जेव्हा एखादा नोकरीच्या शोधात असतो तेव्हा त्याच्या मनात विविध प्रश्न उभे राहतात की, आपल्याला पगार किती दिला जाईल, कामाची स्थिती कशी? केवळ पगारच नव्हे तर येथे हॉलिडे ट्रॅवल आणि वर्क फ्रॉम होमची सुद्धा सुविधा मिळेल ना? पण सध्याच्या काळात नोकरीसाठी लोक कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी तयार आहेत. यासाठी दुसरे शहर का असो किंवा परदेश. अशी एक नोकरी आहे जेथे प्रत्येक दिवसासाठी ३६ हजार रुपये म्हणजेच प्रति महिन्याला जवळजवळ ४ लाख रुपये मिळणार आहेत. तरीही कोणीही नोकरी करण्यास तयार नाही. मात्र स्कॉटलंडमध्ये अशा सर्व गोष्टींची सुविधा दिली जात असली तरीही लोक नोकरी करण्यास तयार होत नाही आहेत.(Scotland)
मनीकंट्रोल यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्कॉटलंन्ड मध्ये एका समुद्र किनाऱ्यावर रीगरच्या पदावर नोकर भरती केली जाणार आहे. जी एबरडीनच्या किनाऱ्यापासून दूर उत्तर समुद्राच्या येथे आहे. समुद्र किनारा रिग मूळ रुपात सुद्रावर किंवा समुद्रात एक मोठी संरचना आहे ज्याचा वापर विहिर खोदणे, तेल आणि गॅस काढण्यासाठी केला जातो. ते तो पर्यंत स्टोर केले जाते जो पर्यंत तेथे पृष्ठतलावर आणले जात नाही.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार, कंपनी अशा लोकांना नोकरीवर ठेवतात जे एका वेळेस ६ महिन्याच्या पोस्टिंगसाठी तयार आहेत. व्यक्तीला १२ तासांची शिफ्ट करावी लागते. यासाठी त्याला दिवसभराचा पगार ३६ हजार रुपये दिला जातो. जर व्यक्तीने येथे २ वर्षापर्यंत राहण्याचा विचार केल्यास तर तयार केल्यास किंवा सहा-सहा महिने असे काम केल्यास त्याला १ कोटी रुपये पगार मिळतो.
कोण करु शकतो ही नोकरी?
ही नोकरी करण्यासाठी तुम्हाला तंत्रज्ञान आणि संरक्षित प्रशिक्षणात BOSIET, FOET, CA-EBS आणि OGUK सारख्या कठीण टेक्निकल ट्रेनिंगच्या सर्टिफिकेटची गरज आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला ऑफशोर नोकरीसाठी कठीण स्थितीत राहण्यासाठी आरोग्यासंबंधित मेडिकल ट्रेनिंग प्रोग्राममध्ये ही यश मिळवावे लागणार आहे.(Scotland)
हे देखील वाचा- दहशतवादी हल्ल्यानंतर एखादी अतिरेकी संघटना जबाबदारी का घेते? काय होतो फायदा?
हेच कारण आहे की, या नोकरीसाठी जाहीरात दिल्यानंतर ही त्यासाठी पुरेशा प्रमाणात कोणीही अर्ज केलेला नाही. जाहीरातीनुसार केवळ ५ पदासाठी नोकरीचा अर्ज स्विकारला जाणार आहे. याचा अर्थ असा होतो की, अशा कठीण परिक्षा आणि रिक्त जागांची संख्या कमी असल्याने यासाठी कोणीही अर्ज करत नसेल.