Home » Seasonal Affective Disorder नक्की काय आहे?

Seasonal Affective Disorder नक्की काय आहे?

by Team Gajawaja
0 comment
seasonal affective disorder
Share

थंडीच्या दिवस सुरु झाले आहेत. थंडीमुळे बहुतांश ठिकाणी गारवा पसरलेला असतो. त्यामुळे जरी सकाळी लवकर उठायचे म्हटले तरीही आणखी काही वेळ झोपून रहावे असे वाटते. त्याचसोबत आपल्याला या काळात सुस्ती ही अधिक येते आणि वारंवार भुक ही लागते. प्रत्येक ठिकाणी थंडीतील वातावरण वेगवेगळे असते. तर परदेशात गारांचा पाऊस पडत असल्याने त्यांच्या आरोग्यावर ही त्याचा काही ना काही परिणाम होतोच. त्याचसोबत या ऋतूत सूर्याची किरणं कमी येतात आणि धुकं अधिक दिसून येते. मात्र तुम्हाला माहिती आहे का, या धुक्यांमुळे काही लोकांना फ्रेश वाटत नाही. अशातच काहीवेळेस डिप्रेशनची समस्या येते. खासकरुन युरोपातील लोकांना या समस्येचा सामना करावा लागतो. खरंतर ऋतूच्या बदलावाच्या कारणास्तव होणाऱ्या समस्येला सीजनल अफेक्टिव्ह डिसऑर्डर (Seasonal Affective Disorder) असे म्हटले जाते. तर जाणून घ्या यामागील लक्षणं आणि कारण काय आहेत त्याबद्दल अधिक.

सीजनल अफेटिव्ह डिसऑर्डर म्हणजे काय?
हा ऋतूनुसार होणारा विकार आहे. हे एक प्रकारचे डिप्रेशन असून जे ऋतूनुसार येते आणि निघून जाते. खासकरुन थंडीच्या वेळी अधिक दिसते. सूर्याचा प्रकाशाच्या आपल्या भावनांवर प्रभाव पडत असतो. मात्र युरोपातील थंडीच्या दिवसात, सुर्यप्रकाश पुरेसा न मिळाल्याने तेथील लोकांमध्ये तणावाची स्थिती निर्माण होते.

मात्र या समस्येची ठोस कारणे अद्याप समोर आलेली नाहीत. असे मानले जात आहे की, प्रकाश हा सीजनल अफेक्टिव्ह डिसऑर्डला प्रभावित करतो. काही रिसर्चमध्ये असे म्हटले गेले आहे की, थंडीच्या दिवसात सूर्य किरणाच्या संपर्कात कमी आणि वसंत व उन्हाळ्याच्या दिवासात आपले बायोलॉजिकल वॉच प्रभावित होते. जे हॉर्मोन, झोप आणि मूड स्विंग नियंत्रत करतात.

या डिसऑर्डरची लक्षणं काय आहेत?
-दिवसभर थकवा जाणवणे
-भूक लागणे
-फिजिकल हालचाल कमी होणे
-वजन वाढणे
-उदास वाटणे
-कोणत्याही कामात मन न लागणे (Seasonal Affective Disorder )

हे देखील वाचा- टायटानिक फेम गायिक सेलीन डियोन स्टिफ पर्सन सिंड्रोमने ग्रस्त, नक्की काय आहे हा आजार?

यावर उपचार करणे संभाव्य आहे?
यावर उपचार करणे अगदी संभाव्य आहे. कारण ते वैद्यकीय सल्ला किंवा औषधांनी बरे होऊ शकते. यामध्ये डॉक्टर तुमच्यासोबत कॉग्नेटिव्ह बिहेवियर थेरपीचा वापर करतात. एक सामान्य उपचार, बिहेवियर थेरपी, अशा लोकांना नकारात्मक विचारांऐवजी सकारात्मक विचार आणि हालचालींवर लक्ष केंद्रीत करण्यास मदत करतता. काही लोकांना एंटीडिप्रेसेंट सारख्या औषधांमुळे ही फायदा होतो.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.