Home » Gupt Navratri : गुप्त नवरात्रीचे रहस्य !

Gupt Navratri : गुप्त नवरात्रीचे रहस्य !

by Team Gajawaja
0 comment
Gupt Navratri | Top Stories
Share

हिंदू धर्मात एका वर्षात चार नवरात्र असतात. त्यातील आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून नवमीपर्यंत गुप्त नवरात्र साजरी केली जाते. या नऊ दिवसांत, आदिशक्ती माता दुर्गा आणि दहा महाविद्यांची पूजा केली जाते. याशिवाय, विशेष कार्यात यश आणि सिद्धी मिळविण्यासाठी उपवास केला जातो. गुप्त नवरात्री ही तांत्रिक उपासकांची नवरात्र म्हणूनही परिचित आहे. या काळात आसाम राज्यातील गुवाहाटी मधील माता कामाख्या मंदिरात मोठी गर्दी होते. यावर्षी गुप्तनवरात्र 26 जूनपासून सुरु होणार आहे. (Gupt Navratri)

वास्तविक आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी गुरुवार, 25 जून रोजी दुपारी 4 वाजल्यापासून सुरू होणार आहे. मात्र नवरात्रीचे घट बसवण्यासाठी 26 जून ही तारीख शुभ असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याच दिवशीपासून गुप्त नवरात्रीचा उत्सव सुरु होईल. हिंदू धर्मात एका वर्षात शारदीय आणि चैत्र नवरात्रांव्यतिरिक्त, दोन गुप्त नवरात्र देखील असतात. गुप्त नवरात्रीत, मात दुर्गेच्या नऊ रूपांसह दहा महाविद्यांची गुप्त पूजा केली जाते. आता यातील एक गुप्तनवरात्र 26 जून पासून सुरु होत आहे. वैदिक गणनेनुसार, 26 जून रोजी घटस्थापनेचा मुहूर्त पहाटे 5.25 ते 6.58 पर्यंत आहे. यासोबतच, अभिजित मुहूर्तावर सकाळी 11.56 ते दुपारी 12.52 दरम्यान देखील घटस्थापना करता येणार आहे. (Social News)

यावर्षी गुप्त नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच घटस्थापना तिथीला ध्रुव योग असल्याचीही माहिती आहे. यासोबतच, सर्वार्थ सिद्धी योग देखील घटस्थापनेच्या दिवशी आहे. त्यामुळे या दिवशी देवी दुर्गेच्या पुजेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. 26 जून रोजी सुरु होणा-या गुप्त नवरात्रीची सांगता 4 जुलै रोजी होणार आहे. गुप्त नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माता काली, दुसऱ्या दिवशी माता तारा, तिसऱ्या दिवशी माता त्रिपुरा सुंदरी, चौथ्या दिवशी माता भुवनेश्वरी, पाचव्या दिवशी माता चिन्नमस्तिका, सहाव्या दिवशी माता त्रिपुरी भैरवी, सातव्या दिवशी माता धुमावती, आठव्या दिवशी माता त्रिपुरा सुंदरीची पूजा केली जाणार आहे. याशिवाय नवव्या दिवशी कमला माँची पूजा करुन गुप्त नवरात्रीच्या उत्सवाचा समारोप होईल. गुप्त नवरात्रीमध्ये विशेषतः तंत्र कार्याची संबंधित उपासक देवीची विशेष पूजा करतात. गुप्त नवरात्रीत केलेल्या साधनेमुळे मोक्षप्राप्ती मिळते, अशी श्रद्धा आहे. आध्यात्मिक विकास आणि देवीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी गुप्त नवरात्रीमध्ये होणारी देवीची पुजा महत्त्वाची मानली जाते. (Gupt Navratri)

गुप्त नवरात्रीच्या काळात, देवीचे भक्त विशेष मंत्रांचा जप करतात. याशिवाय माता दुर्गा सप्तशतीचे पठणनही या दरम्यान केले जाते. अनेक ठिकाणी गुप्तनवरात्रीमध्ये धार्मिक ग्रंथांचे सामुहीक पठण करण्यात येते. या काळात केलेल्या पुजेमुळे सर्व संकटे दूर होतात, आणि जीवनात आनंद येतो, अशी भाविकांची भावना आहे. भारतातील काही मंदिरात गुप्त नवरात्रीचा उत्सव हा मोठ्या स्वरुपात साजरा केला जातो. त्यात आसाममधील कामाख्या मंदिराचा समावेश आहे. कामाख्या मंदिरात देवीच्या पुजेसाठी या काळात देशभरातून भाविक मोठ्या संख्येनं येतात. कामाख्या मंदिरात गुप्त नवरात्रीच्या काळा देवीची 10 महाविद्यांच्या रूपात पूजा केली जाते. या गुप्तनवरात्रीसाठी मंदिरात मोठी सजावट केली जाते. कामाख्या मंदिरात, गुप्त नवरात्रीच्या वेळी, देवीचा मासिक पाळीचा काळ साजरा केला जातो आणि यावेळी ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी तीन दिवस लाल रंगाचे होते. (Social News)

===========

हे देखील वाचा : Odisha : भगवान जगन्नाथाचे रहस्यमयी स्वयंपाकघर !

Jagannath Rathyatra : कधी आहे जग्गनाथ रथयात्रा? जाणून घ्या यात्रेची संपूर्ण माहिती

===========

देवीचा हा साक्षात्कार पहाण्यासाठी या भागात भाविकांची मोठी गर्दी होते. या काळात मंदिरात साधक तांत्रिक आणि शैव साधना करतात. यासाठी देशभरातून आलेल्या साधकांनी हे कामाख्या मंदिर गजबजून जाते. मुख्य म्हणजे, गुप्त नवरात्रीमध्ये, कामाख्या देवीची रात्रीही पूजा केली जाते. त्यामुळेच अन्य नवरात्रीपेक्षा या गुप्तनवरात्रीला कामाख्या मंदिरात मोठी गर्दी असते. आसाममधील कामाख्या देवी मंदिरासारखीच भाविकांची गर्दी उत्तरप्रदेश लखनौमधील माता चंद्रिका देवी मंदिरात यावेळी होते. गुप्तनवरात्रीसाठी या मंदिरातही मोठी सजावट करण्यात येते. येथे या दरम्यान विशेष पूजा आणि यज्ञ केले जातात. यासाठी देशभरातून भाविक या मंदिरात येतात. यासह देवीच्या अन्य प्रमुख मंदिरांमध्येही गुप्त नवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्सहात साजरा होतो. (Gupt Navratri)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.