गेल्या काही वर्षांमध्ये सौदी अरब आणि अमेरिकेच्या संबंधात तणाव वाढताना दिसून येत आहे. सौदी अरब एकेकाळी युएसचा खास होता. पण आता तोच सौदी चीनची तारीफ करु लागला आहे. अशातच स्पष्ट होतो की, सौदीचे असे वागणे अमेरिकेची चिंता वाढवू शकते. नुकत्याच सौदी किंग मोहम्मद बिन सलमानने चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यासोबत फोनवरून बातचीत केली. प्राप्त झालेल्या माहितीनुसार सौदी किंगने या दरम्यान चीनची खुप तारीफ केली. असे सुद्धा सांगितले जात आहे की, शी जिनपिंग यांनी सुद्धा सौदी आणि ईराण मध्ये झालेल्या संवादावरुन आनंद व्यक्त केला आहे.(Saudi-China Relation)
खरंतर देल्या १० मार्चला शी जिनपिंग यांनी क्षेत्रीय शांतिच्या उद्देशाने सौदी अरब आणि ईराण मध्ये शांती कराराची घोषणा केली होती. त्यानंतर काही दिवसांमध्ये दोन्ही देशांमधील वाद मिटला आणि चीनचे ऐकले. दोन्ही देशांनी या करारानंतर एकमेकांच्या देशात दूतवास सुरु करण्यासाठी सुद्धा मान्यता दिली. चीनने यानंतर सौदी अरेबियाची खुप तारीफ केली.
सौदी अरबच्या किंगचे असे मानणे आहे की, चीन ज्या प्रकारे आंतरराष्ट्रीय प्रकरणांमध्ये हिस्सा घेत आहे त्यामुळे क्षेत्रीय स्थिरतेला बळ मिळेल. चीनचे हे पाऊल मदतशीर आहे. आम्ही शी जिनपिंग यांच्या या निर्णयाचा सन्मान करतो. याच सोबत दोन्ही देशांमध्ये एक विशाल तेल परिसरासंदर्भात ही करार झाला. सौदी आणि चीनच्या तेल कंपनीने ३.५ बिलियन डॉलरचा करार केला. म्हणजेच चीन-सौदीचा हा करार अंतर्गत उद्देषाने व्यापार वाढवण्यासाठी केला आहे. यामुळे अमेरिकाला त्रास होण्याची सुद्धा शक्यता आहे.
वर्ष २०२२ मध्ये सुद्धा रियाद मध्ये झालेल्या खाडी देशांच्या संम्मलेनात जेव्हा शी जिनपिंग पोहचले होते तेव्हा सौदी अरब आणि चीनचे उत्तम संबंध दिसून आले होते. डिसेंबरमध्ये झालेल्या त्या संम्मेलनात सौदीच्या किंग यांनी असे म्हटले होते की, चीन आता जगाचे नेतृत्व करु शकतो. सौदी किंग यांचे तेव्हाचे विधान फार चर्चेत आले होते आणि ते अमेरिकेच्या विरोधात असल्याचे मानले जात होते. तर चीनने तेव्हा खाडी देशांसोबत दोन हजार वर्षांपूर्वीच्या मैत्रीचा हवाला देत असे म्हटले होते की, आमच्यामधील संबंध सुधरावेत आणि नव्या क्षेत्रांच्या विकासासाठी कराराचे मार्ग उघड करावेत.(Saudi-China Relation)
हे देखील वाचा- जो बिडेन अमेरिकेला संपवण्याचा प्रयत्न करतायत, डोनाल्ड ट्रंप यांचा राष्ट्राध्यक्षांवर हल्लाबोल
खाडी देशांचा अमेरिकेशी संबंध आधीच बिघडले होते. मात्र गेल्या वर्षात ओपेक प्लसच्या तेल उत्पादनात कपात करण्याच्या निर्णयावरुन दोन्ही देशांमधील तणाव वाढला गेला. अमेरिकेचे असे मानणे होते की, रशियाला याचा लाभ होईल. दरम्यान तेव्हा सौदीने असा अंदाज फेटाळून लावला होता. पण अमेरिकेने त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा ही दिला होता. तेव्हापासून सौदी सुद्धा अमेरिकेपासून दूर राहत आहे. आता त्याने चीनची तारीफ केली आहे.