भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सरोजिनी नायडू यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. सरोजिनी नायडू एक उत्तम राजकारणी आणि महान स्वातंत्र्य सेनानी होत्या. कवयित्री, आणि महान वक्त्या म्हणूनही त्यांची ओळख होती. सन 1925 मध्ये त्यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली. भारत स्वतंत्र झाल्यावर सरोजिनी नायडू उत्तरप्रदेशच्या पहिल्या राज्यपाल होत्या.
भारताच्या स्वातंत्र संग्रामातील या तेजस्विनी व्यक्तिमत्वावर लवकरच चित्रपट येत आहे. सरोजिनी नायडू यांच्यावर दिग्दर्शक विनय चंद्रा बायोपिक करत असून यामध्ये शांती प्रिया सरोजिनी नायडू यांच्या भूमिकेत आहेत. धीरज मिश्रा यांनी या चित्रपटाची कथा लिहिली असून चरण सुवर्णा आणि हनी चौधरी हे चित्रपटाचे निर्माते आहेत. (Biopic on Sarojini Naidu)

सरोजिनी नायडू उत्तम कवियत्री होत्या. त्यांनी लिहिलेल्या कविता, चित्रपटाचे लेखक धीरज मिश्रा यांच्या वाचनात आल्या. त्यावरुनच या चित्रपाटाची प्रेरणा मिळाल्याचे त्यांना मिळाली. तिथूनच त्यांनी सरोजिनी नायडू याच्या जिवनाचा अभ्यास सुरु केला. दरम्यान लॉकडाऊनमध्ये वाचनालये बंद होती. मात्र इंटरनेटच्या माध्यमातून सरोजिनी नायडू यांच्या आयुष्यवर आधारित अनेक पुस्तके धीरज मिश्रा यांनी मिळवली, त्यांचा अभ्यास केला. तिथूनच या चित्रपटाची कथा लिहायला घेतल्याचे त्यांनी सांगितले. (Biopic on Sarojini Naidu)
या चित्रपटात बंगलोरची प्रसिद्ध अभिनेत्री सोनल मंथेरो ही सरोजिनी नायडू यांची तरुणपणीची भूमिका करणार आहे. सोनल बनारस या चित्रपाटाच्या माध्यमातून मुंबईला आली होती तेव्हाच तिची सरोजिनी नायडूंच्या भुमिकेसाठी निवड झाली. सरोजिनी नायडू यांची भूमिका दोन टप्प्यात दाखवण्यात येणार असून दुसऱ्या टप्प्यातील सरोजिनी नायडू यांची प्रमुख भूमिका अभिनेत्री शांती प्रिया साकारणार आहे. आपल्या आयुष्यातील अत्यंत मह्त्तावाची भूमिका मिळाल्याने शांती प्रियानं आनंद व्यक्त केला आहे. (Biopic on Sarojini Naidu)
====
हे देखील वाचा – द ब्रोकन न्यूज: दोन न्यूज चॅनेल्समधील स्पर्धेची कहाणी
====
सरोजिनी नायडू याचे पती गोविंद रजालू यांची भूमिका हितेन तेजवानी स्कारणार आहेत. चित्रपटात जरीना वहाबही खास लूकमध्ये दिसेल. त्या सरोजनी नायडू यांच्या आईच्या भूमिकेत असतील. त्यांचे तीन लूक या चित्रपटामध्ये दिसतील.

या चित्रपाटाचे चित्रिकरण मुंबई, जॉर्जिया आणि बनारस येथे होणार आहे. याशिवाय केरळ आणि कर्नाटक राज्याच्या बॉर्डरवर असलेल्या कुट्टा येथेही चित्रपाटाच्या प्राथमिक भागाचे चित्रिकरण करण्यात आले आहे. चित्रपटात सरोजिनी नायडू यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाची माहिती देण्यात येणार आहे. याशिवाय त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलूही दाखवण्यात येणार आहेत. स्वातंत्र सेनानी, कवियत्री, परदेशात भारताची शान उंचवणारी प्रभावी वक्ता अशा विविध रुपातील सरोजिनी नायडू आपल्याला पहाता येतील. हा चित्रपट हिंदी, कन्ऩड, तमिळ, तेलुगू अशा चार भाषात होणार आहे.
– सई बने