वय वाढणे ही आपल्या आयुष्यातील सामान्य बाब आहे. सीनियर सिटीजन भले शरीराने कमजोर होतात. मात्र त्यांच्याकडे ज्ञान आणि विविध अनुभवांचे भांडार असते. सीनियर सिटीजन यांना समाजात मोकळेपणाने आणि आनंदाने जगता यावे म्हणून राज्य सरकारकडून काही सुविधा त्यांना उपलब्ध करुन दिल्या जातात. त्यानुसार प्रवास ते आरोग्य सेवा आणि इनकम टॅक्स मध्ये सुद्धा त्यांना सूट मिळते. त्याचसोबत अतिरिक्त व्याजाची सुविधा सुद्धा मिळते. अशातच तुमच्या घरी एखादे सीनियर सिटीजन असतील तर त्यांना पुढील काही सुविधा मिळतात. (Senior Citizen Scheme)
इनकम टॅक्समध्ये सूट
६० वर्षावरील सिनीयर सिटीजन व्यक्तींना इनकम टॅक्समध्ये विशेष सूट मिळते. वरिष्ठ नागरिकांना वार्षिक ३ लाखांच्या उत्पन्नावर टॅक्स लागत नाही. सुपर सीनियर सिटीजन म्हणजेच ज्यांचे वय ८० वर्षापेक्षा अधिक आहे त्यांच्यासाठी टॅक्स फ्री कमाईची मर्यादा ५ लाख रुपये आहे.
हेल्थ इंन्शुरन्समध्ये सूट
जसे जसे वय वाढते तेव्हा व्यक्तीला आजार होऊ लागतात. त्यामुळे इनकम टॅक्स अॅक्ट १९६१ नुसार कलम ६० डी अंतर्गत सिनीयर सिटीजन व्यक्तींना ३० हजारांपर्यंत हेल्थ इंन्शुरन्स प्रीमियमवर सूट मिळते. वरिष्ठ नागरक गंभीर आजाराप्रकरणी ८० डीडीबी अंतर्गत ६० हजारांपर्यंत टॅक्स डिडक्शनचा लाभ घेऊ शकता. सुपर सीनियर सिटीजनसाठी ही मर्यादा ८० हजार रुपये आहे.
प्रवासात सूट
विमान कंपन्या सिनीयर सिटीजन व्यक्तींना विमानाच्या तिकिटावर ५० टक्के सूट देते. भारतीय रेल्वे सुद्धा सीनियर सिटीजन यांना रेल्वेच्या तिकिटावर सूट देते. खरंतर कोरोना काळात ही सूट देण्यास सुरुवात केली होती. ती आतापर्यंत पुन्हा सुरु करण्यात आलेली नाही. मात्र काही राज्य सरकारकडून नागरिकांना बस भाड्यात सूट दिली जाते. या व्यतिरिक्त मेट्रो आणि सिटी बसमध्ये वरिष्ठ नागरिकांसाठी काही सीट्स आरक्षित असतात.
बँकेत जमा रक्कमेवर अधिक व्याज
सर्व शासकीय आणि खासगी बँकांसह आर्थिक संस्था सर्व वरिष्ठ नागरिकांना विशेष प्राथमिकता देते. बँक फिक्स्ड डिपॉजिटवर नागरिकांना सामान्य नागरिकांच्या तुलनेत अधिक टक्क्याने व्याज देते. या व्यतिरिक्त सीनियर सिटीजन्ससाठी विशेष बचत आणि गुंतवणूक योजना सुद्धा राबवल्या जातात. (Senior Citizen Scheme)
हेही वाचा- वैवाहिक आयुष्यात आनंदित राहण्यासाठी ‘या’ मनी मॅनेजमेंट टीप्स करा फॉलो
विशेष योजना
सरकार काही वरिष्ठ नागरिकांसाठी कल्याण योजना राबवते. नॅशनल इंन्शोरन्स कंपनी ६० ते ८० वर्षातील सिनीयर सिटीजन्ससाठी वरिष्ठ मेडिक्लेम पॉलिसी चालवते. यामध्ये रुग्णालयात भरती झाल्यास अधिकाधिक एक लाखांपर्यंत आणि गंभीर रुपात आजारी असल्यास २ लाखांपर्यंत रक्कमेची मदत करते.