शेती हा शब्द समोर आला की आपल्या समोर गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी अशी शेती उत्पादनं उभी राहतात. पण आपल्या शेजारी असलेल्या चीनने या शेतीपिकांच्या बाबतीत अभूतपूर्व असे बदल केले आहेत. चीनमधील काही भागात अत्यंत विषारी अशा सापांची शेती केली जाते. मात्र यासोबतच चीनचे शेतकरी विंचवाची शेती करत आहेत, हे सांगितलं तर आश्चर्य वाटेल. पण याही पुढे म्हणजे, हे विंचवाची शेती करणारे शेतकरी विंचवाच्या विषामुळे अब्जाधीश झाले आहेत. चीनमधील शेडोंग आणि हेनान प्रांतांमध्ये सर्वाधिक प्रमाणात ही विंचवाची शेती केली जाते. येथील विंचवांचे शेत चीनमधील मोठ्या औषधी कंपन्यांकडे पाठवले जाते. तसेच परदेशातही या विषाला मोठी मागणी आहे. विशेषतः पारंपारिक चिनी औषधं आणि सौंदर्यप्रसाधनांमध्ये विंचवाचे विष वापरले जाते. या विंचवाच्या विषाची किंमत ऐकून तर अन्य शेती सोडून याच शेतीकडे वळावे, असे वाटेल. कारण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या विंचवाच्या विषाला तब्बल ८० ते ८५ कोटी रुपये प्रति लिटर किंमत मिळते. शिवाय भविष्यात ही किंमत १०० कोटींचा टप्पा पार करणार, अशी खात्री या क्षेत्रातील तज्ञांना आहे. या विंचवाच्या शेतीच्या जोरावर शेडोंग आणि हेनान भागातील बहुतांश शेतकरी अब्जाधीश झाले आहेत. ( Scorpion Farming )

चीनमध्ये कधी काय होईल, याचा पत्ता लागत नाही. आता चीनच्या शेडोंग आणि हेनान या भागातील बातमी समोर आली आहे. या दोन्ही प्रांतांमध्ये शेती उद्योग केला जात असे. येथील शेतकरी पारंपारिक शेती उत्पादन घेत असत. काही वर्षांपूर्वी या शेतकऱ्यांनी चक्क विंचवाच्या शेतीची सुरुवात केली. अत्यंत धोकादायक असलेली ही विंचवाची शेती व्यवस्थित काळजी घेऊन केली तर त्यातून सोन्याहूनही अधिक फायदा होतो, हे येथील शेतकऱ्यांनी दाखवून दिले. कारण आता शेडोंग भागातील सर्वच शेतकरी अब्जाधीश झाले आहेत. त्यांच्याकडील विंचवाच्या विषाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. प्रति किलो येथील विंचवाचे विष ८५ कोटी रुपयांपर्यंत विकले जात आहे. येथील विंचवाची शेती सुरुवातीला पारंपारिक साधनांचा वापर करून होत असे. मात्र त्याचे स्वरूप मर्यादित होते. त्यामुळे ही शेती परंपरागत पद्धतीने केली जात असे. आता त्यातील फायदा लक्षात आल्यावर शेडोंग भागातील बहुतांश शेतकरी या विंचवाच्या शेतीकडे वळले आहेत. सध्या या भागात पारंपारिक ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विंचवांना पाळले जाते आणि त्यातून विष काढले जाते.
या शेडोंग भागात अनेक नर्सरी उघडल्या आहेत. यातील प्रत्येक रोपवाटिकेत लाखो विंचू पाळले जातात आणि हजारो लिटर विष जमा करण्यात येते. हे सर्व शेतकरी या विंचवाच्या विषाचा उल्लेख “द्रवरूप सोने” असा करतात. अर्थात या शेतीमध्ये सर्वाधिक धोका आहे. कारण येथे ज्या विंचवांची शेती केली जाते, ते सर्वाधिक विषारी प्रजातीचे आहेत. मेसोबुथस मार्टेन्सी किंवा बुथस मार्टेन्सी कार्श या प्रजातीचे विंचू जगातील सर्वाधिक विषारी विंचू म्हणून ओळखले जातात. हे विंचू एका सेकंदात १० वेळा डंख मारू शकतात आणि त्यांच्या डंखामुळे माणसाचा काही सेकंदांत मृत्यू होऊ शकतो. मात्र या वेदनांपेक्षा त्यामागे येणारा पैसा आणि श्रीमंती मोठी आहे. त्यामुळे शेडोंग प्रांतातील अनेक गावांमध्ये विंचवांचे मोठे फार्म उभारण्यात आले आहेत. ( Scorpion Farming )
=======
हे देखील वाचा : Suneung College : दक्षिण कोरियातील शैक्षणिक स्पर्धेचे भयाण वास्तव
=======
या विंचवाच्या शेतीमुळे शेडोंग गावात अब्जावधी रुपयांची संपूर्ण अर्थव्यवस्था निर्माण झाली आहे. या शेडोंग प्रांतातील विंचवाच्या फार्ममध्ये १३,००० लिटर विष तयार करण्यात येते. आंतरराष्ट्रीय बाजारात एका लिटर विषाची किंमत ८० ते ८५ कोटी रुपयांपर्यंत आहे. त्यामुळे या गावात केवळ विषाच्या माध्यमातून किती पैसा येत आहे, याचा विचार करा. अर्थात चीनच्या अन्य भागातील शेतकऱ्यांनाही या शेडोंग भागातील विंचवाच्या शेतीतील आर्थिक सुबत्तेची भुरळ पडली आहे. त्यामुळे चीनच्या इतर भागातही विंचूच्या विषाचा व्यापार भरभराटीला येत आहे. चीनमधील सर्वात विषारी विंचूंना ऑलिव्हेरियस मार्टेन्सी किंवा चिनी विंचू म्हणतात. त्यांची खासियत अशी आहे की ते जगातील इतर कोणत्याही विंचूपेक्षा एकाच डंखात जास्त विष तयार करतात. ऑलिव्हेरियस मार्टेन्सीच्या एका डंखातून २ मिलीलीटर विष बाहेर पडते. एका मिलीलीटर विषाची किंमत अंदाजे ९ लाख रुपये असते. अशाप्रकारे एका डंखातील २ मिलीलीटर विषाची किंमत १.८ लाख रुपये होते. हे लक्षात घेतले पाहिजे की भारतीय लाल विंचू हा चिनी ऑलिव्हेरियस मार्टेन्सी विंचूपेक्षा अधिक विषारी आहे. अलिकडच्या काळात कर्करोगावरील औषधांमध्येही या विंचवाच्या विषाचा वापर केला जात असल्यामुळे या विषाची किंमत आणखी वाढणार असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. ( Scorpion Farming )
सई बने
