Home » दिग्गज अभिनेते सतीश कौशिक यांचे निधन

दिग्गज अभिनेते सतीश कौशिक यांचे निधन

by Team Gajawaja
0 comment
Satish Kaushik Death
Share

दिग्गज अभिनेते सतीश कौशिक यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी निधन झाले आहे. याबद्दलची माहिती त्यांचा खास मित्र अनुमप खेर यांनी दिली आहे. यामुळे बॉलिवूड इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. काही सेलिब्रिटीज यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या निधनामुळे शोक व्यक्त केला आहे. आता मीडिया रिपोर्ट्समध्ये त्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या क्षणांबद्दल माहिती समोर आली आहे. यामुळे सर्वांना आणखीच दु:ख होत आहे. असे सांगितले जात आहे की, सतीश कौशिक यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे. (Satish Kaushik Death)

सतीश कौशिक यांचे निधन गुरुवारी सकाळी झाले. त्याबद्दल लिहिताना अनुपम खेर भावूक झाले आणि त्यांनी एका पोस्टमध्ये त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगितले. अभिनेते आदल्या दिवशी रात्री आपल्या ओळखीतल्या एकाला भेटण्यासाठी दिल्लीहून गुरुग्राम येथे जात होते. तेव्हा ते कारमध्ये असतानाच त्यांची प्रकृती बिघडली. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिल्लीत शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांचे शव अंत्यसंस्कारासाठी मुंबईत आणले जाणार आहे. सतीश कौशिक इंडस्ट्रीमधील नामांकित अभिनेते असण्यासह एक यशस्वी चित्रपट निर्माते होते. त्यांच्या निधनामुळे सोशल मीडियातील अन्य युजर्सने ही पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.अनुपम खेर, कंगना रनौत यांच्या इंडस्ट्री मधील ही बहुतांश कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.

मृत्यूपूर्वी होळी खेळली
सर्वात धक्कादायक गोष्ट अशी की, मृत्यूपूर्वी ते अगदी स्वस्थ होते. सोशल मीडियात अॅक्टिव्ह ही होते. ७ मार्चला त्यांनी मुंबईतील जुहू येथे शबाना आजमी यांच्या घरी होळी पार्टीला उपस्थिती लावली होती. सतीश कौशिक यांनी आपल्या निकटवर्तीयांसोबत धमाकेदार होळी साजरी केली. सतीश कौशिक यांच्या होळी सेलिब्रेशनमध्ये महिमा चौधरी, जावेद अख्तर, ऋचा चढ्ढा आणि अली फजनल सुद्धा होते. त्यांनी दुपार पर्यंत पार्टीत खुप मजा केली आणि त्यानंतर ते दिल्लीसाठी रवाना झाले. (Satish Kaushik Death)

हे देखील वाचा- जावेद अख्तर यांनी पाकिस्तानात दिलेल्या विधानाची सोशल मीडियात जोरदार चर्चा

व्हायरल होतेय अखेरची पोस्ट
होळीच्या फोटोंमध्ये सतीश कौशिक अत्यंत आनंदी दिसून येत असल्याने वाटतच नाही की, त्यांना कोणतीही आरोग्यासंबंधित समस्या असेल. होळीच्या फोटोंमध्ये ते एकदम स्वस्थ दिसत होते. हसतानाचा सतीश कौशिक यांचा फोटो पाहून कोणालाच वाटणार नाही की ते आता आपल्यात नाहीत. त्यांचे असे अचानक निघून जाणे सर्वांसाठी धक्कादायक आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.