रशिया आणि युक्रेन युद्धाला 1000 दिवस होऊन गेले आहेत. आत्तापर्यंत या युद्धानं हजारो नागरिकांचे बळी घेतले आहेत. या दोन्ही देशांमधील आर्थिक गणितं या युद्धामुळे ढेपाळली आहेत. शिवाय युक्रेनला मदत करणा-या युरोपमधील देशांमध्येही आता तशीच परिस्थिती आहे. मात्र येवढं होऊनही हे युद्ध संपत नाही. तशात अमेरिकेनं केलेल्या क्षेपणास्त्रांच्या मदतीनं युद्ध आणखीनच भडकलं आहे. आता या युद्धात आण्विक अस्त्रांचीही एन्ट्री झाली आहे. अमेरिका आणि ब्रिटनने युक्रेनला केलेल्या मदतीमुळे रशियाचे अध्यक्ष ब्लादेमिर पुतीन यांनी अण्वस्त्रांचा हल्ला करण्याचा इशारा दिला आहे. नुसता इशारा देऊन पुतीन गप्प राहिलेले नाहीत तर त्यांनी रशियामधील सर्वात घातक असे, शैतान-2 हे क्षेपणास्र तैनात करण्याचे आदेश आपल्या सैन्याला दिले आहेत. युक्रेनसोबत अमेरिकेलाही पुतीन यांनी अण्वस्त्राचा इशारा दिल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. (Satan-2)
युक्रेनसोबत रशिया गेल्या 1000 दिवसापासून युद्ध करीत आहे. या युद्धानं दोन्हीही देशांचे मोठे नुकसान झाले आहे. दोन्हीही देशांना भाड्याचे सैन्य घेऊन युद्ध लढावे लागत आहे. या युद्धात युक्रेनला अमेरिका, ब्रिटन, कॅनडामधून मोठ्या प्रमाणत मदत मिळत आहे. ही मदत बंद करण्याचे आश्वास अमेरिकेचे नवनिर्वार्चीत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले. पण त्याआधीच अमेरिकेचे सध्याचे अध्यक्ष जो बिडेन यांनी आपल्या शेवटच्या काही प्रमुख निर्णयांमध्ये युक्रेनला रशियावर अमेरिकन क्षेपणास्त्रांचा मारा करण्याची परवानगी दिली. युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर ज़ेलेंस्की यांनी ही परवानगी येताच लगेच रशियावर क्षेपणास्त्रांचा माराही केला. या सर्वांवर रशियाकडून कडक शब्दात टिका करण्यात आली. अमेरिका, ब्रिटन यांनी जाहीरपणे युक्रेनला जो पाठिंबा दिला त्याचा बदला घेतला जाईल, सोबत युक्रेनलाही धडा शिकवू असे रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी जाहीर केले. यामुळे युक्रेन आणि त्याच्या सीमेवर असलेल्या अन्य लहान देशांमध्येही घबराटीचे वातावरण पसरले आहे. (International News)
या सर्वात रशियानं उचलेल्या आणखी एका मोठ्या पावलानं खरोखर अण्वस्त्र युद्ध होणार यावर शिक्कामोर्तब होत आहे. रशियानं ‘शैतान-2’ या नावाप्रमाणे घातक असलेल्या क्षेपणास्त्राला तैनात करण्यास सुरुवात केली आहे. शैतान-2 हे क्षेपणास्त्र जगातील सर्वात घातक शस्त्र प्रणालींपैकी एक आहे. यातून जे 25556 किमीपर्यंत अण्वस्त्र हल्ला करण्यात येऊ शकतो. हे क्षेपणास्त्र स्वतःसोबत अनेक अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहे. या क्षेपणास्त्रांचा खरोखर जर रशियानं वापर केला तर तो जगासाठी सर्वात विनाशक दिवस ठरणार आहे. वास्तविक रशियाला या क्षेपणास्त्राच्या चाचणीमध्ये अपयश आल्याची बातमी देण्यात आलही होती. मात्र असे असतानाच पुतीन यांनी या अण्वस्त्राच्या तैनातीची तयारी सुरु केल्यानं शैतान-2 ची चाचणी यशस्वी झाली असण्याची शक्यता आहे. पाश्यात्य जगापासून हे यश लपवून ठेवण्यासाठी पुतीन यांनीच अण्वस्त्राची चाचणी अपयशी झाल्याची बातमी पसरवली असाही एक अंदाज व्यक्त होत आहे. (Satan-2)
=====
हे देखील वाचा : केनडी हत्याकांडाचे गुढ आणि ट्रम्प
========
रशियाच्या स्ट्रॅटेजिक मिसाइल फोर्सेसचे प्रमुख कर्नल-जनरल सर्गेई काराकायेव हे स्वतः शैतान-2 च्या तैनातीसाठी आपल्या जवानांसोबत उभे आहेत. हा युक्रेनसोबत अमेरिकेलाही अण्वस्त्रांच्या युद्धाठी सज्ज व्हा, असा इशारा असल्याचे मानण्यात येत आहे. गेल्याच आठवड्यात रशियाने युक्रेनियन शहर डनिप्रोवर हल्ला करण्यासाठी आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रक्षेपित केले होते. हा युक्रेनला दिलेला प्राथमिक इशारा शैतान-2 च्या बाबतीत होता हे स्पष्ट झाले आहे. शैतान-2 हे आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे. त्याचा आकार 14 मजली इमारतीएवढा आहे. या आण्विक क्षेपणास्त्राचे वजन 208.1 टन आहे. यात त्येकी 750 किलोटन 10 अण्वस्त्र वाहून नेण्याची 25556 किमी पर्यंत हल्ला करण्यास सक्षम असलेल्या या क्षेपणास्त्रांच्या मार्गात कोणते देश आहेत, हे अद्याप स्पष्ट नाही. वास्तविक या क्षेपणास्त्राला रशियानं RS-28 Sarmat असे नाव दिले आहे. परंतु त्याचे घातक परिणाम पाहून पाश्चात्या देशांनी या क्षेपणास्त्राला शैतान-2 असे नाव दिले आहे. युक्रेनसोबत युद्ध सुरू झाल्यानंतर रशियाने या क्षेपणास्त्राची चाचणी केली. हे क्षेपणास्त्र तैनात करण्याचे काम रशियामध्ये युद्धपातळीवर सुरु आहे, तर दुसरीकडे युक्रेन, नॉर्वे, स्वीडन अशा देशात अण्वस्त्रांचा हल्ला झाल्यास नागरिकांना कशी काळजी घ्यावे याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. (International News)
सई बने