Home » Second Hand आयफोन खरेदी करताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

Second Hand आयफोन खरेदी करताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

by Team Gajawaja
0 comment
Second Hand iPhone
Share

तरुणांमध्ये आयफोन खरेदी करण्याचे प्रमाण आणि क्रेज अधिक वाढली आहे. याच कारणास्तव लोक तो खरेदी करणे अधिक पसंद करतात. मात्र काहीजणांना त्याची किंमत अधिक असल्याने घेणे परवडत नाहीत. अशातच ती लोक अधिक पैसे आयफोनवर खर्च करण्याऐवजी सेकेंड हँन्ड आयफोनचा ऑप्शन पाहत असतात. मात्र फार कमी जणांना माहिती आहे की, आयफोन खरेदी करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. सेकेंड हँन्ड आयफोन (Second Hand iPhone) खरेदी करताना सर्वात महत्वाचे म्हणजे तीन गोष्टी जरुर लक्षात ठेवाव्यात. याशिवाय कोणताही आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमचेच नुकसान होऊ शकते.

आयफोन ओरिजनल आहे की नाही कसे ओळखाल?
-सेकेंड हँन्ड आयफोन खरेदी करण्यापूर्वी ही गोष्ट तपासून पहा की, तो ओरिजन आहे की डुप्लीकेट.
-याचा तपास करण्यासाठी सर्वात प्रथम सेटिंग्स मध्ये जाऊन General वर क्लिक करा
-About वर क्लिक करुन सीरियल क्रमांक कॉपी करा
-आता गुगलवर checkcoverage.apple.com असे सर्च करा
-येथे तुम्ही कॉपी केलेला सीरियल क्रमांक टाका
-आता आयफोन बद्दलची सर्व माहिती तुम्ही तपासून पाहू शकता
-येथे तुम्हाला आयफोन खरेदी केल्याची तारीख आणि आयफोनची वॉरंटी किंवा अन्य काही गोष्टी सुद्धा तपासून पाहता येतील

Second Hand iPhone
Second Hand iPhone

आयफोनची बॅटरी किंवा स्क्रिन रिप्लेस झाली आहे की नाही
-आयफोनची बॅटरी किंवा स्क्रिन रिप्लेसमेंट झाली आहे की ओरिजल आहे ते सुद्धा तपासून पाहता येते
-यासाठी प्रथम सेटिंग्समध्ये जाऊन जनरलवर क्लिक करा
-आता About वर क्लिक करा
-येथे पार्ट्स अॅन्ड सर्विस स्टोरीत बॅटरी आणि स्क्रिन नाही आहे किंवा रिप्लेसमेंट केली आहे हे तपासून पहा
-डिस्प्ले आणि बॅटरी ड्युप्लिकेट किंवा जुनी झाल्यास येथे तुम्ही स्पष्टपणे Unknown Parts असे लिहिलेले पाहू शकता

हे देखील वाचा- Google Photos च स्टोरेज फुल्ल झाल्यास ‘या’ टिप्स वापरुन घ्या बॅकअप

बॅटरी हेल्थ तपासून पहा
-कधी कधी सेकेंड हँन्ड स्मार्टफोन (Second Hand iPhone) खरेदी करण्यापू्र्वी बॅटरी हेल्थ तपासून पहा
-बॅटरी हेल्थ तपासून पाहण्यासाठी सर्वात प्रथम सेटिंग्समध्ये जा
-सेटिंग्समध्ये गेल्यानंतर बॅटरीवर क्लिक करा
-आता बॅटरी हेल्थवर क्लिक करा आमि परसेंटेज तपासून पहा
-८० टक्क्यांहून कमी बॅटरी असेल तर आयफोन खरेदी करु नका
-असे असेल तर बॅटरी रिप्लेसमेंट जरुर करुन घ्या


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.