Home » गरोदरपणात महिलांनी गाडीने प्रवास करताना सीट बेल्ट लावावा की नाही?

गरोदरपणात महिलांनी गाडीने प्रवास करताना सीट बेल्ट लावावा की नाही?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Seat Belt Precautions during pregnancy
Share

आपल्या देशात चारचाकी गाडी चालवताना अनेक महत्वाचे आणि बंधनकारक नियम तयार करण्यात आले आहेत. चालकाच्या, प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हे नियम बनवले गेले आहेत. यातलाच एक महत्वाचा आणि मोठा नियम म्हणजे, सीटबेल्ट लावणे. गाडी चालवताना चालकाने सीटबेल्ट लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. असे केले नाही तर दंड देखील होऊ शकतो. (Seat Belt Precautions during pregnancy)

मात्र हा नियम सगळ्यांसाठीच आहे का? या नियमाला काही अपवाद आहेत का? कारण गर्भवती महिलांनी सीटबेल्ट लावावा का? कारण त्यांना त्यांच्या या अवस्थेत सीटबेल्ट लावताना त्रास होतो. त्यामुळे अनेकदा याबद्दल विचारणा केली जाते. चला तर मग जाणून घेऊया गर्भावस्थेत सीटबेल्ट लावणे योग्य की अयोग्य?

Seat Belt Precautions during pregnancy

हे देखील वाचा : मुल्तानी मातीत मिक्स करा ही 1 वस्तू, उजळेल त्वचा

आजच्या काळात प्रत्येक स्त्री स्वावलंबी झाली आहे. त्यामुळे गर्भारपणात स्त्रिया अगदी बिनधास्त गाडी चालवताना दिसतात. त्यामुळे त्यांना देखील गाडी चालवताना सीटबेल्ट लावावा लागतो. मात्र या अवस्थेत असताना काही स्त्रिया सीटबेल्ट लावणे टाळतात. हे योग्य आहे की, अयोग्य?

सुरक्षित ड्रायविंगसाठी कारने प्रवास करताना प्रत्येक व्यक्तीने सीट बेल्ट लावणे गरजेचे असते. गरोदरपणात सीटबेल्ट लावणे अधिक चांगले आणि फायदेशीर ठरते. कारण गाडी चालवणाऱ्या गरोदर स्त्रीला सीटबेल्ट लावल्यानंतर कोणत्याही प्रकारचा शॉक किंवा वेदना जाणवत नाहीत. त्यामुळे गरोदर महिलांनी प्रकर्षाने हा सीटबेल्ट लावला पाहिजे.

आता गरोदर महिलांनी सीटबेल्ट लावताना कोणती काळजी घेतली पाहिजे? ते देखील जाणून घेऊ.
गर्भवती महिलांनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ती म्हणजे सीट बेल्ट लावताना तो नेहमीच पोटाच्या वर नव्हे तर पोटाच्याखाली लावा. जर तुम्ही सीटबेल्ट नेहमीसारखा वरच लावला तर तुम्हाला किंवा तुमच्या पोटातील बाळाला त्याचा त्रास होऊन अस्वस्थ वाटू शकते.

Seat Belt Precautions during pregnancy

हे देखील वाचा : चेहऱ्यावरील सुरकुत्या होतील कमी, ट्राय करा हे घरगुती उपाय

सीट बेल्ट लावताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे पाहूया.

गरोदर महिलांनी अतिशय घट्ट सीट बेल्ट कधीच बंधू नये. त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. शिवाय घट्ट सीट बेल्ट लावल्याने पेल्विक क्षेत्र आणि खालच्या ओटीपोटावर ताण येऊ शकतो. ज्यामुळे महिलेला पोटात वेदना जाणवू शकतात.

सीट बेल्ट थोडा सैल ठेवा जेणेकरून पोटावर जास्त घट्ट पणा जाणवणार नाही.

-सीट बेल्ट लावल्यानंतर अनेक महिलांना पाठ दुखी होऊ शकते. त्यामुळे अशी पाठदुखी टाळण्यासाठी गर्भवती स्त्रियांनी पाठीच्या आधारासाठी उशीचा वापर करा. यामुळे तुमच्या पाठीला अधिक चांगला आधार मिळेल.

-शक्यतो गरोदरपणात लांबचा प्रवास टाळा. प्रवास करणे अत्यावश्यक असेल तर मध्ये मध्ये थांबत तुमचा प्रवास पूर्ण करा.

-गरोदरपणात सुरक्षिततेसाठी सीट बेल्ट हीप्सच्यावर बांधावा.

हे देखील वाचा : पावसाळ्यातही दिसायचे फॅशनेबल तर करा ‘या’ टिप्स फॉलो


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.