Home » Sarvapitru Amavasya : सर्वपित्री अमावस्येला ‘हे’ उपाय करून पितृदोषापासून करा सुटका

Sarvapitru Amavasya : सर्वपित्री अमावस्येला ‘हे’ उपाय करून पितृदोषापासून करा सुटका

by Jyotsna Kulkarni
0 comment
Sarvapitru Amavasya
Share

लवकरच सध्या चालू असलेला पितृपक्षाचा काळ संपणार आहे. पंधरा दिवसांपासून पितृपक्षाचा पवित्र काळ सुरु आहे. मात्र आता सर्वपित्री अमावास्येला या पितृ पंधरवाड्याची समाप्ती होत आहे. सर्वपित्री अमावस्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्वाची मानली जाते. या दिवशी जर आपण आपल्या पूर्वजांचे श्राद्ध केले तर त्यांना मोक्ष मिळतो, त्यांचा शुभ आशीर्वाद आपल्याला मिळतो. एवढेच नाही जर संपूर्ण पितृपक्षामध्ये जर तुम्ही पूर्वजांचे श्राद्ध कोणत्याही कारणामुळे केले नसेल आणि या दिवशी जर ते राहिलेले श्राद्ध केले तरी त्याची फलित तुम्हाला लाभते. अशा या महत्वाच्या दिवशी जर तुम्ही काही उपाय केले तर तुम्ही पितृदोषापासून नक्की सुटका होईल. जाणून घेऊया त्या उपायांबद्दल. (Sarvapitri Amavasya)

पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा
पिंपळाचे झाड हे पूर्वज आणि देवांचे निवासस्थान मानले जाते. सर्वपित्री अमावस्येला संध्याकाळी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाखाली तीळ किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. यामुळे पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि घरात समृद्धी नांदते. इतकेच नाही तर असे केल्याने तुमचा पितृदोष दूर होण्यास मदत होते. याव्यतिरिक्त जर तुम्ही दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी वाहिले तर तुम्ही सर्व पितृदोषांपासून मुक्त होऊ शकता. (Marathi News)

मुख्य प्रवेशद्वारावर दिवा
घराचा मुख्य दरवाजा नेहमीच उर्जेचे प्रवेशद्वार म्हणून ओळखला जातो. सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी मुख्य दारावर चारमुखी तुपाचा दिवा लावला तर पितृदोषापासून सुटका होऊ शकते. सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी लावला जाणारा चारमुखी दिवा शुभ मानला जातो कारण तो चारही दिशांना प्रकाश पसरवणारा दिवा असतो. या उपायामुळे घरात सुख-समृद्धी राहते आणि पितृदोष दूर होतो. (Latest Marathi Headline)

Sarvapitru Amavasya

गायींना अन्न द्या
आपल्या धार्मिक माहितीनुसार कावळे पूर्वजांचे दूत मानले जातात. सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी कावळ्यांना अन्न, पाणी देणे आणि गायीला गूळ, पोळी खाऊ घालणे चांगले मानले जाते. यामुळे तुमच्या घरातील सर्व वास्तु आणि पितृदोष दूर होतात असे मानले जाते. (Marathi News)

दक्षिण दिशेला तुपाचा दिवा
दक्षिण दिशा ही यम आणि पूर्वजांची दिशा मानली जाते. सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला तुपाचा दिवा लावला आणि पूर्वजांच्या शांतीसाठी प्रार्थना केली तर पितृदोषापासून मुक्तता मिळू शकते. (Marathi Trending News)

ईशान्य कोपरा स्वच्छ
घराचा ईशान्य कोपरा देवाचे स्थान मानला जातो आणि सर्वपित्री अमावस्येच्या दुसऱ्याच दिवसापासून शारदीय नवरात्र सुरू होते. म्हणूनच जर या दिवशी घराची ईशान्य दिशा स्वच्छ केली तर तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होतात. पूर्वज देखील प्रसन्न होतात आणि घरात समृद्धी राहते. (Top Stories)

पिंडदान/तर्पण
धार्मिक मान्यतेनुसार सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पितरांची पूजा करावी. पितृ पक्षात पिंडदान-तर्पणला खूप महत्त्व आहे. यामुळे पूर्वज प्रसन्न राहतात आणि आपल्याला सुख-समृद्धीचा आशीर्वाद देतात. (Top Marathi HEadline)

दान-धर्म
ज्योतिषांच्या मते, सर्व पितृ अमावस्येला दान करणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी दान केल्याने पुण्य प्राप्त होते. सर्वपित्री अमावस्येला ब्राह्मणाला दान करावे. तसेच चांदीचे दान करणे श्रेष्ठ मानले जाते. यामुळे पूर्वज समाधानी राहतात, असे मानले जाते. (Latest Marathi News)

=======

Navratri : ए हालो! नवरात्रीत गरबा खेळण्याचे आहेत अनेक आरोग्यदायी फायदे

=======

गायीला हिरवा पालक खाऊ घाला
ज्योतिषांच्या मते, सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पितरांना प्रसन्न करण्यासाठी हिरवा पालक गायीला खायला घालावा. पितृपक्षात गायीला चारा, खाऊ घातल्याने विशेष फळ मिळते, असे म्हणतात. (Top Trending News)

पंचबली कर्म
सर्वपित्री अमावस्येला पंचबली कर्म पितरांना अन्न किंवा अन्नपदार्थ अर्पण करण्यासाठी केले जाते. यामध्ये, आपण सर्वपित्री अमावस्येला तयार केलेल्या सात्विक अन्नाचा काही भाग काढून गायी, कावळे, कुत्रे यांना अर्पण करावा. या दिवशी ब्राह्मणांनाही भोजन खाऊ घालावे. (Social News)

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही.)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.