Home » माया संस्कृतीची रहस्ये…

माया संस्कृतीची रहस्ये…

by Team Gajawaja
0 comment
North America
Share

युनायटेड मेक्सिकन स्टेट्स यालाच मेक्सिको म्हणून ओळखले जाते. उत्तर अमेरिका स्थित हा एक देश आहे.  या देशाच्या उत्तरेला युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आहे. पश्चिमेस, ग्वाटेमाला, बेलीझ आणि दक्षिणेस कॅरिबियन समुद्र आणि पूर्वेस मेक्सिकोचे आखात आहे.  याच मेक्सिकोमध्ये माया संस्कृती होती. माया संस्कृती ही अत्यंत प्रगत संस्कृती होती. मध्यंतरी याच माया संस्कृतीचे कॅलेंडर आणि त्यातील अखेरचा दिवस यावर मोठी चर्चा झाली आहे. आता पुन्हा मेक्सिकोमधील माया संस्कृती चर्चेत आली आहे. त्याला कारण झाले आहे, येथील जंगलात सापडलेले 1000 वर्षापूर्वीचे मोठे शहर.  मेक्सिकोच्या अनेक भागात अद्यापही अशी घनदाट जंगले आहेत की, ज्यामध्ये सहजासहजी प्रवेश करता येत नाही. अशाच घनदाट जंगलामध्ये एक शहर लपून बसले होते. या शहराची व्याप्ती एवढी आहे की, त्यात 50 फूटी इमारतीही चांगल्या स्थितीत आढळल्या. हवाईमार्गानं पाहणी करुन या माया संस्कृतीतील शहराचा शोध घेण्यात आला आहे. आता यावर अनेक संशोधक अभ्यास करत असून त्यातून माया संस्कृतीची अनेक रहस्ये उघड होण्याची शक्यता आहे.  (North America)

1000 वर्षे जुने माया संस्कृतीचे शहर मेक्सिकोमधील घनदाट जंगलात सापडले आहे. या शहराच्या आत मोठी पिरॅमिड, अत्यंत सुनियोजीत बाजारपेठ आणि इतर अनेक पुरातत्त्वीय पुरावे सापडले आहेत. माया संस्कृतीचे हे शहर पाहून याचा शोध लावणा-यांना शास्त्रज्ञांनाही सुखद धक्का लागला आहे.  एवढे हे शहर आधुनिक आहे. लॅटिन अमेरिकेतील अनेक देशांमध्ये माया संस्कृती मोठ्या प्रमाणात पसरली होती.  मात्र काळाच्या ओघात ही माया संस्कृती लोप पावली.  (North America)

आता याच माया संस्कृतीचे शहर मेक्सिकोच्या युकाटन द्वीपकल्पात सापडले आहे. लॅटिन अमेरिकन देश असलेल्या मेक्सिकोमधील माया संस्कृती ही नेहमी चर्चेचा विषय राहिली आहे.  याच माया संस्कृतीचे मोठे शहर ह्यूस्टन विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी हवाई सर्वेक्षणादरम्यान शोधले आहे.  या शहराचा शोध घेणा-या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार 1000 वर्षांपूर्वी माया संस्कृतीतील लोकांनी हा परिसर काही कारणांनी सोडला होता. पुरातत्व सर्वेक्षणाचे नेतृत्व करणारे सहाय्यक प्राध्यापक जुआन कार्लोस हे या शोधावर खुश आहेत.  यातून माया संस्कृतीची अनेक रहस्ये बाहेर येणार आहेत. 1000 वर्षापूर्वी प्रगत अशी ही संस्कृती अचानक कशी गायब झाली, हे सर्वात मोठे रहस्यही यातून बाहेर येऊ शकेल असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. या सर्व शोधकार्यात LIDAR या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. त्यातून घनदाट जंगल आणि गवताखाली लपलेल्या संरचनांचा शोध घेता आला. या सर्वेक्षणादरम्यान नष्ट झालेल्या संस्कृतीचे अनेक अवशेष सापडले.  त्यात 50 फूट उंच पिरॅमिडसारखी रचनाही सापडली आहे. याशिवाय पुरातत्त्वीय महत्त्वाच्या अनेक गोष्टी सापडल्या आहेत. (North America)

शास्त्रज्ञांच्या मते,  हे सर्व अवशेष सुमारे 600 ते 900 इ.स. मधील आहेत.  हा सर्व काळ माया संस्कृतीचा काळ मानला जातो. आता ही जागा संपूर्ण जंगलांनी व्यापली होती.  हवाई मार्गानं शहर शोधल्यावर प्रत्यक्ष ठिकाणी जातांना शास्त्रज्ञांना खूप संघर्ष करावा लागला. कारण या सर्व भागात मोठे वृक्ष होते. त्यांना तोडून ती जागा साफ करण्यात खूप वेळ गेला. शिवाय सर्व शहरांच्या अवशेषांवर गवत आणि अन्य छोट्या वनस्पती होत्या.  हे सर्व साफ करुन मुळ शहराचा ढाचा शोधण्यासाठी शोधकर्त्यांना खूप मेहनत घ्यावी लागली.  हे सर्व जंगल साफ केल्यावर या जागी मोठं शहरच असल्याचे पुढे आले. येथे मोठ्या इमारती, पिरॅमिड, बागा, बाजारपेठा आणि अनेक छोटी घरेही सापडली आहेत.  सर्व बांधकाम दगडी असून सर्व सुनियोजत होते.  यातील पिरॅमिडची उंची सर्वाधिक आहे आणि हे पिरॅमिड शहराच्या मध्यभागी आहे. माया संस्कृती दक्षिण मेक्सिको, ग्वाटेमाला, बेलीझ, होंडुरास आणि एल साल्वाडोरमध्ये पसरली होती. आता या भागातही अशीच शोध मोहिम शास्त्रज्ञांकडून करण्यात येणार आहे. तसेच या शहरात काही भुयारी मार्ग आहेत का, याचाही शोध घेतला जात आहे. माया संस्कृतीची नगरे भुयारी मार्गांनी एकमेकांना जोडलेली होती, त्यामुळे हे शहरही कुठल्या अन्य शहराबरोबर जोडले गेले आहे का ? याचा तपास आता शास्त्रज्ञ करीत आहेत.  (North America)

=======

हे देखील वाचा : गणपती बाप्पा करतात इंडोनेशियाचे ज्वालामुखीपासून रक्षण

=======

माया संस्कृती ही संपूर्णपणे शेतीवर आधारित होती.  माया संस्कृतीतील लोक कला, गणित, स्थापत्य, ज्योतिष आणि लेखन या क्षेत्रात विद्वान होते.  या काळात शेती आणि शहराचा विकास झाला. या संस्कृतीच्या सर्वात उल्लेखनीय इमारती म्हणजे त्यांनी धार्मिक केंद्रे म्हणून बांधलेले पिरॅमिड. माया संस्कृतीने एक कॅलेंडर तयार केले होते ज्यामध्ये विविध धार्मिक सण आणि खगोलशास्त्रीय घटनांचे वर्णन आढळते.  याला माया संस्कृतीचे कॅलेंडर म्हणतात.  माया संस्कृतीच्या कॅलेंडरमध्ये 2012 मध्ये जगाचा अंत होईल असे भाकीत केले होते,  त्यावर आधारीत चित्रपटही काढण्यात आले.  आता पुन्हा याच माया संस्कृतीचे आधुनिक शहर सापडल्यानं चर्चेत आली आहे.  

सई बने

 


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.