राज्यात गेले अनेक दिवस देशात कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहता लॉकडाऊन सुरूला सुरुवात करण्यात आली होती . मात्र या लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार उद्योग धंदे बंद पडले होते. पण ह्या संकटात सगळ्यात जास्त परिणाम झाला आहे तो दिव्यांग लोकांच. याच लोकांना बळ देण्याकरिता सार्थक एज्युकेशनल ट्रस्ट आणि नॅशनल एबिलिम्पिक्स असोसिएशन ऑफ इंडियाने “दृष्टिकोण” नावाखाली पुढाकार घेतला आहे. ह्या उपक्रमा अंतर्गत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नेत्यांशी सल्लामसलत करून दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणाच्या दिशेने योग्य निर्णय घेण्यात आला आहे.
नॅशनल सेंटर फॉर प्रमोशन ऑफ एम्प्लॉयमेंट या सर्वेक्षणानुसार बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये केवळ ०.०५% दिव्यांग कर्मचारी आहेत. दिव्यांग कर्मचाऱ्यांपैकी ३% सरकारी संस्थांमध्ये असणे आवश्यक आहे, तर यामध्ये दिव्यांग कर्मचारी केवळ ०.५४ % आहेत. सार्थक एज्युकेशनल ट्रस्टच्या १२ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये ग्रामीण भागातील दिव्यांगांनी ई-लर्निंग प्लॅटफॉर्मचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी लॅपटॉप वितरण मोहीम सुरू केली गेली आणि लोकांना मोहिमेमध्ये सामील होण्यासाठी आणि दिव्यांगांसाठी जुन्या किंवा नवीन लॅपटॉपची देणगी देण्याचे आवाहन करत आहेत.
१०००हुन अधिक दिव्यांगांना कौशल्य निर्मिती प्रशिक्षण
अर्थपूर्ण रोजगार शोधण्यात भारतातील दिव्यांगांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. कोरोनामुळे ही टक्केवारी सर्वात खालच्या पातळीवर पोहोचली आहे.लॉकडाऊन दरम्यान, सार्थक एज्युकेशनल ट्रस्ट तातडीने दिव्यांग मुलांसाठी ऑनलाईन समुपदेशन आणि थेरपी सत्र आयोजित करीत आहेत.सार्थकने आतापर्यंत १२०० दिव्यांगांना कौशल्य निर्मिती प्रशिक्षण दिले असून जे आता नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. दिव्यांगांसाठी सुमारे ५० कॉर्पोरेट कस्टमर केयरसाठी भरती करणार आहेत आणि आम्ही त्यांना तिथे ठेवण्याच्या प्रक्रियेत आहोत. दिव्यांगसाठी एक मोबाइल अँपदेखील तयार करण्यात आले आहे, ज्याच्या सहाय्याने त्यांना विविध योजना, रोजगार आणि अन्य सहाय्य संबंधित माहिती मिळू शकेल. दिव्यांग योजना, नोकर्यावरील माहितीवर सहज प्रवेश मिळावा आणि आवश्यकतेनुसार रिअल-टाइम मदत घ्यावी यासाठी मोबाइल अँप देखील विकसित केले जात आहे. याव्यतिरिक्त, सार्थक दिव्यांगांनासाठी ग्लोबल ई-लर्निंग प्लॅटफॉर्म तयार करण्याच्या प्रक्रियेत आहे आणि जागतिक पातळीवर दिव्यांग क्षेत्राला सक्षम बनविण्यासाठी आंतरराष्ट्रीय आयोजन सहकार्य करीत आहे.
आजवरची कामगिरी
गेले अनेक दिवस आपल्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून सार्थक यांनी १०५० हून अधिक दिव्यांग आणि ४२५ हून अधिक मुलांच्या पुनर्वसनास मदत केली आहे. सार्थकच्या कौशल्य विकास केंद्रांनी १६००० हून अधिक दिव्यांगांना पर्यटन, संघटित किरकोळ, आयटी आणि आयटीईएस प्रशिक्षण दिले आहे. २१ राज्यांत १००हून अधिक रोजगार मेळ्यावांचे आयोजनही करण्यात आले आहे. रोजगार मेळावे आणि कौशल्य केंद्रांच्या माध्यमातून १८००० हून अधिक दिव्यांगांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
———–
नीति आयोग सार्थकच्या वतीने कॉर्पोरेट आणि इतर संस्थांपर्यंत पोहोचून लॅपटॉप मिळविण्याच्या मोहिमेस पाठिंबा देईल ज्यामुळे दिव्यांगांना ई- लर्निंगद्वारे नवीन कौशल्ये शिकता येतील.
-डॉ.राजीव कुमार,उपाध्यक्ष ,नीति आयोग