Home » सौदी अरेबियातील पहिली अंतराळवीर रेयाना बरनावी कोण आहे?

सौदी अरेबियातील पहिली अंतराळवीर रेयाना बरनावी कोण आहे?

by Team Gajawaja
0 comment
Saudi Female Astronaut
Share

जगभरात महिला प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. अशातच धर्माबद्दल अगदी कठोर नियम पाळणाऱ्या सौदी अरब मध्ये गेल्या ७ वर्षात काम करणाऱ्या महिलांची संख्या फार वाढली गेली आहे. आता सौदी अरब मधील महिला आंतरळाची सफर करण्यासाठी तयार आहे. खरंतर सौदीचे पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान यांनी देशातील पहिली महिला अंतराळवीर म्हणून रेयाना बरनावी हिला इंटरनॅशनल स्पेस स्टेशन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रुपमध्ये सहभागी करण्याचा निर्णय घेतला आहे. (Saudi Female Astronaut)

रेयाना बरनावी स्पेश मिशनवर जाणारी सौदी अरबमधील पहिली महिला अंतराळवीर असणार आहे. तिच्यासोबत एक पुरुष अंतराळवीर अल कर्नी सुद्धा जाणार आहेत. त्यांचे अंतराळ यान याच वर्षात अमेरिकेतून लॉन्च केले जाणार आहे. खरंतर स्पेस मिशनवर जाणारे पहिले मुस्लिम अंतराळवीरच्या रुपात सौदीचे युवराज सुल्तान बिन सलमान बिन अब्दुल अजीज यांचे नाव आहे. ते १९८५ मध्ये स्पेस मिशनवर गेले होते. त्यानंतर युएईचे हज्जा अल मंसूरी २०१९ मध्ये इंटरनॅशनल स्पेस स्टेशवर गेले होते. रेयाना बरनावी पूर्वी फेब्रुवारी २०२३ मध्ये अखेर युएईचे अंतराळीवर सुल्तान अल नेयादी स्पेश मिशनवर जाणार आहेत. ते सहा महिने अंतराळात राहणार आहेत. असे करणारे ते पहिले सौदीतील अंतराळवीर असणार आहेत.

कोण आहे सऊदी रेयाना बरनावी?
सऊदी अरब मधील पहिली महिला अंतराळवीरच्या रुपात इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला जाण्यासाठी तयार करत असलेली रेयाना बरनावी शोध आणि प्रयोगशाळा विशेतज्ञ आहे. तिने कॅन्स स्टेम सेल्सच्या क्षेत्रात ९ वर्ष काम केले आङे. त्याचसोबत ओटेगा युनिव्हर्सिटीमधून जेनेटिक इंजिनिअरिंग आणि टिश्यू डेवलपमेंट मध्ये डिग्री घेतल्यानंतर किंग फैजल युनिव्हर्सिटी मधून बायोमेडिकल सायन्समध्ये मास्टर डिग्री मिळवली आहे. ती सौदीतील स्पेस अॅन्ड टेक्नॉलॉजी क्षेत्रात अभ्यास करणारी पहिली महिला आहे. असे मानले जात आहे की, ती स्पेस मिशनवर गेल्यानंतर सौदीतील महिलांमध्ये या क्षेत्राबद्दल अधिक जागृकता वाढेल.

कधी जाणार स्पेशन मिशनवर?
रेयाना बारनावी आपला साथीदार अल कर्नी सोबत वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत स्पेश मिशनसाठी अमेरिकेतून रवाना होणार आहे. दोघेही स्पेस-एक्सच्या एस्ट्रोनॉट एएक्स-२ स्पेस मिशनच्या क्रु मध्ये सहभागी असणार आहेत. त्यांचे अंतराळ यान अमेरिकेतील फ्लोरिडा मधील नासाच्या कॅनेडी स्पेस सेंटर येथून लॉन्च होणार आहे. सौदी अरबच्या या निर्णयामुळे जगभरात देशाची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केला जात असल्याच्या दृष्टीने पाहिले जात आहे. असे म्हटले जात आहे की, सौदी मध्ये क्राउन प्रिंस देशातील कट्टर इस्लामिक प्रतिमा बदलण्यासाठी सातत्याने असे निर्णय घेत आहेत जे महिलांच्या हितासाठी आहेत. (Saudi Female Astronaut)

हे देखील वाचा- आता नील मोहन हे भारतीय वंशाच्या सीईओंच्या यादीत सामील

सौदीत कामकाज करणाऱ्या महिलांची संख्या दुप्पट झाली
सौदीचे क्राउन प्रिंस मोहम्मद बिन सलमान २०१७ मध्ये सत्तेत आल्यानंतर महिलांना पुरुष मंडळी किंवा पालकांशिवाय एकट्याने गाडी चालवण्यास परवानगी दिली होती. ऐवढेच नव्हे तर त्यांना महिला कोणत्याही पुरुषासह विमान प्रवास करु शकतात. महिलांना कामकाजासंदर्भात दिल्या गेलेल्या सुटमुळे आता सौदीतील महिला गॅरेज मध्ये काम करताना सुद्धा दिसून येत आहेत. आकडेवारीनुसार वर्ष २०१६ च्या नंतर आतापर्यंत सौदीत कामकाज करणाऱ्या महिलांच्या संख्येत वाढ झाली आहे. पुरुष आणि महिलांच्या तुलनेत आता कामकाज करणाऱ्या महिलांची संख्या ३७ टक्के झाली आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.