Home » सिक्रेट सर्व्हिसच्या रंजक कथा !

सिक्रेट सर्व्हिसच्या रंजक कथा !

by Team Gajawaja
0 comment
Secret Service
Share

अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीच्या चार महिने आधी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. यात ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या स्नायपर्सनी २० वर्षीय हल्लेखोराला तत्काळ ठार केले. पण हा हल्लेखोर ट्रम्प यांच्यापासून काही अंतरावर होता. त्याची उपस्थिती रॅलीत आलेल्या नागरिकांना खटकली होती. त्याच्या हातातील पिस्तूलही सर्वांना दिसले होते. अशावेळी राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतलेल्या सिक्रेट सर्व्हिसला मात्र हा हल्लेखोर दिसला नव्हता. ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याला सिक्रेट सर्व्हिसच्या इतिहासातील आणखी एक मोठी चूक मानण्यात येत आहे. याआधीही अमेरिकेची सिक्रेट सर्व्हिस वादात सापडली आहे.

सिक्रेट सर्व्हिसच्या एजंटना दारु पिण्यासाठी फारकाय रुममध्ये कॉलगर्ल आणल्यामुळेही सेवेतून काढून टाकण्यात आले आहे. ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे सिक्रेट सर्व्हिसच्या रंगेल कथा पुन्हा चर्चेत आल्या आहेत. १८६० च्या दशकात अमेरिकेत बनावट नोटा छापण्याचे प्रमाण कमालीचे वाढले होते. जवळपास एक तृतीयांश बनावट नोटो चलनात होत्या. यामुळे अब्राहम लिंकन यांनी एक विशेष एजन्सी स्थापन करण्याचे आदेश दिले. त्यातूनच १८६५ मध्ये सिक्रेट सर्व्हिसची स्थापना झाली. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष मॅककिन्ली यांची हत्या झाली. (Secret Service)

अब्राहम लिंकन आणि जेम्स गारफिल्ड यांच्यानंतर हत्या होणारे मॅककिन्ले हे तिसरे अध्यक्ष होते. यामुळे अमेरिकन सरकारने राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेची जबाबदारी सिक्रेट सर्व्हिसकडे सोपवली. सिक्रेट सर्व्हिसचे एजंट राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि त्यांच्या कुटुंबीयांचे संरक्षण करतात. यासोबतच अमेरिकेत येणारे प्रमुख अध्यक्षपदाचे उमेदवार आणि इतर देशांचे प्रमुख यांच्या सुरक्षेसाठी सिक्रेट सर्व्हिस तैनात असते. जर राष्ट्रपती अन्य देशाला भेट देण्यासाठी गेले तर, हे एजंट किमान 3 महिने आधी त्या देशात पोहोचतात. स्थानिक पोलिसांसह राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेची तयारी ते करतात. राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या काही दिवस आधी स्निफर डॉग आणले जातात. त्यांच्या मदतीने राष्ट्रपतीं जिथून जाणार तो मार्ग तपासला जातो. जिथे जिथे राष्ट्रपती जातील तिथे हे सिक्रेट एजंट जातात. फारकाय पण राष्ट्रपतींच्या बाथरुममध्येही जाण्याची त्यांना परवानगी असते. (Secret Service)

अशा या सिक्रेट सर्व्हिसचे वार्षिक बजेट सुमारे २७ हजार कोटी रुपये आहे. भारतात, पंतप्रधान आणि राष्ट्रपतींव्यतिरिक्त, व्हीव्हीआयपींच्या सुरक्षेत गुंतलेल्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे वार्षिक बजेट ५०६ कोटी आहे. म्हणजेच एसपीजीच्या ५० पट जास्त बजेट अमेरिकन सिक्रेट सर्व्हिसचे आहे. सुमारे ४५०० सिक्रेट सर्व्हिस एजंटना ३५ आठवडे कठोर प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर त्यांना सुरक्षेत तैनात केले जाते. व्हाईट हाऊसमध्ये १३०० गणवेशधारी अधिकारी २४ तास राष्ट्रपतींच्या सुरक्षिततेसाठी तैनात असतात.

असे असले तरी या सिक्रेट सर्व्हिसेसच्या एजंटच्या अनेक सुरस कथा अमेरिकेत चर्चिल्या जातात. त्यावर अनेक पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असतांना ११ सिक्रेट सर्व्हिसच्या एजंटना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. हे एजंट राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्या कोलंबिया दौ-यासाठी सुरक्षेची जबाबदारी सांभाळत होते. ओबामांच्या दौऱ्यापूर्वी कोलंबियात पोहोचलेल्या सिक्रेट सर्व्हिसच्या एजंटांनी सुरक्षेकडे दुर्लक्ष करून कोलंबियातील कार्टाजेना येथील एका हॉटेलच्या खोलीत वेश्या आणल्या होत्या. यातील एका वेश्यासोबत पैसे देण्यावरून वाद झाला आणि ही घटना उघडकीस आली. या बातमीने अमेरिकेत खळबळ उडाली. या घटनेनंतर सिक्रेट सर्व्हिसने आपल्या एजंटांसाठी अधिक कडक नियम लागू केले. (Secret Service)

====================

हे देखील वाचा :  ट्रम्प यांच्या हल्यामागच्या चर्चा

====================

यामध्ये एखादा एजंट सुरक्षेमध्ये गुंतला असेल तर त्याला अशा हॉटेल्स किंवा इमारतींमध्ये १० तासांपूर्वी प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली. याशिवाय सुरक्षा एजंट १० तास आधी मद्यपान करणार नाहीत असाही नियम घालण्यात आला. मात्र त्यानंतरही दारुच्या नशेत हल्ला करणा-या एजटंची चर्चा झालीच. अमेरिकेचे उपाध्यक्ष माईक पेन्स यांच्या सुरक्षेत गुंतलेल्या एका एजंटला निलंबित करण्यात आले. त्या एजंटने मेरीलँडमधील एका हॉटेलमध्ये एका कॉल गर्लला बोलावले होते. त्याचे फोटो जाहीर झाले आणि या एजंटला सेवेतून काढून टाकण्यात आले. जुलै २०२२ मध्ये राष्ट्राध्यक्ष जो बिडेन मध्य पूर्व दौऱ्यावर असतांना त्याच्या सुरक्षेसाठी असलेल्या एका एजंटने एका महिलेवर हल्ला केला.

अमेरिकन सरकारने ताबडतोब त्या एजंटला इस्रायलमधून अमेरिकेत पाठवले.युनायटेड स्टेट्स सिक्रेट सर्व्हिसचे ब्रीदवाक्य विश्वास आणि आत्मविश्वासास पात्र आहे. पण याच सिक्रेट सर्व्हिसभोवती संशयाचे जाळे आहे. अमेरिकेत राष्ट्रपती म्हणून कार्यरत असलेल्या ४५ व्यक्तींपैकी १३जणांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला आहे. ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याचा उल्लेख केला तर अशा १४ घटना घडल्या आहेत. या सर्वांसाठी सिक्रेट सर्व्हिसची सुरक्षा होती. त्यामुळेच करोडोचे बजेट असलेली ही संघटना नेमकी कशी अपयशी होत आहे, याची चर्चा रंगली आहे. (Secret Service)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.