Home » Saudi Arabia : तेलाचे साठे संपल्यावर मग देशाचे काय ?

Saudi Arabia : तेलाचे साठे संपल्यावर मग देशाचे काय ?

by Team Gajawaja
0 comment
Saudi Arabia
Share

अरब देशांनी एका अर्थांनी जगावर वर्चस्व गाजवले आहे ते तेथील समृद्ध अशा तेलाच्या साठ्यांमुळे. या तेलाच्या साठ्या आकारानं कितीही लहान असले तरी या देशांचा आर्थिक स्तर हा वरचढ राहीला. युरोपातील देशांनाही या तेलासाठी अरब देशांसमोर नमते घ्यावे लागले आहे. पण हे तेलाचे साठे अनंतकाळासाठी रहाणार नाहीत. हे तेलाचे साठे संपल्यावर मग देशाचे काय, हा प्रश्न या देशांपुढे आहे. त्यात सौदी अरेबियानं हा प्रश्न सोडवून आपल्या देशाला नव्या वैभवासाठी तयार केले आहे. सौदी अरेबिया आता तेलानंतर युरेनियमचा पुरवठा जगभर करणार आहे. सौदीचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी आपल्या नव्या योजनेचा भाग म्हणून युरेनियम विकण्याची घोषणा केली आहे. जगभर या घोषणेचे स्वागत झाले आहे. अणुऊर्जा प्रकल्पांमध्ये वीज निर्मितीसाठी युरेनियमचा वापर केला जातो. याशिवाय, बॉम्ब आणि रेडिओ समस्थानिक बनवण्यासाठी देखील युरेनियमचा वापर केला जातो. सध्या जगातील प्रत्येक देशामध्ये अणुबॉम्ब तयार करण्याची स्पर्धा लागली आहे. या देशांना सौदी अरेबिया मोठ्या दरानं युरेनियमची विक्री करणार आहे. (Saudi Arabia)

तेलासाठी ज्या देशाची ओळख आहे, त्या सौदी अरेबियानं आता युरेनियमचे साठे जगासाठी खुले केले आहेत. तेलसाठ्याच्या जोरावर सौदी अरेबियामध्ये प्रचंड विकास झाला. आर्थिक सुबत्ता आली. मात्र ही गोष्ट कायम रहाणार नाही, याची जाणीव असलेल्या सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी युरेनियम जगाला खुले केले आहे. यामुळे सौदी अरेबियाच्याही अणुकार्यक्रमाला नवी चालना मिळणार आहे. सौदी अरेबियामध्ये अद्याप एकही अणुऊर्जा प्रकल्प नाही. अणुऊर्जा केंद्रांमध्ये इंधन म्हणून युरेनियमचा वापर केला जातो. हा एक अत्यंत दुर्मिळ पदार्थ असून त्याला जगात सोन्यापेक्षा अनेक पटीनं भाव आहे. सौदीमधील तेलाच्या विहिरी खाली झाल्यावर सौदीपुढे मोठे आर्थिक प्रश्न उभे रहाणार आहेत. यासाठी प्रिन्स मोहम्मद हे या तेलसाठ्यांवरील देशाचे अवलंबित्व कमी करत आहेत. त्यांनी आपल्या देशात अनेक योजना राबवल्या आहेत. पर्यटनाचा विकास केला आहे. (International News)

परदेशी पर्यटक मोठ्या संख्येनं सौदी अरेबियाला यावे यासाठी भव्य संकुले बांधण्यात आली आहेत. तसेच सौदीमधील अनेक जुन्या रुढी रद्द करण्यात आल्या आहेत. त्याच्या या नव्या सौदी बनवण्याच्या योजनेला काही कट्टरपंथी विचारसणीच्या नागरिकांनी विरोध केला आहे. मात्र प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी या सर्वांना बाजुला ठेवत सौदीचे नवे रुप आपल्याला घडवायचे आहे, असे आवाहन तरुणांना केले आहे. त्यातूनच हा युरेनियम प्रकल्प मुख्य ठरणार आहे. सौदी अरेबियाला युरेनियम आणि इतर खनिजांच्या निर्यातीतून मोठी कमाई होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. यामुळे पेट्रोलियम उत्पादने संपल्यानंतरही सौदी अरेबियाचे उत्पन्न स्थिर राहील आणि जनतेचा आर्थिक स्तरही स्थिर राहिल अशी खात्री त्यांनी व्यक्त केली. ही घोषणा झाली असली तरी सौदी अरेबियाने अद्याप आपला पहिला अणुभट्टी प्रकल्प सुरू केलेला नाही. (Saudi Arabia)

आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीसोबतच्या करारानुसार, सौदी अरेबियाला स्मॉल क्वांटिटीज प्रोटोकॉल अंतर्गत मर्यादित संख्येत कमी-शक्तीचे अणुभट्टे चालवण्याची परवानगी आहे. या कराराअंतर्गत, कमी प्रगत अणुऊर्जा तंत्रज्ञान असलेल्या देशांना त्यांच्या मालमत्तेच्या अनेक अहवाल देण्याच्या दायित्वांपासून आणि तपासणीपासून सूट देण्यात आली आहे. मात्र हा अणुकार्यक्रम अजूनही सुरुवातीच्या टप्प्यात आहे. परंतु प्रिन्स मोहम्मद हे युरेनियम समृद्ध करून आपला अणुकार्यक्रम वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सौदीचा फायदा होत असला तरी जगावर अणुयुद्धाचे सावट अधिक गडद होईल, अशीही भीती व्यक्त होत आहे. (International News)

=====================

हे देखील वाचा : Britain : राजाच्या देशात महागाईचा कळस !

Maha Kumbha : हर हर महादेवच्या जयघोषात महाकुंभाचा प्रारंभ !

=====================

युरेनियम हा एक किरणोत्सर्गी घटक असल्यामुळे त्याचीही हाताळणी अतिशय काळजीपूर्वक करावी लागते. युरेनियम हा एक अपारंपरिक ऊर्जा स्रोत मानला जातो. बॉम्ब बनवण्यासाठी याचा अलिकडे अधिक वापर होत आहे. त्यात वापरल्या जाणाऱ्या युरेनियमला ​​बॉम्ब-ग्रेड युरेनियम म्हणतात. युरेनियमचा वापर रेडिओआयसोटोप बनवण्यासाठी देखील केला जातो. या युरेनिमयला जगभर मोठी मागणी असली तरी युरेनियम निर्मितीमुळे सौदी अरेबियावर पहिल्यांदा इराण सारख्या देशांन नाराजी व्यक्त केली आहे. मात्र अन्य देश अणुबॉम्ब तयार करत असतांना सौदी अरेबिया शांतीसाठी प्रयत्न कऱणाऱ नाही, असे सांगत प्रिन्स मोहम्मद यांनी विरोधकांना शांत रहाण्याचा सल्ला दिला आहे. सौदी अरेबियाच्या युरेनियममुळे त्यांचा विकास होणार असला तरी जगभरातील युद्धजन्य वातावरणात त्याची भर पडायला नको, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (Saudi Arabia)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.