चीन मध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे आणि त्याच्या नव्या वेरियंटमुळे सरकार आता अलर्ट झाले आहे. त्यामुळे विमानतळावर ही आरटीपीसीआर चाचणी प्रवाशांना करावी लागत आहे. अशातच आता लसीकरणासंदर्भात भारताच्या तज्ञांच्या पॅनलने वाढत्या कोरोनाच्या लाटेमुळे कोविड१९ च्या विरोधातील दुसरा बुस्टर डोस नागरिकांना देण्यावर विचार करत आहेत. तर देशात आतापर्यंत केवळ २८ टक्के लोकांनीच बुस्टरचा डोस घेतला आहे. (Second Booster Dose)
भारताने जानेवाी २०२२ पासून बुस्टर डोस देण्यास सुरुवात केली होती. राष्ट्रीय तंत्रज्ञान सल्लागार समूह तज्ञांनी असे म्हटले की, असा विचार केला जात आहे की, कोरोनावरील बुस्टरचा दुसरा डोस देण्यास सुरुवात केली पाहिजे. त्यांच्या मते, कोणतीही सिफारीश करण्यापूर्वी सर्व वैज्ञानिक डेटावर बारकाईने अभ्यास करतील.
रोगप्रतिकारक शक्ती ४-६ महिन्यात कमी होते
अभ्यासानुसार असे कळते की, लसीचा डोस दिल्यानंतर रोगप्रतिकारक शक्ती सर्वसामान्यपणे सहा महिन्यात कमी होते. त्यात असे ही दिसून आले की, एक चौथा डोस हा आजाराला दूर करण्यास मदत करतो. दरम्यान, तज्ञांनी आता चौथ्या बूस्टरच्या रुपात द्विसंयोजक डोसची सिफारिश केली आहे.
डॉक्टरांनी चौथा डोस सुरु करण्याची केली मागणी
काही डॉक्टरांच्या चौथा डोस देण्याची मागणी केली आहे. कमी कमी उच्च जोखिम असलेल्या लोक जसे वृद्ध लोक. इंडिन मेडिकल असोसिएशनच्या प्रतिनिधींनी २६ डिसेंबरला एका बैठकीत केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडविया यांनी अतिरिक्त डोस देण्याची परवानगी देण्यास सांगितले आहे. आरोग्य आणि फ्रंटलाइन वर्कर्सने याचा तिसरा डोस एका वर्षापूर्वी घेतला होता. (Second Booster Dose)
सरकारचा बूस्टर डोस देण्यावर जोर
आता पर्यंत सध्याच्या आकडेवारीनुसार असे कळते की, केंद्र सरकारचे लक्ष तिसरा डोस वाढवण्यावर आहे. केंद्र सरकारच्या एका अधिकाऱ्यांनी नाव छापण्याच्या अटीवर असे म्हटले की, दरम्यान, तांत्रिक चर्चा सुरु आहे. केंद्र सरकार सध्या अतिरिक्त बुस्टर डोस देण्यावर विचार करत नाही. मात्र अद्याप ज्यांनी तिसरा डोस घेतलेला नाही त्यांच्यावर ते अधिक लक्ष देत आहेत.
हे देखील वाचा- कोरोनानंतर आता पुन्हा नवीन जीवघेणा विषाणू ; तुम्हाला माहिती आहे का?
बूस्टर डोस घेण्यासाठी लोकांना प्रोत्साहन करतेय सरकार
केंद्र सरकारने गेल्या वर्षात १० जानेवारी पासून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आरोग्याची काळजी आणि फ्रंटलाइन वर्कर्सच्या कार्यकर्ते किंवा ६० वर्षांपेक्षा अधिर लोकांना कोरोनावरील लसीचा तिसरा डोस किंवा बूस्टर डोस सुरु केला होता. तर जुलै महिन्यात आरोग्य मंत्रालयाने एक अभियान सुरु केले होते, त्या अंतर्गत भारताला ७५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिसरा बूस्टर डोस ७५ दिवस मोफत देण्याची सुविधा सुरु केली होती. त्याचसोबत अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, केंद्र सरकारने राज्यातील बूस्टर डोसचे प्रमाम वाढवण्याचा आग्रह केला आहे. तर केंद्र सरकारकडून राज्यांना कोविशील्डचे ८१ लाख डोस पुरवले जाणार आहेत.