Home » समाजात महिलांच्या अस्तित्वाला हक्क मिळवून देणाऱ्या ‘सावित्री बाई फुले’

समाजात महिलांच्या अस्तित्वाला हक्क मिळवून देणाऱ्या ‘सावित्री बाई फुले’

by Team Gajawaja
0 comment
savitribai phule
Share

शिक्षण हे व्यक्तीचा केवळ व्यक्तीगत विकासच नव्हे तर त्याला पुरातन आणि रुढ मान्यतांमधून बाहेर काढत प्रकाशाकडे नेते. महिलांच्या संदर्भात ही शिक्षणाने हेच कार्य केले, त्यांना केवळ पुरातन रुढींच्या बेड्यांमधूनच मुक्त केले गेले. ज्यामुळे त्यांना आपली स्वप्न पूर्ण करता आली. एकोणीसाव्या शतकामध्ये आपल्या समाजात स्री शिक्षणासाठी पूर्णपणे बंदी होती. महिला फक्त घरातील कामेच करायची आणि ती करण्यामध्ये त्या कुशल होत्याच. पण शिक्षणासंदर्भात त्यांच्या कोणताही संबंध नव्हता. समाजात बालविवाह, विधवा पुर्नविवाहाचा विरोध, अंधविश्वास या चौकटीतच महिला घेरल्या गेल्या होत्या. पण एकोणासाव्या शतकात झालेल्या सुधारणावादी आंदोलनामुळे फार काही बदलले गेले. (Savitribai Phule)

बदलता भारत आणि समाजात होणारे परिवर्तन 
१८५७ मध्ये क्रांतीच्या वेळी एक नवा काळ सुरु झाला होता. त्याला साहित्यात नवजागरण आणि सुधारणावादी काळ असे म्हटले गेले आहे. या काळात सुधारणावादी चळवळी खुप झाल्या. त्यामुळे काही स्रिया आणि पुरुष मंडळी सुद्धा सुधारकांचा उदय होऊ लागला. ज्यांनी विधवा पुर्नविवाह, बहुविवाह, सती प्रथेचा विरोध, स्री शिक्षणाचा संविधानात्मक अधिकार अशा काही मागण्या केल्या. 

या सुधारणावादी चळवळीची सुरुवात पुरुष विचारवंतांनी केली आणि ते पुढे नेण्याचे काम महिला सुधारकांनी केले होते. राजा राममोहन रॉय यांनी बाल विवाह, सती प्रथा, जातिवाद, कर्मकांड अशा प्रथांचा विरोध केला आणि २० ऑगस्ट १८२९ मध्ये ब्रम्ह समाजाची स्थापना केली. यांच्या व्यतिरिक्त स्वामी विवेकानंद, ईश्वरचंद विद्यासागर, गोविंद रानडे यांनी सुद्धा समाजात बदल घडवून आणला.

मुलींना शिक्षण मिळण्यासाठी सावित्री बाईंचे परिश्रम 
त्या काळात अधिक पुरुष विचारवंत होतेच पण सावित्रीबाई फुले या पहिल्या स्री शिक्षिका होत्या ज्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी काम केले होते. त्यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगांव येथे झाला होता. वयाच्या ९ व्या वर्षीच त्यांचा विवाह झाला आणि १८ व्या वर्षात त्यांनी मुलींना शिक्षवण्यास सुरुवात केली होती. तसेच अध्यापिका आणि प्राध्यापिकांच्या रुपात बालिका विद्यालयात त्यांनी आपले काम सुरु ठेवले. 

त्या एक दृढ संकल्पी शिक्षिका असण्यासह समाज सुधारक ही होत्या. व्यक्तिगत स्तरावर त्या कवयित्री होत्या. सावित्रीबाई असे एक व्यक्तीमत्व होते की, ज्यांना समाजात मुलींना शिक्षण देण्यासाठी खुप काही सहन करावे लागले पण त्या थांबल्या नाहीत. अखेर त्यांनी मुलींना शिक्षण दिलेच. त्यांच्या कवितांमध्ये अज्ञान, शिक्षणासाठी जागृत व्हा, श्रेष्ठ धन, अशा काही कवितांमधून त्यांनी स्री शिक्षणाचे महत्व पटवून दिले आहे. महिलांच्या शिक्षणामध्ये त्यांच्या योगदानासाठी फुले दांपत्यांना सन १८५२ मध्ये तत्कालीन ब्रिटिश सरकारने त्यांचा सन्मान ही केला होता. सावित्री बाई यांचया सन्मानार्थ पोस्टाची तिकिटे ही जारी करण्यात आली आहे. (Savitribai Phule)

हे देखील वाचा- ज्योतिबा फुले- शिक्षण क्षेत्रातील क्रांतीकारक

भारताचा सन्मान- सावित्री बाई फुले
सावित्री बाई फुले यांना स्रियांना शिक्षण देण्याऱ्यांच्या विरोधात लढणाऱ्या लढवय्या म्हटले जाते.  त्या भारतातील पहिल्या अशा महिला शिक्षिका होत्या, ज्यांवर दलित मुलींना शिक्षण देतात म्हणून दगडं, शेण फेकले तरीही त्यांनी आपले कर्तव्य पार पाडले. त्यांनी कवयित्री रुपात दोन काव्य पुस्तके ही लिहिली ती म्हणजे काव्य फुले, बावनकशी सुबोधरत्नाकर.

सावित्री बाई फुले यांनी सन १८९७ मध्ये प्लेगची साथ आल्यानंतर आपल्या मुलासह मिळून एक रुग्णालय ही सुरु केले. तेथे त्यांनी समाजात ज्या लोकांना अस्पृश्य मानले जाते त्यांच्यावर उपचार केले. मात्र याच दरम्यान, त्यांन सुद्धा प्लेगचा संसर्ग झाला आणि त्याच वर्षात १० मार्च रोजी त्यांचे निधन झाले. 


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.