उन्हाळा सुरु झाला की, आपोआपच विजेची मागणी वाढते. कारण उन्हाळ्यामध्ये फ्रिज, फॅन, एसी, कुलर आदी वस्तूंचा वापर खूपच केला जातो. मात्र या वस्तू वापरताना सामान्य ग्राहकांना वीज बिल भरपूर येईल याचे देखील टेन्शन असते. उन्हाचा तडाखा खूप असल्यामुळे या गोष्टी ना वापरता आपण राहू देखील शकत नाही. अशावेळेस नाईलाज म्हणून का असेना आपण या गोष्टी वापरतो. वीज न वापरून देखील चालणार नसते. वीज आपली मूलभूत गरज देखील आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि स्वयंपाकापासून ऑफिसपर्यंत सर्वच कामे या विजेवर अवलंबून असतात. (Electricity)
यातही आपण आपल्याकडून शक्य तेवढी बचत करण्याचा प्रयत्न करतच असतो. मात्र तरीही घरातील विजेचे मीटर खूपच फास्ट फिरते आणि महिन्याच्या शेवटी आपल्याला धक्का बसेल एवढे मोठे वीज बिल येते. मग अशावेळेस वीज बिल कमी यावे यासाठी अनेकदा आपण विविध युक्त्या अंमलात आणत असतो, मात्र त्याचा देखील अपेक्षित फायदा आपल्याला होताना दिसत नाही. यासाठीच आज आम्ही तुमच्यासाठी वीज बचतीच्या काही सोप्या, लाभदायक अशा टिप्स सांगणार आहोत. (Electricity Bill)
एलईडी बल्ब
तुम्ही तुमच्या घरात, ऑफिसमध्ये आदी ठिकाणी एलईडी बल्ब वापरल्यास पारंपरिक बल्बच्या तुलनेत सुमारे ८० टक्के वीजबचत होऊ शकते. एलईडी बल्ब अर्थात लाइट एमिटिंग डायोडस् बल्ब. सध्या सगळीकडे एलईडी बल्बचा वापर मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. या बल्बच्या किमतीदेखील स्वस्त आहेत. पारंपरिक बल्बचे आयुष्य सुमारे पाच हजार तास, तर एलईडी बल्बचे आयुष्य तब्बल एक लाख तास एवढे असते. याचा थेट परिणाम तुमच्या लाइटबिलवर नक्कीच होईल. (Summer tips)
सूर्यप्रकाशाचा अधिक वापर
नैसर्गिक लाइट अर्थात सूर्यप्रकाशाचा आपण जास्तीत जास्त वापर करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही घरांमध्ये तशी सजावट केली पाहिजे. जेव्हा दिवसा घरात सूर्यप्रकाश भरपूर असेल तेव्हा विनाकारण लाइट लावणे टाळावे. विजेच्या बचतीसाठी हे खूप महत्त्वाचे आहे. सूर्यप्रकाशाचा घरात कसा वापर करता येईल यासाठी देखील विविध उपाययोजना करता येतात. घराची सजावट व खिडक्यांचे पडदे फिकट रंगाचे असणे वीजबचतीसाठी उपयुक्त आहे. (Marathi Trending News)
सोलर एनर्जीचा वापर
तुमच्या घरात टेरेसवर जागा असेल आणि भरपूर सूर्यप्रकाश मिळत असेल तर सोलर एनर्जी प्रणाली बसवणे वीज वाचवण्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. सौर पॅनेल दिवसभर सूर्यप्रकाशाने चार्ज होतात आणि तुमच्या अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांना उर्जा देण्यासाठी त्यांचा वापर केला जाऊ शकतो. सुरुवातीला त्याचे सेटअप थोडे महाग असू शकते, मात्र याचा परिणाम तुमच्या महिन्याच्या विजेच्या बिलावर नक्कीच दिसून येणार आहे. (Top Marathi News)
विद्युत उपकरणं गरज नसेल तेव्हा करा बंद
घरातील विविध विद्युत उपकरणे व दिवे उपयोगात नसतील तेव्हा बंद करणे आवश्यक आहे. यातही महत्त्वाचा पंखा आहे. ज्या उपकरणांमध्ये कॉइलचा वापर केला जातो, ती सर्वच उपकरणे मोठ्या प्रमाणावर वीज खातात. खासकरून पंखा. त्यामुळे पंख्याला गरज नसताना बंद ठेवणे विजेच्या बचतीसाठी योग्य ठरते. (Social News)
रेफ्रीजरेटरची जागा
उन्हाळ्यात रेफ्रिजरेटरला उष्णतेच्या सर्व स्रोतांपासून दूर ठेवा. रेफ्रिजरेटर थेट सूर्यप्रकाश पडणाऱ्या ठिकाणी ठेवू नका.
एसीचे तापमान योग्य ठेवा
24-26°C वर सेट केल्यास विजेची 20-30% बचत होते, तेच तापमान 18-20°C वर ठेवल्यास AC जास्त मेहनत करतो आणि विजबील वाढते.
=======
हे देखील वाचा : London : लंडन शहरापासून श्रीमंत चालले दूर !
Golconda Blue Diamond : गोलकोंडा ब्लू डायमंडचा होतोय लिलाव !
=======
डिव्हाइस खरेदी करताना रेटिंग पहा
घरासाठी कोणतेही नवीन इलेक्ट्रॉनिक उपकरण खरेदी करताना, त्याचे ऊर्जा कार्यक्षमता रेटिंग तपासणे गरजेचे आहे. आपल्या ऊर्जा मंत्रालयाने सांगितले आहे की 5-स्टार रेटिंग असलेली प्रोडक्ट्स कमी वीज वापरतात. जर तुम्ही एसी खरेदी करणार असाल तर 5-स्टार रेटिंग असलेला एसी घ्या. यामुळे 15% पर्यंत वीज बचत होऊ शकते. (Top Stories)
मोठी इलेक्ट्रिकची उपकरणं एकत्र वापरू नका
वॉशिंग मशीन, फ्रीज, टीव्ही, पाण्याची मोटार अशी जास्त वीज लागणारी उपकरणं एकाचवेळी वापरू नका. या उपकरणांचा एकाचवेळी वापर केल्याने मीटरवर लोड येऊ शकतो. महिन्यातून तीन वेळा अशा प्रकारे एकाचवेळी मीटरवर लोड पडल्यास, आपोआप मंजूर भारापेक्षा जास्त भार वीज बिलात जोडला जातो आणि भार वाढला की मीटरचं भाडंही वाढतं. (Marathi Latest News)