Home » लगन’ चित्रपटाचा दिमाखदार ट्रेलर प्रदर्शित

लगन’ चित्रपटाचा दिमाखदार ट्रेलर प्रदर्शित

by Team Gajawaja
0 comment
लगन
Share

प्रेम हा प्रत्येकाच्या मनाचा हळवा कोपरा असतो. कुणी त्यात आकंठ बुडालेला असतो, तर कुणी त्याच्या चाहुलीने मोहरलेला असतो. कुणाला त्याचे चटकेही बसलेले असतात, पण प्रेमात पडण्यापेक्षा प्रेमभावना जपण्यात जास्त सुख असतं हा मध्यवर्ती विचार देणारा ‘लगन’ हा मराठी चित्रपट रुपेरी पडद्यावर ६ मे ला झळकणार असून तत्पूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा नुकताच दिमाखात संपन्न झाला.

जी. बी एंटरटेंन्मेंटने या चित्रपटाची निर्मीती केली असून दिग्दर्शन अर्जुन यशवंतराव गुजर यांचे आहे. ‘लगन’ चित्रपट प्रत्येकाला प्रेमाचा खरा अर्थ दाखवून देईलच सोबत प्रेक्षकांची मने जिंकण्यात नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वास सर्व कलाकारांनी याप्रसंगी व्यक्त केला.

====

हे देखील वाचा: ‘चंद्रमुखी’मध्ये रंगणार अमृता- प्राजक्ताची जुगलबंदी

====

‘तुमचं ना..रडू लय जवळ असतं.. अन् तेच आमचा जीव घेतं’..! अशी हळूवार टॅगलाईन असलेल्या या चित्रपटात संघर्षावर मात करत प्रेम निभावणाऱ्या प्रेमवीरांची कथा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. सुजित चैारे आणि श्वेता काळे ही नवी युवा जोडी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे.

प्रेम आणि नात्यातील भावभावनांचा प्रवास दाखवताना ‘प्रेम निभावता आलं तर ते जिंकतं’ हे सांगण्याचा प्रयत्न ‘लगन.. तुमाला वाटतंय पण सोपं नायी’ ’ या चित्रपटातून करण्यात आला आहे. या नव्या जोडीसोबत या चित्रपटात स्मिता तांबे, प्रशांत तपस्वी, शुभम शिंदे,अपेक्षा चलवादे, अनिल नगरकर, रामचंद्र धुमाळ आदि कलाकारांच्या भूमिका आहेत.

====

हे देखील वाचा: ‘गुल्हर’ चित्रपटाचा जबदस्त ट्रेलर रिलीज

====

‘लगन’ चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अर्जुन यशवंतराव गुजर यांनी केलं आहे. चित्रपटाचे छायांकन सोपान पुरंदरे आणि रणजीत माने यांचे आहे. संगीत पी.शंकरम, विजय गवंडे, रोहित नागभिडे यांचे असून अजय गोगावले, आदर्श शिंदे, चिन्मयी श्रीपाद, ओमकारस्वरूप बागडे, पी.शंकरम यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. पार्श्वसंगीत पी.शंकरम तर साऊंड डिझायन विकास खंदारे यांचे आहे.
प्रेमाची वेगळी परिभाषा मांडणारा ‘लगन’ ६ मे ला प्रदर्शित होणार आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.