बचत खाते कोणत्याही व्यक्तीच्या आर्थिक हालचालींपैकीचे एक पाऊल मानले जाते. यामध्ये तुमचे केवळ पैसेच सुरक्षितच नव्हे तर उत्तम रिर्टन्स ही मिळतात. पण ते अत्यंत कमी दराने मिळतात. बचत खात्याचा सर्वाधिक मोठा फायदा असा होतो की, यामध्ये तुम्ही डिपॉझिट केलेले पैसे सहज काढू शकता. बहुतांश लोक परिवारातील प्रमुखाशिवाय अन्य सदस्य आणि मुलांचे बचत खाते सुरु करतात. असे करणे काही वेळेस कामी येते. मात्र तुम्हाला माहिती आहे का बचत खाते काढण्याचे काय फायदे आहेत? तसेच ते सुरु करण्याची योग्य वेळ काय आहे? (Saving Account of Child)
आर्थिक जगातील पहिले पाऊल म्हणजे बचत खाते
कोणत्याही आर्थिक अॅक्टिव्हिटीसाठी बचत खाते असणे सर्वाधिक महत्वाचे असते. याला आर्थिक जगातील पहिले पाऊल असे म्हटले जाते. तुम्ही कोणत्याही बँकेशी देवाणघेवाण करण्यासाठी बचत खात्याची गरज भासते. लहान वयातच बचत खाते सुरु करुन तुम्हाला त्यांच्याशी संबंधित काय सुविधा आहेत ते कळू शकते. अशातच काही कालांतराने आपले बचत खाते स्वत: वापरण्यासह बँकेची काम कशी होतात हे सुद्धा शिकावे.
मुलांसाठी वेगळी बचत करणे ठरते फायदेशीर
आई-वडिल आपल्या देखरेखीखाली मुलांचे बचत खाते मॅनेजर करु शकतात. तर मुलांसाठी वेगळ्या पद्धतीने बचत करण्याचा त्या संदर्भातील दृष्टीकोन असू शकतो. यासाठी बँकांनी दोन कॅटेगरी तयार केली आहे. त्यामध्ये पहिली अशी की, १० वर्षापेक्षा कमी वय आणि दुसरी म्हणजे १० ते १८ वर्षादरम्यानच्या मुलांचा समावेश होतो. १० वर्ष किंवा त्याखालील कमी वयातील मुलांचे बचत खाते हे त्यांचे पालकच सांभाळतात आणि त्यातून व्यवहार करतात. यामुळे मुलांनी सुद्धा बचत खाते कसे वापरावे हे सुद्धा पाहिले पाहिजे. (Saving Account of Child)
हे देखील वाचा- आता पैशांऐवजी ATM च्या माध्यमातून सोनं काढता येणार, जाणून घ्या अधिक
कधी सुरु कराल मुलांचे बचत खाते
स्वत:च्या बँक खात्यावरुन मुलांना बचत करण्यासाठी प्रेरित करावे. त्यांच्यामध्ये आर्थिक सवय निर्माण करावी. बचत खात्यात जमा झालेल्या रक्कमेवर बँकेकडून रिटर्न ही दिले जातात. जेव्हा मुलं आपल्या बचत खात्यातील रक्कम वाढताना पाहतात तेव्हा ते अधिक बचत करण्यासाठी वळतात. अशातच तुम्ही तुमच्या मुलाचे बचत खाते तो शाळेत जाण्यापूर्वी सुरु करु शकता.