Home » Shi Yongxin : चीनच्या शाओलिन मंदिरातील पुजा-याच्या कृत्याने खळबळ!

Shi Yongxin : चीनच्या शाओलिन मंदिरातील पुजा-याच्या कृत्याने खळबळ!

by Team Gajawaja
0 comment
Shi Yongxin | Latest Marathi Headlines
Share

चीनमधील प्रतिष्ठित शाओलिन मंदिराचे प्रमुख शी योंग्झिन यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपामुळे अवघ्या चीनमध्ये खळबळ उडाली आहे. 495 मध्ये स्थापन झालेल्या या शाओलिन मंदिराच्या सध्याच्या प्रमुखांवर अनेक महिलांशी लैंगिक संबंध ठेवल्याचा आणि भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहे. या आरोपांची माहिती खुद्द मंदिराकडूनच एका निवेदनाद्वारे देण्यात आली आहे. शाओलिन मंदिराचे मठाधिपती शी योंग्झिन यांच्यावर पैशांची अफरातफर, लैंगिक गैरवर्तन आणि बौद्ध नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप असून त्यांची चौकशी सुरु झाली आहे. मठाधिपती शी योंग्झिन हे 150 हून अधिक मुलांचे वडिल असल्याचाही धक्कादाक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. शी योंग्झिन ज्या शाओलिन मंदिराचे प्रमुख आहेत, त्यापुढे अवघे चीन नतमस्तक होते. हेनान प्रांतातील सोंग पर्वताच्या पायथ्याशी असलेले शाओलिन मंदिर हे केवळ चीनमधीलच नाही तर जगातील सर्वात प्रसिद्ध बौद्ध मठांपैकी एक आहे. बौद्ध धर्म आणि शाओलिन कुंग फू चे जन्मस्थान म्हणूनही हे शाओलिन मंदिर वंदनीय आहे. याच्याच प्रमुखांनी केलेल्या भ्रष्टारामुळे अवघ्या चीनमध्ये संतापाचे वातावरण आहे. (Shi Yongxin)

चीनच्या प्रसिद्ध शाओलिन मंदिराचे मुख्य पुजारी आणि मठाधिपती शी योंग्झिन यांच्यावर आर्थिक घोटाळा, लैंगिक गैरवर्तन आणि बौद्ध नियमांचे उल्लंघन असे गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. हे आरोप शाओलिन मंदिरातील वरिष्ठ समितीन लावले आहेत. या समितीच्या अहवालानं अवघ्या चीनला धक्का बसला आहे. आता शी योंग्झिन यांच्याविरुद्ध पोलींसाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. मंदिराच्या मालमत्तेचा आणि प्रकल्प निधीचा गैरवापर केल्याचाही शी योंग्झिन यांच्यावर आरोप आहेतच शिवाय अनेक महिलांशी लैंगिक संबंध ठेऊन त्यांनी मुलांना जन्म दिला आहे. शी योंग्झिन यांच्या या कृत्यामुळे शाओलिन मंदिराच्या प्रतिष्ठेला जबर धक्का बसला आहे. (International News)

चीनमध्ये शाओलिन मंदिर हे बौद्ध धर्म आणि मार्शल आर्ट्स चे एक पवित्र केंद्र मानले जाते. 495 मध्ये स्थापन झालेले शाओलिन मंदिर हेनान प्रांतातील सोंग पर्वताच्या पायथ्याशी आहे. हे मंदिर जैन  बौद्ध धर्माचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाते. सोबतच शाओलिन मंदिर हे चिनी कुंग फू मार्शल आर्टचे जन्मस्थान म्हणूनही ओळखले जाते. या मंदिराचा उल्लेख अनेक चित्रपटांमध्ये करण्यात आला आहे. विशेषतः जेट लीच्या एका चित्रपटाचे नाव शाओलिन टेंपल आहे. या शाओलिन मंदिरावर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत. शाओलिन मंदिरातील भिक्षू शतकानुशतके संपूर्ण आशियामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार करीत आहेत. या मंदिराच्या प्रतिष्ठेमुळे जगभरातील लाखो पर्यटक येथे नतमस्तक होण्यासाठी येतात. याच मंदिराची प्रतिष्ठा आता शी योंग्झिन यांच्यामुळे धुळीला मिळाली आहे. (Shi Yongxin)

शी योंगझिन, यांचे मूळ नाव लिऊ यिंगचेंग आहे. त्यांनी 1981 या शाओलिन मंदिरात विद्यार्थी म्हणून प्रवेश केला. 1999 मध्ये शी योंग्झिन हे शाओलिन मंदिराचे मठाधिपती झाले. शी योंग्झिन हे चीनमधील एमबीए पदवी मिळवणाऱ्या पहिल्या भिक्षूंपैकी एक आहेत. त्यांनी आपल्या या शिक्षणाचा उपयोग करुन शाओलिन मंदिराचे व्यवसायात रूपांतर केले. त्यावरुन त्यांच्यावर टीका करण्यात येत होती. अर्थात 59 वर्षीय शी योंगझिन यांच्यावर यापूर्वीही अनेक आरोप झाले आहेत. त्यांच्यावर निधीचा अपहार केल्याचा आरोप पूर्वीही झाला होता. मात्र चौकशीमध्ये हे आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत आणि शी योंग्झिन यांची निर्दोष मुक्तता झाली. याशिवाय 2016 मध्ये त्यांच्यावर महिलांवर लैंगिक अत्याचार करीत असल्याचाही आरोप झाला. मात्र यातूनही शी योंग्झिन यांची निर्दोष मुक्तता झाली. याचवेळी शी योंग्झिन आणि त्यांच्या कथित प्रेयसीनं मुलांसह पळून जाण्याचा बेत रचल्याची चर्चाही रंगली होती. (International News)

===================

हे देखील वाचा :  Cambodia : कंबोडियाला स्वातंत्र्य कसे मिळाले? वाचा इतिहास

===================

पण शी योंग्झिन यांनी या सर्व आरोपांचे खंडन केले. शी योंग्झिन यांची रहाणी अतिशय विलासी आहे. अलिशान गाड्यांचा ताफा कायम त्यांच्या सेवत उभा असतो. याशिवाय अन्य सुखसुविधाही त्यांच्या निवासस्थानी आहेत, यामुळे शाओलिन मंदिरातील अनेक बौद्ध भिक्षुकांनी त्यांच्यापासून चार हात दूर रहाण्याचे धोरण स्विकारले होते. सध्या शी योंग्झिन हे चीनच्या बौद्ध संघटनेचे उपाध्यक्ष आहेत. त्यांनी चीनची सर्वोच्च कायदे करणारी संस्था असलेल्या नॅशनल पीपल्स काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणूनही काम केले आहे. चीनमधील प्रभावशाली लोकांमध्ये एकेकाळी त्यांची गणना होत असे, आता त्याच शी योंग्झिन यांच्या वर्तणुकीमुळे अवघ्या चीनमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. (Shi Yongxin)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.