देशात अनेक प्राचीन आणि विविध रहस्यमयी मंदिर आहेत. अनेक मंदिरांची आपली एक वेगळीच परंपरा आहे. सध्या मुंबई, नवी- मुंबईसह उनगरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. तुम्हाला माहीत आहे का भारतात असलेल्या अनेक मंदिरांपैकी एक मंदिर असे पण आहे जिथे पाऊस यायच्या अगोदरच पाऊसाचे संकेत मिळतात. उत्तर प्रदेश येथील कानपुर मध्ये असेच एक मंदिर आहे जिथे पाऊसा संबंधित अचूक माहिती सांगण्यात येते. कानपुर येथील मंदिरात पाऊसाची माहिती अगोदरच मिळते. अशी मान्यता आहे कि जर का पाऊस येणार असेल तर भर उन्हातच या मंदिराच्या छतावरून भरपूर पाणी पडायला लागतं. ज्याने स्थानिक लोकांना कळतं कि आता पाऊस येणार आहे. मात्र जसा पाऊस सुरु झाला कि ते पाणी येणं बंद.
नेमका काय आहे हा प्रकार?
या मंदिराची विशेष गोष्ट म्हणजे पाऊस यायच्या ६-७ दिवस अगोदरच या मंदिराच्या छतावरून हळूहळू पाण्याचे थेंब पडू लागतात. यामुळे गावातल्या लोकांना कळून चुकतं कि पावसाळा जवळ आलेला आहे. स्थानिकांच्या सांगण्यानुसार या संकेतद्वारे शेतकरी आपल्या शेताच्या कामाला सुरुवात करतो. मंदिराच्या छतावरून पाणी यायचं काही विशेष कारण तर नाही आहे. मात्र या प्राचीन मंदिरात ही घटना गेले कित्येक वर्षांपासून सुरु आहे. स्थानिक लोक आणि शास्त्रज्ञांसाठी ही एक अत्यंत मनोरंजक बाब आहे कि नेमका हा प्रकार घडतो कसा? हवामान विभाग आणि पुरातन विभागाला अजून ही हे स्पष्ट करता आले नाही कि हा प्रकार नेमका घडतो कसा? हा चमत्कार आहे कि वातावरणातील बदलमुळे हे होत आहे या वर अजून हि प्रश्न चिन्ह आहे?जर मंदिराची गोष्ट केली तर या मंदिराला पाण्याचा कोणताही स्रोत नाही आहे. दरवर्षी येथे भगवान जगनाथ यांचा रथोत्सव मोठ्या उत्साहात पार पडतो जिथे संपूर्ण गाव सहभाग घेतो.
नक्की कोणाचं आहे ते मंदिर?
कानपुर येथील विक्षखंड गावापासून ३ किलोमीटर लांब बेळहाता गावात हे मंदिर आहे. या मंदिरात भगवान जगन्नाथ यांची प्रतिमा आहे, स्थानिक लोक त्यांना ठाकूर बाबाजी म्हणून संबोधतात. या मंदिरात भगवाण जगन्नाथ सोबत बलराम आणि सुभद्रा यांच्या देखील प्रतिमा आहेत. या सर्व मूर्ती काळ्या दगडाच्या बनवलेल्या आहेत. मंदिराच्या परिसरात भगवान सूर्य आणि आणि पद्मनाभ स्वामींची देखील मूर्ती आहेत.
असे तर हे मंदिर खूपच प्राचीन आहे म्हणून लोकांना माहित नाही कि हे दगड कुठून आणण्यात आले. स्थानिकांच्यानुसार हे मंदिर महाभारत पासून बनविण्यात आले आहे आणि या मंदिराचे निर्माण कार्य कुरुक्षेत्रच्या युद्धाच्या नंतर करण्यात आले आहे. मात्र पुरातन विभागायच्या अनेक शास्त्रज्ञांच्यानुसार हे मंदिर बौद्ध धर्मच्या वेळी बनवलेल्या मंदिरांसारखं दिसत असून हे मंदिर अशोक काळ मध्ये बनवण्यात आले असू शकतं. मात्र आज पर्यंत या मंदिराविषयी कोणाकडे हि ठोस माहिती नाही.