Home » तुम्ही बनावट IRCTC चा अॅप तर डाउनलोड केला नाही ना? असे ओळखा

तुम्ही बनावट IRCTC चा अॅप तर डाउनलोड केला नाही ना? असे ओळखा

देशात दररोज १० लाखांपेक्षा अधिक ट्रेनच्या तिकिटांची बुकिंग केली जाते. बहुतांश प्रवासी भारतीय रेल्वेच्या आयआरसीटीसी या अॅपवरुनच तिकिट बुकिंग करतात.

by Team Gajawaja
0 comment
Scam Alert
Share

देशात दररोज १० लाखांपेक्षा अधिक ट्रेनच्या तिकिटांची बुकिंग केली जाते. बहुतांश प्रवासी भारतीय रेल्वेच्या आयआरसीटीसी या अॅपवरुनच तिकिट बुकिंग करतात. मात्र आता सायबर हल्लेखोरांनी याच अॅपच्या नावाखाली लोकांची फसवणूक करण्यास सुरुवात केली आहे. ते ईमेल आणि अन्य मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर आयआरसीटीसीच्या अॅपची एक बनावट लिंक पाठवून डाउनलोड करण्यास सांगतात. अशातच जर तुम्हाला सुद्धा आयआरसीटीसी रेल कनेक्ट अॅप डाउनलोड करण्यासाठी लिंक येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा.(Scam alert)

आयआरसीटीसीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या संबंधित एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, आयआरसीटीसी किंवा बनावट मोबाईल अॅपचे सर्कुलेशन करुन सायबर हल्लेखोर मोठ्या प्रमाणात फिशिंग लिंक पाठवत आहेत. सामान्य नागरिकांची फसवणूक करण्यासाठी युजर्सला बनवट आयआरसीटीसी रेल कनेक्ट मोबाईल अॅप डाउनलोड करण्यासाठी प्रेरित केले जात आहे. अशातच नागरिकांना असा सल्ला दिला जात आहे की, अशा फसवणूकीला बळी पडू नये.

Scam Alert

Scam Alert

आयआरसीटीसीचा बनावट अॅप हा मूळ अॅप सारखाच दिसतो. अशातच युजर्सला बनवाट आणि खरा अॅप कोणता हे कळत नाही. हेच कारण आहे बहुतांश लोक या फसवणूकीला बळी पडून बनावट अॅप डाउनलोड करत आहेत. या व्यतिरिक्त युजर्सला काही ऑफर्स मिळतील असे सुद्धा सांगितले जाते.

खरंतर आयआरसीटीसीने सामान्य लोकांना असा सल्ला दिला आहे की, गुगल प्ले स्टोर किंवा अॅप्पल अॅप स्टोरवरुनच आयआरसीटीसीचा अधिकृत अॅप डाउनलोड करावा. व्हॉट्अॅप किंवा मेसेजच्या माध्यमातून कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करू नये. सर्वसामान्यपणे कोणतीही शासकीय कंपनी अॅप डाउनलोड करण्यासाठी लिंक शेअर करत नाही. ऑफर्स आणि डिस्काउंटच्या मेसेजला बळी पडू नका, अशा प्रकारचे मेसेज बहुतांशकरुन फसवणूकीच्या उद्देशाने केले जातात. (Scam alert)

हेही वाचा- पीएम मोदी यांच्याकडून अमृत भारत स्टेशन योजना लॉन्च

या व्यतिरिक्त नुकत्याच आयआरसीटीसीने तिकिट बुकिंगच्या नियमात बदल केला आहे. नव्या नियमानुसार आयआरसीटीसी अॅप आणि वेबसाइटच्या माध्यमातून युजरला आपले अकाउंट वेरिफाय करावे लागणार आहे. त्यानंतरच तिकिट बुकिंग होणार आहे. त्याचसोबत आता महिन्यातून एका युजर आयडीवर अधिकाधिक तिकिट तिकिट बुकिंग करण्याची मर्यादा १२ वरुन २४ ऐवढी केली आहे. मात्र यासाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड हे लिंक करावे लागले. परंतु ते लिंक नसेल तर ६ ऐवजी १२ तिकिटे तुम्ही काढू शकता.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.