जगात अशी अनेक माणसे आहेत, ज्यांना निसर्गाचे वरदान लाभले आहे. ते नैसर्गिक प्रतिभेने परिपूर्ण आहेत. याचा वापर करून ते भरपूर पैसे कमावतात. जगात असे अनेक प्रोफेशन्स आहेत, ज्याबद्दल ऐकून तुम्हाला धक्का बसेल. तुम्ही अशा अनेक बातम्या वाचल्या असतील, जिथे लोकांना जेवणाची चाचणी करण्यासाठी पैसे मिळतात, तर कुठे लोकांना झोपण्यासाठी पगार दिला जातो. पण आज आपण ज्या स्त्रीबद्दल बोलणार आहोत, ती तिच्या नैसर्गिक प्रतिभेच्या जोरावर खूप कमावते. (Scream artist)
आम्ही ज्या प्रोफेशनबद्दल बोलत आहोत, ते आहे मोठ्याने ओरडणे. होय, ऍशले पेल्डन नावाची ही महिला या कलेमध्ये पारंगत आहे आणि तिचा व्यवसाय आहे ओरडणे. आता तुम्ही विचार करत असाल की, ओरडण्याचे पैसे कोण देईल? ऍशले एक प्रोफेशनल स्क्रीम आर्टिस्ट (Scream Artist) आहे, म्हणजेच एक अशी कलाकार जी ओरडण्यात माहिर आहे. स्क्रीम आर्टिस्टचे काम माइकसमोर तासनतास वेगवेगळ्या आवाजात ओरडणे आहे. जे रेकॉर्ड केले जाते आणि चित्रपटात वापरले जाते. (Scream artist)
हे काम अगदी तसे आहे, जसे व्हॉइस डबिंग आर्टिस्ट करतात. स्क्रीम आर्टिस्ट ओरडून वेगवेगळ्या प्रकारच्या किंकाळ्या काढतात आणि त्याद्वारे पैसे कमवतात. ऍशले पेल्डन देखील चित्रपटांसाठी भुतांच्या किंकाळ्या, मोठ्याने ओरडत रडणारे आवाज काढते. चित्रपटांमध्ये भुतांचे बॅकग्राऊंड आवाज आणि रडण्याचे आवाज, हे केवळ ऍशलेसारख्या आर्टिस्टचीच कमाल असते. (Scream artist)
हे देखील वाचा: जगातील रहस्यमय खडक, जे दर ३० वर्षांनी देतं अंडी; शास्त्रज्ञही आश्चर्यचकित!
आता तुम्हाला समजले असेल की भूत पाहिल्यानंतर किंचाळणारी अभिनेत्री किंवा जोरजोरात रडणारे आवाज इतके परफेक्ट कसे काय असतात. ऍशले चित्रपट आणि टीव्ही मालिकांमधील किंचाळणाऱ्या सीन्सला तिचा आवाज देते. हे एखाद्या स्टंट मॅन सारखं काम असल्याचं ऍशलेचं म्हणणं आहे. या कामात तुम्हाला वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या प्रकारे ओरडावे लागते. यात तुम्हाला माहीत असायला हवं की, केव्हा आणि कसे थांबायचे आहे. (Scream artist)
ऍशलेच्या मते, ती या कलेत पारंगत आहे आणि तिला ओरडण्याचा सराव करण्याची गरज लागत नाही. ती नैसर्गिकरित्या ओरडू शकते. तिच्या मते, तिचे काम प्री-प्रॉडक्शनच्या वेळेपासूनच सुरू होते. केव्हा आणि कसे ओरडायचे, हे तिला चांगले माहित आहे. किडा पाहण्याची ओरड वेगळी, भीतीची किंकाळी वेगळी आणि आनंदाची ओरड वेगळी. ऍशलेच्या म्हणण्यानुसार, ८ तास अशा प्रकारे ओरडल्यानंतर तिला कधीकधी खूप थकवा जाणवतो. पण तिला तिचं काम आवडतं आणि ती तिच्या कामात खूश आहे. (Scream artist)
जेव्हा ऍशले ७ वर्षांची होती, तेव्हाच तिला तिच्या या टॅलेंटची ओळख झाली. त्यावेळी ती ‘चाइल्ड ऑफ अँगर’ नावाच्या चित्रपटात काम करत होती, ज्यामध्ये अनेक किंचाळणारे सीन्स होते. त्याचवेळी ती या व्यवसायाशी जोडली गेली. वयाच्या २०-२५ पर्यंत तिने ४० चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये आपला आवाज दिला आहे. (Scream artist)