत मुहूर्त त्या दिवशी सकाळी 11 वाजून 52 मिनिटांपासू सुरु होणार आहे. दुपारी 12 वाजून 40 मिनीटांपर्यंत हा अभिजीत मुहूर्त असणार आहे. (Shadow Of A Solar Eclipse)

या शुभ मुहूर्तावर कलशाची स्थापना करण्याचेही सांगण्यात आले आहे. तसेच सर्वपित्री अमावस्येला श्राद्ध विधीही करता येणार आहेत. पंचांगानुसार, सर्व पितृ अमावस्या 1 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 9 वाजून 39 मिनीटांनी सुरू होईल. 3 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 12 वाजून 18 मिनीटांनी वाजता समाप्त होणार आहे. हिंदू धर्मात अमावस्या उदयतिथीपासून साजरी केली जाते. अशा परिस्थितीत या वर्षी अमावस्या उदयती तिथीनुसार 2 ऑक्टोबर 2024 रोजी वैध असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. सूर्यग्रहण भारतातून दिसणार नसल्यामुळे तर्पण आणि श्राद्ध विधींमध्ये कोणताही अडथळा येणार नसल्याचेही जाणकारांनी सांगितले आहे. याशिवाय सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी 3 शुभ योग तयार होत असल्याची माहिती आहे. ब्रह्मयोग 3 ऑक्टोबर रोजी पहाटेपासून दुसऱ्या दिवशी पहाटे 3वाजून 22 मिनिटां पर्यंत सुरू असतो. त्यानंतर इंद्र योग होईल. तसेच, सर्वार्थ सिद्धी योग दुपारी 12 वाजून 23 मिनीटांपासून सुरू होईल, जो 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 लाडून 15 मिनिटात वाजता समाप्त होणार आहे. (Shadow Of A Solar Eclipse)

==================

हे देखील वाचा : या धरणाचे पृथ्वीलाही ओझे !

================

भारतात सूर्यग्रहणाबाबत साशंकता व्यक्त होत असली तरी युरोपात मात्र सूर्यग्रहण पहाण्यासाठी तयारी सुरु आहे. सूर्यग्रहण पाहण्यासाठी विशिष्ट चष्मे तयार करण्यात आले आहेत. 2 ऑक्टोबर रोजी होणारे सूर्यग्रहण हे कंकणाकृती सूर्यग्रहण असेल. हे ग्रहण दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका, पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर, उत्तर अमेरिका येथे पाहिले जाऊ शकते. त्यानंतर 29 मार्च 2025 रोजी आंशिक सूर्यग्रहण होईल. हे सूर्यग्रहणही भारतात दिसणार नाही. युरोप, आशियातील काही भाग, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अटलांटिक महासागर, आर्क्टिक महासागर येथून ते पहाता येईल. 21 सप्टेंबर 2025रोजी ही आंशिक सूर्यग्रहण आहे. हे सूर्यग्रहण ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर मध्ये दिसणार आहे. त्यानंतर 17 फेब्रुवारी 2026 रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण होईल. हे सूर्यग्रहण अंटार्क्टिका, आफ्रिका, दक्षिण अमेरिका, पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर आणि हिंदी महासागराच्या इतर भागांमधून दिसणार आहे. त्यामुळे पुढच्या वर्षीही भारतातून कुठलेही सूर्यग्रहण दिसणार नाही. (Shadow Of A Solar Eclipse)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.