Home » डोळे बंद केल्यानंतर विविध रंग का दिसतात? वाचा काय सांगते विज्ञान

डोळे बंद केल्यानंतर विविध रंग का दिसतात? वाचा काय सांगते विज्ञान

by Team Gajawaja
0 comment
Science of closed eyes
Share

व्यक्ती आणि प्राण्यांना सामान्य रुपात कसे दिसते याबद्दल विज्ञानात पूर्णपणे स्पष्ट करण्यात आले आहे. खासकरुन जेव्हा प्रकाशाची किरणे एखाद्या वस्तुच्या संपर्कात येतात तेव्हा विशेष रंगाचे तरंगांना ती वस्तू अवशोषित करते आणि अन्य किरणे प्रतिबिबिंत हतेत. याच दरम्यान, तयार झालेले सर्व तरंग आपल्या डोळ्यांपर्यंत पोहचतात. त्यानंतर आपल्या धमन्या मेंदूला सांगतात की, एखादी वस्तू नक्की कोणत्या रंगाची आहे. परंतु जेव्हा आपण डोळे बंद करतो तेव्हा विविध रंग असलेल्या काही आकृती दिसू लागतात. अखेर या बद्दल काय सांगते विज्ञान हेच जाणून घेऊयात.(Science of closed eyes)

विविध स्थिती, विविध कारणे
वैज्ञानिकांचे असे म्हणणे आहे की, विविध स्थितीत बंद डोळे ठेवल्यास विविध कारणांमुळे रंग दिसतात. जसे की, तु्म्ही पूर्ण दिवस उजेड असलेल्या ठिकाणी डोळे बंद करता तेव्हा डोळ्यांमध्ये किरणांचा प्रकाश जातो. त्यामुळे आपल्याला लाल रंग दिसतो. खरंतर अशा स्थितीत डोळे बंद केल्यानंतर रक्तवाहिन्यांचा रंग हा लाल असल्याने प्रकाश ही त्याच रंगाचा दिसतो.

विविध पॅटर्न
सर्वसामान्यपणे आपण जेव्हा काळोखात आपले डोळे बंद करतो तेव्हा आपल्याला काही रंग एकत्रित दिसतात. त्यामध्ये आपल्याला विचित्र आकृत्या दिसतात. कधी बिंदू तर कधी चमकणारे पॅटर्न्स दिसतात.

Science of closed eyes
Science of closed eyes

एका खास प्रक्रियेमुळे
हैराण करणारी गोष्ट अशी की, काही प्रकारचे रंग अगदी काळोखात उघड्या डोळ्यांना दिसू शकतात. किंवा झोपताना रात्रीच्या वेळी अचानक डोळे उघडले तर सुद्धा काही रंग दिसतात. अशा प्रकारच्या दृश्यांच्या भासाला वैज्ञानिक फॉस्फीन्स असे म्हणतात. जी प्रकाशाची एक संवेदना असते. पण वास्तवात प्रकाशामुळे ते नसते.

रेटीनाची आहे भुमिका
फॉस्फीन एक प्रकारची प्रकाशाची संवेदना आहे. ज्यामध्ये प्रकाशाचे काही घेणेदेणं नाही. ते डोळे आणि डोक्यात सुरुवाती पासून असू शकते. परंतु येथे त्याचा उल्लेख केला जात आहे तो रेटिना म्हणजेच डोळ्यांच्या पडद्यांची सामान्य क्रियांमुळे होते. रेटीनाच डोळ्यांच्या मागील हिस्स्याचा पडदा असतो. जो प्रकाशाची किरणे ओळखण्यास मदत करतो.(Science of closed eyes)

कोशिकांची भुमिका
खरंतर आपले डोळे बंद झाल्यास किंवा अंधारात काम करणे बंद करत नाहीत. तर तेव्हासुद्धा आपल्याला काही रंगांचे तरंग जाणवू लागतात. हे संकेत आपल्याला डोळ्यांच्या कोशिका सांगतात. त्या कोशिकांच्या गतिविधीमुळे हे रंग स्थिर नव्हे तर सक्रिय दिसतात.

हे देखील वाचा- हिवाळ्यात तुमचे पाय अधिक थंड पडतात का? ‘हे’ असू शकते कारण

मेंदूला वाटते की…
हे सर्व संकेत मेंदूपर्यंत पोहचतात तेव्हा आपला मेंदू एका अव्यवस्थित गतिविधीला जाणवतो. आपल्या मेंदूला कळत नाही की, हा प्रभाव वास्तविक प्रकाश आहे की नाही. त्यामुळे आपल्याला असे वाटते की, जेव्हा आपण रंगीत पॅटर्न पाहतो ते खरंतर नसतोच. अशा प्रकारे तो एक दृष्टीभ्रम आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.